Daily Current Affiars 11 March 2019 (चालू घडामोडी)


जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ : सौम्या स्वामीनाथन
 • जागतिक आरोग्य संघटनेनी (WHO) त्याच्या नव्या विभागाचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून सौम्या स्वामीनाथन यांची नेमणूक केली आहे.
 • संघटनेनी ‘डिजिटल आरोग्य विभाग’ (Department of Digital Health) नावाचा नवा विभाग तयार केला आहे आणि त्यासाठी मुख्य शास्त्रज्ञ हे पद तयार केले आहे.
 • अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगाने बदलत चाललेल्या आरोग्य सेवांच्या योग्य व्यवस्थापनासाठी हा विभाग जबाबदार असणार आहे. हा विभाग डिजिटल तंत्रज्ञानाचे मूल्यांकन करण्यामध्ये आपली भूमिका वाढवेल आणि देशांना समर्थन कसे द्यावे आणि त्यांचे नियमन कसे करावे याबद्दल निर्णय घेण्यास मदत करणार आहे.
 • सौम्या स्वामीनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या तीन उप-महासंचालकांपैकी एक होत्या, ज्या WHO महासंचालक टेड्रोस अॅदोनोम गेब्रेयेसुस यांना मदत करत होत्या.
 • जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे.
 • दिनांक 7 एप्रिल 1948 रोजी स्थापन करण्यात आलेल्या WHOचे जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे.
 • हा संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा एक सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती.


हवाई दल व नौदल प्रमुखांना झेड प्लस सुरक्षा देणार
 • भारतीय नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांना आता झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार त्यांना धोका असल्याचे दिसून आले आहे. 
 • हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ व नौदल प्रमुख सुनील लांबा यांना झेड प्लस सुरक्षा दिली जाणार असून, लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना आधीच ती देण्यात आली आहे.
 • संबंधित दलांमधील कमांडोच त्यांच्या नजीकच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत, सुरक्षेच्या पुढच्या कडीत केंद्रीय व राज्य सुरक्षा संस्थांचे जवान असतील. 
 • भारत वपाकिस्तान यांच्यातील तणाव काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान मारले गेल्यानंतर वाढला होता.
 • त्यानंतर भारताने पाकिस्तानात शिरून बालाकोट या खैबर पख्तुनवा प्रांतातील जैशच्या छावणीवर हवाई हल्ले केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काश्मीरमध्ये लष्करी आस्थापनांना लक्ष्य करीत हवाई हल्ले केले होते. 
 • पाकिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरात एफ १६ विमानासह एकूण २४ लढाऊ जेट विमाने सामील होती.


कोयंबटूरमध्ये IAFच्या दोन तुकडींना ‘प्रेसिडेंट्स कलर’ दिले
 • दिनांक 4 मार्च 2019 रोजी कोयंबटूरजवळ सुलूर तळावर एका कार्यक्रमात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन तुकडींना ‘प्रेसिडेंट्स कलर’ प्रदान करून गौरवांकीत केले आहे.
 • सुलूर सुविधेत काम करणारे ‘5-बेस रिपेयर डेपो’ आणि हैदराबादच्या हकीमपेठ जवळील प्रशिक्षण केंद्र या दोन तुकडींना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
 • राष्ट्रपती मानक/रंग (presidential standard/President’s Colour) किंवा राष्ट्रपती ध्वज हा एक सन्मान आहे, जो राज्यप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष यांचे प्रतीक किंवा राजेशाही मानक म्हणून अनेक देशांमध्ये वापरला जातो. 
 • संरक्षण दलाला मिळणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. भारतात 26 जानेवारी 1950 पासून हा सन्मान भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून प्रदान केला जात आहे.


पद्मा लक्ष्मी: UNDPच्या नव्या सदिच्छा दूत
 • 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनी, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) तर्फे त्याच्या नव्या सदिच्छा दूत (गुडविल अॅम्बेसेडर) पदी भारतीय वंश असलेल्या अमेरिकेच्या निवासी असलेल्या पद्मा लक्ष्मी यांची निवड करण्यात आली आहे.
 • पद्मा लक्ष्मी या जगभरात असलेल्या असमानता आणि भेदभावविरोधी लढ्याचे समर्थन करणार. त्या एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व, उद्योजिका आणि लेखिका आहेत. त्या अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनच्या दूत आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) :
 • हे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे (UN) राबविण्यात येणारा एक प्रमुख विकास कार्यक्रम आहे. 1965 साली याची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आहे. 
 • हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्रसंघ आमसभेच्या सहा विशेष मंडळांपैकी एक असून तो आर्थिक व सामाजिक परिषदेच्या अखत्यारीत येतो.
 • ह्या कार्यक्रमद्वारे जगातील 177 देशांमध्ये नागरिकांना राहणीमान सुधारण्याची संधी उपलब्ध केली जाते. दारिद्र्य निर्मुलन, HIV/एड्स इत्यादी रोगांचे उच्चाटन, लोकशाहीचा प्रसार तसेच मानवी हक्कांसाठी लढा इत्यादी अनेक लोकोपयोगी उपक्रम यामार्फत चालवले जातात.


एशियाड २०२२ मध्ये क्रिकेटचा पुन्हा समावेश,टी20 सामने रंगणार
 • चीनच्या हांगझूमध्ये 2022 साली होणाऱ्या एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या बैठकीत 2022 सालच्या एशियाड खेळांच्या यादीत क्रिकेटला स्थान देण्यात आलं आहे. 
 • 2010 सालच्या ग्वांगझू आणि 2014 च्या इंचिऑन एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पण गेल्या वर्षी (2018) जकार्ता एशियाडमधून क्रिकेटला वगळण्यात आलं होतं. त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश होणार आहे.
 • T20 फॉरमॅट क्रिकेटचा (महिला-पुरुष) 2022 च्या एशियाडमध्ये समावेश करण्यात आला आहे. आता भारतीय ऑलिम्पिक संघ याबाबत बीसीसीआयलापत्र लिहिणार आहे. 
 • मात्र भारतीय क्रिकेट संघया खेळांमध्ये सहभाग घेणार की नाही, याबाबत बीसीसीआयकडून स्पष्टीकरण अजून आलेलं नाही. याआधी संघाच्या व्यस्त वेळापत्रकाचा हवाला देत भारत एशियाडमधून बाहेर राहिला होता. 
 • 2010 आणि 2014 च्या एशियाडमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता, पण त्यावेळी बीसीसीआयने बिझी शेड्यूल असल्याचं सांगत संघांना पाठवलं नव्हतं.
 • एशियाड खेळांच्या आयोजनासाठी आणखी बराच वेळआहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताच्या प्रतिनिधित्वाबाबत चर्चा करण्यासाठी बीसीसीआयला बराच वेळ मिळेल. भारत वगळता श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या नियमित क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी एशियाडमध्ये सहभाग नोंदवला आहे. 
 • श्रीलंका आणि पाकिस्तानने 2014 मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं, तर 2010 मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानने बाजी मारली होती.


चेन्नई पोर्ट ट्रस्टला विक्रीद्वारे एकल प्रक्रियेला तात्विक मंजुरी
 • केंद्रीय मंत्रिमंडळाची कामराजार बंदर मर्यादित मधील 100 टक्के सरकारी समभागांच्या धोरणात्मक विनिवेशासाठी.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत केंद्रीय मंत्रिमंडळाने आज कामराजार बंदर मर्यादित मधील 100 टक्के सरकारी समभागांच्या धोरणात्मक विनिवेशासाठी चेन्नई पोर्ट ट्रस्टला  धोरणात्मक विक्रीद्वारे एकल प्रक्रियेला तात्विक मंजुरी  दिली.
 • सध्या, कामराजार बंदर मर्यादितमध्ये, भारत सरकार आणि चेन्नई पोर्ट ट्रस्टचे अनुक्रमे  67 टक्के आणि 33 टक्के समभाग आहेत. नीती आयोगाने मूल्यमापन पद्धतीने केलेल्या शिफरशीनुसार, रोख स्रोतात सूटीसह  मालमत्तेचे मूल्यमापन  आणि सापेक्ष मूल्यांकन समाविष्ट करणे आवश्यक आहे.
 • यामुळे मानवसंसाधनातील चांगल्या व्यवस्थापनामुळे  बंदरांमधील अव्यवहारिक  दुप्पट क्षमता निर्मिती टाळण्यास मदत मिळेल आणि दोन बंदरांमधील कार्यक्षमता वाढेल.  
 • व्यवहारासाठी नियुक्त केलेल्या सल्लागारांच्या मदतीने दोन्ही संस्थांनी सावधगिरीचा अभ्यास केल्यावर केपीएलची धोरणात्मक  पुनर्गुंतवणूक  केली जाईल.
 • हि मंजुरी म्हणजे  दोन्ही बंदरांसाठी इष्टतम व्यवसाय धोरण तयार करून लक्षित क्षेत्रांवर स्पष्ट धोरण विकसित करणे होय.

Post a Comment

0 Comments