Daily Current Affiars 18 March 2019 (चालू घडामोडी)


गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
 • वर्षभराहून अधिक काळ कॅन्सरला झुंज देणाऱ्या मनोहर पर्रिकर यांचं पणजी येथे निधन. गेले दोन दिवस त्यांची तब्येत खालावली होती. 
 • पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपद तीनवेळा सांभाळले होते.
 • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून त्यांना आदरांजली वाहिली. 
 • वर्ष 2000 ते 2005, 2012 ते 2014 आणि 2017 ते आतापर्यंत अशा कालावधीमध्ये ते गोव्याचे मुख्यमंत्री 
 • 2014 ते 2017 या काळामध्ये ते संरक्षणमंत्रीपदी कार्यरत 
 • मनोहर पर्रिकर यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी म्हापसा येथे झाला. 
 • आयआयटी मुंबईमधून 1978 साली त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. 
 • 1994 साली पर्रिकर यांनी गोवा विधानसभेत प्रवेश केला. 1999 साली ते गोवा विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते.
 • 1994, 1999, 2002, 2007, 2012 यावर्षी पणजी मतदारसंघातून गोवा विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये आणि 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाला.
 • 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय
 • मणिपुरातली कारवाई : भारतीय सैन्याने मणिपूरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी ठार झाले.
 • राफेल खरेदी : राफेल या लढाऊ विमानांच्या खरेदीला पर्रिकरांनीच हिरवा कंदील दाखवला. 2016 मध्ये राफेल खरेदीपत्रावर पर्रिकरांनीच स्वाक्षऱ्या केल्या.

गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय

 • संपूर्ण नाव : मनोहर गोपाळकृष्ण पर्रिकर
 • गोव्यातल्या म्हापसामध्ये जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी जन्म
 • लोलोला हाय स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण
 • मुंबईतील आयआयटीमधून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण (पर्रिकर भारतातले पहिले आयआयटीयन जे आमदार झाले आणि परिले आयआयटीयन जे एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री झाले)
 • विद्यार्थी दशेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत
 • 1994 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले
 • 2001 मध्ये त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले
 • त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये (2001) ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचं सरकार केवळ दीड वर्ष टिकले
 • जून 2002 मध्ये पर्रिकर पुन्हा एकदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले
 • 2000-2005, 2012-2014 आणि 2017-2019 गोव्याचे मुख्यमंत्री राहिले
 • पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा पर्रिकरांनी सुचवलं
 • 2014 मध्ये भाजपने देशात सत्ता मिळवली. पर्रिकरांनी देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची शपथ घेतली.
 • पर्रिकर संरक्षणमंत्री असताना उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला 
 • गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी 2017 मध्ये पर्रिकरांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
 • 13 मार्च 2017 मध्ये पुन्हा एकदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.▪  देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
साधं राहणीमान आणि स्वच्छ प्रतिमा असलेल्या मनोहर पर्रिकर यांनी गोव्याच्या राजकारणात तीन दशके आपला दबदबा राखला.

▪ वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात पर्रिकर यांनी मात्र आपल्या कुशल नेतृत्वाने ही अस्थिरता संपुष्टात आणली. मुख्यमंत्री म्हणून पर्रिकर यांनी गोव्याला यशस्वी नेतृत्व दिलं.

▪ गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा त्यांना बहुमान मिळाला. २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ ते निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली.

▪ विशेष म्हणजे २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता.

▪ त्यानंतर २०१४ मध्ये देशाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपवण्यात आली होती. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले. दरम्यान, २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपने पर्रिकर यांच्या नेतृत्वाची चाल खेळत राज्यातील सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.

▪ स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज अपयशी

▪ मनोहर पर्रिकर गेल्या वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. गोवा मेडिकल कॉलेज, मुंबईतील लीलावती रुग्णालय, दिल्लीतील एम्स रुग्णालय तसेच अमेरिकेतही पर्रिकर यांनी उपचार घेतले. मात्र, पर्रिकर यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होता.

▪ एकीकडे कॅन्सरशी लढा देत असताना त्याच अवस्थेत पर्रिकर यांनी राज्याचा गाडाही सक्षमपणे हाकला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा वाहिली.

सी लालसावत्ता मिझोरमचे पहिल्या लोकायुक्त अध्यक्ष
 • मिझोराम मुख्यमंत्री झोरमथंगा 
 • कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव लालनुमाविया चुआंगुनो 
 • मिझोरम लोकायुक्त कायदा 2014 मध्ये राज्य विधानमंडळाद्वारे केला होता . 
 • 1981 चे बिहार कॅडरचे IAS अधिकारी 
 • 1981 ला IAS मध्ये येण्यापूर्वी ते 2 वर्ष भारतीय ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिसचा सदस्य होते.
 • केंद्र सरकारच्या मुख्य सचिव / सचिव पदावर दक्षता संस्थेचे प्रमुख म्हणून ते IAS APEX स्केल येथे पोहोचले.
 • बिहार मध्ये राज्याचे दक्षता आयुक्त म्हणून 2015 मध्ये ते निवृत्त झाले.


मनु सोहनी: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन CEO
 • दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मनु सोहनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 •  ICCचे विद्यमान CEO डेव्हिड रिचर्डसन हे इंग्लंडमध्ये होणार्या ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर म्हणजेच जुलै 2019 या महिन्यात निवृत्त होत आहेत. 
 • मनु सोहनी हे व्यवसायिक प्रसार माध्यम क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखली जाते.


सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायाधीश आदर्श कुमार गोयल यांची - राष्ट्रीय हरित प्राधिकरण(NGT) च्या चेअरमनपदी नियुक्ती
 • NGT चेअरमन कार्यकाळ - 5 वर्ष किंवा वयाची 70 वर्ष (जे आधी असेल ते)
 • Civil Aviation Research Organisation (CARO) ही हवाई उड्डाण क्षेत्रातील संशोधन संस्था - हैदराबाद येथील 'बेगमपेठ विमानतळ' परिसरात स्थापन केली जाणार आहे. 
 • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये - 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा 3 रा भारतीय खेळाडू - महेंद्रसिंग धोनी
◆664 सामने - सचिन तेंडुलकर
◆509 सामने - राहुल द्रविड
 • 500 पेक्षा जास्त सामने खेळणारा धोनी 9 वा आंतरराष्ट्रीय खेळाडू व 3 रा भारतीय खेळाडू

Post a Comment

0 Comments