loading...

Daily Current Affiars 17 March 2019 (चालू घडामोडी)

loading...

29 मार्चला प्रथमच सर्व महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ होणार
 • इतिहासात पहिल्यांदाच, दिनांक 29 मार्च 2019 रोजी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संस्थेनी आपल्या दोन महिला अंतराळवीरांचा ‘स्पेसवॉक’ (अंतराळात यानाशिवाय भ्रमण करणे) आयोजित करण्याचे ठरविले आहे.
 • या मोहिमेदरम्यान अॅनी मॅक्लेन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळात भ्रमण करणार आहेत. ही मोहीम कॅनेडियन स्पेस एजन्सी (CSA) याच्या फ्लाइट कंट्रोलर क्रिस्टन फॅसिओल यांच्याकडून व्यवस्थापित केली जाणार आहे. या मोहिमेत निक हेग देखील सामील होतील.
 • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) येथे आधीपासूनच नियोजित असलेल्या तीन स्पेसवॉकच्या शृंखलेतली ही द्वितीय मोहीम आहे. 29 मार्चला आयोजित करण्यात आलेला हा स्पेसवॉक सात तास चालणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) हे पृथ्वीच्या खालच्या अंतराळ कक्षेत 400 किलोमीटर आकाशात तरंगणारे एक अंतराळ स्थानक आहे. या कृत्रिम उपग्रहावर मानवाचा अधिवास शक्य झाला आहे. 
 • 1998 साली या बहू-राष्ट्रीय प्रकल्पाचा पहिला भाग अंतराळात पाठवण्यात आला. ISS वर सध्या अमेरिका, रशिया, कॅनडा आणि जपान या देशांचे अंतराळवीर कार्यरत आहेत.


स्किल इंडिया मिशन-सदिच्छा दूत अनुष्का शर्मा आणि वरुण धवन
 • अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची केंद्र सरकारच्या 'स्किल इंडिया मिशनच्या' सदिच्छा दूतपदी नियुक्ती 
 • त्यांच्या चित्रपटातून - 'सुईधागा' मधून कौशल्यपूर्ण प्रशिक्षणाचे महत्त्व नमूद केले आहे.
 • स्किल इंडिया मिशन 15 जुलै 2015 रोजी नरेंद्र मोदी यांनी योजनेची सुरुवात केली होती.
 • अभियान उद्दिष्ट - 2022 पर्यंत 40 कोटी भारतीयांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण पुरवणे


राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण, महाराष्ट्रातील 6 जणांचा सन्मान, कर्नाटकच्या 107 वर्षीय आजींचा गौरव
 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज 58 पुरस्कार्थींना पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सकाळी राष्ट्रपती भवन इथं हा सोहळा संपन्न झाला. 
 • 11 मार्च रोजी राष्ट्रपतींनी 1 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 45 पद्मश्री पुरस्कार प्रदान केले होते.
 • महाराष्ट्रातील 6 जणांचा सन्मान केला. यात डॉ. अशोकराव कुकडे,  अनिलकुमार नायकजी, दिन्यार आर. कॉन्ट्रॅक्टरजी, मनोज बाजपेयी, डॉ. सुदाम काटेजी, शब्बीर सय्यद यांना आज राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 • 107 वर्षांच्या थिमक्का जेव्हा देशाच्या राष्ट्रपतीच्या डोक्यावर हात ठेवतात
  यावेळी कर्नाटकच्या 107 वर्षीय सालुमरदा थिमक्का यांनाही पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
 • पद्म पुरस्काराने देशातील सर्वात श्रेष्ठ आणि योग्य प्रतिभाशाली व्यक्तींना सन्मानित करणे आनंददायी असते.


अॅस्ट्रोसॅटने ‘ग्लोब्युलर क्लस्टर NGC 2808’ मधील अतिनील तार्यांचा पुंजका शोधला
 • भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’ या अंतराळ वेधशाळेपासून मिळविलेल्या माहितीच्या आधारे भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी 47,000 प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ‘ग्लोब्युलर क्लस्टर NGC 2808’ मधील अतिनील तार्यांचा (ultraviolet stars) पुंजका शोधून काढला आहे.
 • ‘ग्लोब्युलर क्लस्टर’ म्हणजे हजारो-लाखो तारे एकाग्र असल्याचे भासवत एकमेकांच्या गुरुत्वाकर्षणाद्वारे एकत्रितपणे स्वैराचार करतात. 
 • अॅस्ट्रोसॅट बाबत :अॅस्ट्रोसॅट (ASTROSAT) ही 1513 किलो वजनी भारताची पहिली समर्पित बहू-तरंगी अंतराळ वेधशाळा आहे. ही मोहीम दिनांक 28 सप्टेंबर 2015 रोजी पाठवण्यात आली. 
 • समुद्रसपाटीपासून 650 कि.मी. उंचीवर पृथ्वीच्या खालच्या विषुववृत्तीय कक्षेत प्रस्थापित करण्यात आले आहे. हे एकाचवेळी विविध तरंगांमध्ये वैश्विक क्ष-किरण स्रोत आणि दूरवर असलेले तारे शोधू शकण्यास सक्षम आहे.


मनु सोहनी: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन CEO
 • दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदी मनु सोहनी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • ICCचे विद्यमान CEO डेव्हिड रिचर्डसन हे इंग्लंडमध्ये होणार्‍या ICC विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर म्हणजेच जुलै 2019 या महिन्यात निवृत्त होत आहेत. 
 • मनु सोहनी हे व्यवसायिक प्रसार माध्यम क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून ओळखली जाते.


कर्नाटक सरकार ‘वर्षाधार’ क्लाऊड-सीडिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करणार
 • राज्यातल्या दुष्काळप्रणव भागात 76 तालुक्यांत येणार्‍या वर्षाऋतुत अधिकाधिक पाऊस पाडण्याकरिता कर्नाटक राज्य सरकारने ‘वर्षाधार’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • ‘प्रोजेक्ट वर्षाधार’ हा क्लाऊड-सीडिंग तंत्रावर आधारित असलेला प्रकल्प आहे. 2018 साली हा प्रकल्प राबवविला गेला होता, परिणामी 27.9% अधिक पाऊस राज्यात पडला.

क्लाउड सीडिंग म्हणजे काय?

क्लाउड सीडिंग (ढगांचे बीजारोपण) म्हणजे हवामानात सुधारणेचा एक प्रकार आहे, ज्यात ढगांपासून होणार्‍या पावसाचे प्रमाण सुधारण्यासाठी हवेमध्ये एक विशेष पदार्थ सोडल्या जातो. या प्रक्रियेसाठी सामान्यपणे सिल्वर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड आणि ड्राय आइस (सॉलिड कार्बन डाइऑक्साइड) शिवाय वायू रूपातले लिक्विड प्रोपेन वापरले जाते. क्लाऊड-सीडलींग प्रकल्पासाठी सामान्यपणे दुपारचे 1-4 वाजेपर्यंतचा काळ चांगला असतो. भारतात 2003 साली जल संसाधन मंत्रालयाने ‘प्रोजेक्ट वरुण’ या नावाने पहिला क्लाउड सीडिंग प्रकल्प राबवला होता.

Post a Comment

0 Comments