loading...

Daily Current Affiars 28 February 2019 in Marathi

OSCAR 2019 LIVE : ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
 • 'रोमा' आणि 'द फेव्हरिट' या दोन चित्रपटांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी दहा नामांकने मिळाली आहेत.
 • कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये हा दिमाखदार सोहळा पार पडत आहे. 
 • अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती या सोहळ्यासाठी लाभली आहे. यंदाचा ऑस्कर कोणत्या चित्रपटाला मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 
 • ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’, ‘रोमा’ , ‘ब्लॅक पँथर’मध्ये चुरस पाहायाला मिळत आहे. आतापर्यंत ‘दी बोहेमियन ऱ्हाप्सडी’ आणि ‘रोमा’ च्या खात्यात चार आणि   ‘ब्लॅक पँथर’ च्या खात्यात प्रत्येकी दोन ऑस्कर जमा झाले आहेत.
 • यंदाच्या ऑस्कर सोहळा काही दिवसांपूर्वी वादात सापडला होता. ‘दी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेस’ने चार मोठ्या श्रेणीतील पुरस्कार यंदा ऑफ एअर देण्याचा निर्णय घेतला होता 
 • त्यामुळे मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर १९८९ नंतर पहिल्यांदाच हा सोहळा सुत्रसंचलकाशिवाय पार पडत आहे.


२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस
 • २८ फेब्रुवारी १९२८ रोजी सर सी.व्ही.रामन यांनी Raman Efect चा शोध लावल्याबद्दल हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस घोषित केला गेला. 
 • याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक भारतीयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे होय.
 • भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. 
 • पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या.
 • आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. आपण 'विज्ञानयुग' आहे असं म्हणतो, कारण गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षात, विज्ञानाची प्रगती फार प्रचंड वेगानं झाली.


कणेरी मठावर साकारले देशातील पहिले डिव्हाईन गार्डन
 • तब्बल ११ कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत.
 • कॅकटसचे एक हजार, गुलाबाचे दोन हजार, जास्वंदाच्या १४० प्रकारांसह इतर फुलांचे शेकडो प्रकार
 • देशी गायीची महाकाय ५० फूट उंचीची मूर्ती
 • देशातील प्रत्येक राज्यातील संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्तीही बागेत

कोल्हापूर:
 • हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची संस्कृती दर्शविणारे देशातील पहिले डिव्हाईन गार्डन कणेरी (ता. करवीर) येथे साकारत आहे. तब्बल ११ कोटी रुपये खर्चाचे हे गार्डन सहा एकरांत पसरले आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गार्डनचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या सप्ताहात हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. 
 • विविध वनस्पतींबरोबर कोल्हापूरची वैशिष्ट्ये दाखवणाऱ्या छटा या गार्डनची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, मठाला भेट देणाऱ्या भाविकांच्या श्रमदानातून हे गार्डन साकारले आहे. 
 • याशिवाय देशभरातील कलाकारांनी कलेच्या माध्यमातून गार्डनमधील शिल्पांना आकर्षक बनविण्याचे काम केले आहे. दोन लाख कुंड्यांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे.


नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात स्नान करणारे दुसरे पंतप्रधान; 'हे' होते पहिले
 • प्रयागराज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रयागराज येथे त्रिवेणी संगमानत स्नान केले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांच्यानंतर स्नान करणारे मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
 • नरेंद्र मोदी हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ त्यांनी केला. त्यानंतर गोरखपूरला त्यांची जाहीर सभा झाली. त्यानंतर पंतप्रधान प्रयागराज इथं गेले. 
 • त्यांनी संगमावर पवित्र स्नान केलं आणि गंगापूजन करत आरतीही केली.या आधी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 1954 मध्ये कुंभमेळ्यादरम्यान गंगेत स्नान केलं होतं. 
 • दिव्य कुंभ, भव्य कुंभ हे यावेळच्या मेळ्याचं घोषवाक्य होतं. दरम्यान यावेळी कुंभ हा सर्व जगाला सांस्कृतिक धाग्यात जोडणारा दुवा असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. स्वच्छता आणि व्यवस्थापनाची यावेळी सरकारने अतिशय चांगली व्यवस्था केली होती.


भारताने या कारवाईच्यावेळी पाकिस्तानला दणका देण्यासाठी वापरलेली पाच शस्त्रे
 • हवाई हल्ल्यासाठी मिराज २००० विमानांचा वापर करण्यात आला. ग्वालियर येथील तळावरुन या फायटर जेटसनी उड्डाण केले. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या डासू कंपनीनेच या विमानांची निर्मिती केली आहे. १९८० च्या दशकात मिराज २००० विमाने इंडियन एअर फोर्समध्ये दाखल झाली.
 • जीबीयू-१२ हा अमेरिकन बनावटीचा लेझर गाईडेड बॉम्ब आहे. अचूक आणि नेमका हल्ला करण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो.
 • बॉम्बफेक करताना पाकिस्तानी हवाई दलाने उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा सामना करण्यासाठी मॅट्रा मॅजिक क्लोज कॉम्बॅट मिसाइलही मिराजमध्ये बसवण्यात आले होते. मॅट्रा ही फ्रान्सची कंपनी आहे. एअर टू एअर लढाईसाठी हे मिसाइल वापरण्यात येते.
 • लाइटनिंग पॉड – लक्ष्याचा माग काढून टार्गेटवर अचूक बॉम्ब फेक करण्यासाठी या लेझर पॉडचा वापर करण्यात आला. जगातील अत्याधुनिक हवाई दले या पॉडचा वापर करतात.
 • भारताची बारा १२ मिराज विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली त्यावेळी स्वदेशी बनावटीच्या ‘नेत्र’ या एअरबॉर्न अर्ली वॉर्निंग विमानाद्वारे बारा विमानांमध्ये समन्वय ठेवण्यात आला. नेत्र हे अत्याधुनिक रडारने सुसज्ज असलेले विमान आहे. हवाई हल्ल्याच्यावेळी योग्य समन्वय आणि टार्गेट हेरण्यासाठी मदत या विमानाने केली.

Post a Comment

0 Comments