loading...

Daily Current Affiars 16 March 2019 (चालू घडामोडी)​​​निवडणूक आयोगाने लाँच केले cVIGIL अॅप, त्यात करु शकला मतदान संदर्भातील तक्रार
 • भारतीय निवडणूक आयोगाने 2019च्या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. एकूण 7 टप्प्यांत 2019च्या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. 
 • निवडणूक आयोगाने या वेळी cVIGIL मोबाइल अॅप लाँच केले आहे. ज्याच्या माध्यमातून देशभरातील मतदार त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या गडबडीची तक्रार चुटकीसरशी करु शकतील.
 •  विशेष म्हणजे तक्रार केल्याच्या 100 मिनिटातच त्यावर कारवाई केली जाणार आहे. चालू असलेल्या गडबडीचा पुरावा म्हणून मतदार फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतात.


ACKO जनरल इंशुरन्स’ कंपनीला ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट’ पुरस्कार
 • 2016 साली स्थापना झालेल्या ‘ACKO जनरल इंशुरन्स’ या भारताच्या प्रथम डिजिटल विमा कंपनीला ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट पुरस्कार-2019’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
 • हा पुरस्कार कंपनीच्या "ओला राइड इंशुरन्स" या मायक्रो इन्शुरन्स उत्पादनासाठी दिला गेला आहे. अलीकडेच दुबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात या पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
 • 1991 साली ‘कॉर्पोरेट नेतृत्व आणि उत्कृष्टता’ यासाठी दिल्या जाणार्या ‘गोल्डन पीकॉक अवॉर्ड’ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. भारताच्या ‘इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. 
 • स्थानिक आणि जागतिक पातळीवरील व्यवसायाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून आज या पुरस्काराला ओळखले जाते. 
 • त्याअंतर्गत दिला जाणारा ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट/सर्व्हिस अवॉर्ड’ हा विद्यमान बाजारपेठेच्या मागण्यांनुसार उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी संस्थात्मक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेला आहे.


पाकिस्तानात​ पहिल्यांदाच हिंदू महिलेकडे सभागृहाचे अध्यक्षपद
 • पाकिस्तान संसद सभागृहाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी पहिल्यांदाच हिंदू महिलेला मिळाली आहे.
 • कृष्णा कुमारी कोहली उर्फ किशू बाई असे त्यांचे नाव आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. पाकिस्तानमधील श्रमिकांच्या अधिकारांसाठी कृष्णा कुमारी कोहली यांनी अनेक वर्षे काम केले. त्यानंतर २०१८ मध्ये त्या संसदेवर निवडून आल्या. 
 • पाकिस्तान संसदेमध्ये निवडून येणाऱ्या कृष्णा पहिल्या महिला हिंदू खासदार आहेत. पाकिस्तानच्या संसदेच्या सभागृहातील सदस्यफैजल जावेद यांनी यासंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली आहे.
 • “मी आज या आसनावर बसून स्वत: ला फार भाग्यवान मानते “, असे म्हणून ४० वर्षीय कृष्णा कुमारी कोहली यांनी अधिवेशनाची सुरूवात केली. कृष्णा कुमारी या सिंध प्रांतातील थार येथील सुदूर नगरपारकर जिल्ह्यातील राहणाऱ्या आहेत. 
 • ३९ वर्षीय कृष्णा कुमारी यांचं वयाच्या १६ व्या वर्षीच लग्न झालं होतं. त्यावेळी इयत्ता नववीत शिकत होत्या. लग्नानंतरही त्यांनी शिक्षण सुरूच ठेवलं होतं. २०१३ मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्राची पदवी घेतली होती. 
 • त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावासोबत पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश करून सामाजिक कार्याला प्रारंभ केला होता. कृष्णा यांनी पाकिस्तानमध्ये महिला आणि अल्पसंख्यांक्याच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.


चर्चेत असणारी “फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत
 • निवडणुकीत वापरल्या जाणार्या ‘फर्स्ट पास्ट द पोस्ट’ पद्धतीमध्ये काळानुसार बदल करण्याची गरज भासत आहे, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी मांडले.
 • ज्या उमेदवाराला मतमोजणीत सर्वाधिक मते मिळतात त्याला निवड झाल्याचे घोषित करण्याची पद्धत (फर्स्ट पास्ट द पोस्ट पद्धत) भारतात पूर्वापार आहे.
 • या पद्धतीत काही त्रुटी आहेत. विशिष्ट मतदारसंघातील अधिकृतपणे मतदानास पात्र असलेल्या मतांच्या 1 टक्का इतके कमी मतदान झाले तरी झालेल्या जेमतेम काही हजार मतांच्या आधारावर तो निवडून येऊ शकतो.
 • भारतात मतदानाची सरासरी टक्केवारी 55 ते 60 टक्के इतकी असते. ही 60 टक्के मते अनेक उमेदवारांमध्ये विभागली जातात आणि बहुसंख्य मतदारसंघातल्या लढती तिरंगी किंवा त्याहून अधिक असतात. या परिस्थितीत राजकारणी मंडळी विविध युत्या नि आघाड्या करू शकतात आणि या जोडतोडीत असंख्य समाजघटक मोठ्या प्रमाणात बाहेर सारले जातात.


कर्नाटकाच्या ‘सिर्सी सुपारी’ला GI टॅग प्राप्त
 • कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड प्रदेशात उत्पन्न घेतल्या जाणार्या ‘सिर्सी सुपारी’ला भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले. 
 • येलपूरा, सिद्दापूरा आणि सिर्सी तालुक्यात देखील सुपारीचे पीक घेतले जाते.
 • भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. 
 • उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी. भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.


सी लालसावत्ता यांनी मिझोरमचे पहिल्या लोकायुक्त अध्यक्ष म्हणून शपथ घेतली
 • 11 मार्च 2019 रोजी निवृत्त आयएएस अधिकारी सी. लालसावता यांनी मिझोरममधील नव्याने गठित लोकायुक्त पदाची शपथ घेतली. 
 • आयझॉल येथे राजभवनात झालेल्या शपथविधी समारंभात नवीन नियुक्त मिझोरम राज्यपाल जगदीश मुखी यांनी त्यांना पदाधिकारी व गोपनीयतेची शपथ दिली.
 • मुख्यमंत्री झोरमथंगा आणि मिझोराम विधानसभा सभापती, आमदार व वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव लालनुमाविया चुआंगुनो होते, जो नवीन लोकायुक्त अध्यक्षांचे धाकटे भाऊ आहेत.
 • सी लालसावता हे 1981 चे बिहार कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 63 वर्षीय लालसावता 40 वर्षांहून अधिक काळापासून सरकारी सेवा करत आहेत.
 • 1981 मध्ये आयएएसमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी दोन वर्ष भारतीय ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिसचा सदस्य म्हणून काम केले.
 • केंद्र सरकारच्या मुख्य सचिव / सचिव पदावर दक्षता संस्थेचे प्रमुख म्हणून ते आयएएस एपेक्स स्केल येथे पोहोचले.
 • मिझोरम लोकायुक्त कायदा 2014 मध्ये राज्य विधानमंडळाद्वारे करण्यात आला होता परंतु त्याची स्थापना विलंब झाली कारण 14 व्या वित्त आयोगाने तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मागणीनुसार निधी मंजूर केला नव्हता.

Post a Comment

0 Comments