Daily Current Affiars 15 March 2019 (चालू घडामोडी)


पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
 • लाभार्थी - 2 हेक्टर मर्यादा असलेले गरीब व अल्पभूधारक शेतकरी
 • योजना स्वरूप - प्रत्येकी 2000 रुपये 3 हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
 • देशातील 12 कोटी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ
 • योजना पूर्वलक्षी लागू होणार
 • 31 मार्च 2019 पूर्वी प्रथम हप्ता खात्यात जमा केला जाणार.
 • 2019-20मध्ये 75000 कोटी रुपये योजनेसाठी तरतूद

​कर्नाटकाच्या ‘सिर्सी सुपारी’ला GI टॅग प्राप्त
 • कर्नाटक राज्याच्या उत्तर कन्नड प्रदेशात उत्पन्न घेतल्या जाणार्या ‘सिर्सी सुपारी’ला भौगोलिक खूण (GI) टॅग प्राप्त झाले. येलपूरा, सिद्दापूरा आणि सिर्सी तालुक्यात देखील सुपारीचे पीक घेतले जाते.

भौगोलिक खूण (GI)म्हणजे काय ?
 • भौगोलिक खूण (Geographical Indication) हे उत्पादनांवर छापले जाणारे चिन्ह आहे. या चिन्हामुळे उत्पादनाला विशेष भौगोलिक ओळख मिळते आणि त्याची मूळ गुणवत्ता दर्शवते. उदा. दार्जीलिंगची चायपत्ती, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी.
 • भारताच्या बौद्धिक संपदा अधिकार जाहिरात व व्यवस्थापन विभाग (Cell for IPR Promotion and Management -CIPAM) कडून भारतीय उत्पादनांना GI टॅग प्रदान केला जातो.

पद्मा लक्ष्मी:UNDPच्या सदिच्छा दूत
 • 8 मार्च 2019(आंतरराष्ट्रीय महिला दिनी) UNDP तर्फे नव्या सदिच्छा दूत पदी भारतीय वंश असलेल्या
 • अमेरिकेच्या निवासी असलेल्या पद्मा लक्ष्मींची निवड
 • त्या जगभरात असलेल्या असमानता आणि भेदभावविरोधी लढ्याचे समर्थन करणार
 • त्या प्रसिद्ध उद्योजिका& लेखिका आहेत.अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या दूत आहेत.
 • संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
 • संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) राबविण्यात येणारा प्रमुख विकास कार्यक्रम

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2018
 • डोगरी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक , चित्रपट लेखक , दिग्दर्शक वेद राही यांना जाहीर
 • पुरस्कार - YCMOU नाशिकद्वारे प्रदान केला जातो.
 • YCMOU सध्या कुलगुरू प्रा. ई. वायूनंदन यांनी घोषणा वेद राही यांच्या नावाची घोषणा केली.
 • 1983 साली 'आले' या डोगरी भाषेतील कादंबरीसाठी वेद राही यांना 'साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त
 • 1990 साली महाराष्ट्र शासनाने 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार देऊन राही यांना सन्मानित केले आहे.
 • 2011 - 'महापंडित राहुल संक्रीतायायन 'पुरस्कार
 • 2012 - जम्मू काश्मीरचा ' जीवनगौरव पुरस्कार

NRETP प्रकल्पाला जागतिक बँक 250 दशलक्ष डॉलरचे कर्ज देणार
 • भारताच्या 13 राज्यांच्या ग्रामीण भागांमध्ये राहणार्‍या नागरिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भारत सरकारने चालविलेल्या ‘राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प’ (NRETP) या कार्यक्रमाला जागतिक बँकेकडून 250 दशलक्ष डॉलर (जवळपास 38.82 कोटी रुपये) एवढ्या रकमेचे कर्ज दिले जाणार असून त्यासंबंधीच्या करारावर भारत सरकार आणि जागतिक बँक यांची स्वाक्षरी झालेली आहे.
 • हा निधी ग्रामीण कुटुंबातल्या महिलांना कृषक आणि अकृषक उत्पादनांसाठी व्यवहार्य उपक्रम विकसित करण्यास मदत करेल. 
 • प्रकल्पाविषयी : भारत सरकार ‘दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मोहीम’ (DAY-NRL) अंतर्गत ‘राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प’ (National Rural Economic Transformation Project -NRETP) या कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.
 • या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून वित्तपुरवठा होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे उच्चस्तरीय हस्तक्षेपांमुळे डिजिटल अर्थसहाय्य आणि उपजीविकेच्या क्षेत्रात केल्या जाणार्‍या हस्तक्षेपांच्या बाबतीत वृद्धी करणार्‍या उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, असे अपेक्षित आहे. 
 • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार मोहीम (NRLM) भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे अंमलबजावणी करण्यात आलेला एक दारिद्र्य निर्मूलन प्रकल्प आहे. 1999 साली स्वर्णजयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना (SGSY) सुरू केली गेली. पुढे 2011 साली योजनेला NRLM मध्ये बदलण्यात आले.

अमेरिका देशाबाहेरील त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या मार्गावर
 • संयुक्त राज्ये अमेरिकेच्या सरकारने देशाबाहेर कार्यरत असलेली त्यांची इमिग्रेशन सेवा कार्यालये बंद करण्याच्या दिशेने पावले उचललेली आहे.
 • अमेरिकेच्या सिटिजनशीप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस या विभागाने स्पष्ट केलेल्या माहितीनुसार, सरकार 20 देशांमधील त्यांची कार्यालये बंद करण्यासंबंधीच्या चर्चेच्या प्रारंभिक टप्प्यावर आहे. 
 • देशांतर्गत प्रश्नांना संबोधित करण्यासाठी आणि त्यामधून वर्षभरात लाखो डॉलर्सची रक्कम बचत करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात आहे.
 • सद्यस्थितीत ब्रिटन, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, इटली, भारत, फिलीपिन्स, चीन आणि इतर देशांमध्ये अमेरिकेची इमिग्रेशन सेवा कार्यालये असून तिथे जवळपास 70 कर्मचारी कार्यरत आहेत. 
 • संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिका उपखंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि यूएस डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

Post a Comment

0 Comments