Daily Current Affiars 24 February 2019 in Marathi


भारताने मोरोक्कोसोबत चार सामंजस्य करार केलेत करार

ते करार पुढील क्षेत्रात झाले आहेत.
 • दहशतवाद-विरोधी कार्यक्रमात सहकार्यासाठी एक संयुक्त कृतीदल तयार करण्यासाठी
 • गृहनिर्माण व मानवी वसाहत या क्षेत्रात सहकार्यासाठी
 • बिजनेस व्हिसासंबंधी प्रक्रियेत दोन्ही बाजूने सुलभता आणण्यासाठी
 • युवा कल्याण या क्षेत्रात सहकार्यासाठी
 • मोरोक्को हा उत्तर आफ्रिका भागातला एक देश आहे. ‎रबात हे देशाचे राजधानी शहर आहे. मोरोक्कन दिरहम हे राष्ट्रीय चलन आहे. 
 • मोरोक्को आफ्रिकेतला एकमेव असा देश आहे, जो आफ्रिका संघाचा (AU) सदस्य नाही. मोरोक्को अरब संघाचा सदस्य आहे. 
 • अटलांटिक महासागर व भूमध्य समुद्र या दोन्हीचे किनारे लाभलेल्या फ्रान्स व स्पेननंतर मोरोक्को हा असा एकमेव देश आहे.


‘भारतीय मुद्रांक अधिनियम-1899’ यामध्ये दुरूस्ती करण्यास राष्ट्रपतींची संमती
 • भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ‘भारतीय मुद्रांक अधिनियम-1899’ यामध्ये प्रस्तावित दुरूस्ती करण्यास आपली संमती दिली आणि त्यासंबंधी विधेयकावर स्वाक्षरी केली आहे.
 • प्रस्तावित दुरूस्तीमुळे मुद्रांक शुल्क आकारण्यासंबंधीची यंत्रणा तर्कसंगत आणि सुसंगत करण्यासाठी आणि कर चुकवेगीरीला आळा घालण्यासाठी मदत होणार.
 • कायद्यामधील ही दुरुस्ती ‘वित्त अधिनियम-2019’ याचा एक भाग म्हणून सादर करण्यात आली होती आणि संसदेकडून मंजूर केली गेली. 
 • एका इन्स्ट्रुमेंटवर (म्हणजे समभाग, IPO/FPO इ.) एकाच संस्थेद्वारे एकाच जागी सिक्युरिटीज मार्केट इन्स्ट्रुमेंट्सवरील मुद्रांक शुल्क (stamp duty) गोळा करण्यास राज्यांना सक्षम करण्यासाठी कायदेशीर आणि संस्थात्मक यंत्रणा तयार करणे हा या दुरुस्तीचा उद्देश आहे.


हलक्या लढाऊ तेजस विमानाला FOC प्रमाणपत्र मिळाले
 • दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी भारताच्या ‘तेजस’ या देशी वजनानी हलक्या लढाऊ विमानाला (LCA) शस्त्रास्त्रांनी सुसज्जीत लष्करी जेट-विमान म्हणून भारतीय हवाई दलामध्ये सामील करवून घेण्यासाठी सेंटर फॉर मिलिटरी एयरवर्दीनेस अँड सर्टिफिकेशन (Cemilac) या लष्करी हवाई नियामकाकडून अंतिम परिचालन निर्दोषत्व प्रमाणपत्र (final operational clearance certificate -FOC) प्राप्त झाले आहे.
 • हवाई दलाचे प्रमुख एयर मार्शल बी. एस. धानोआ यांना रिलीज-टू-सर्व्हिस कागदपत्रे बेंगळुरू येथे ‘एरो इंडिया 2019’ दरम्यान सोपविण्यात आली आहे.
 • तेजस विमान भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) याच्या एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या स्वायत्त संस्थेद्वारा देशातच विकसित केले गेले आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून याचे उत्पादन केले गेले. 
 • हे वजनानी हलके व बहू-भूमिका बजावणारे चौथ्या पिढीचे एक इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. हे विमान हवेतून जमिनीवर हल्ला करण्यास तसेच विमानाद्वारे हवेतच इंधन भरण्यास सक्षम आहे.


डॉ. दिव्या कर्नाड यांना नेदरलँडचा प्रतिष्ठित ‘फ्यूचर फॉर नेचर 2019 पुरस्कार’ जाहीर
 • अशोक विद्यापीठाच्या पर्यावरण-विषयक अभ्यासाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. दिव्या कर्नाड यांना अन्य दोघांसोबत प्रतिष्ठित ‘फ्यूचर फॉर नेचर 2019 पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
 • फर्नांड आब्रा (ब्राझील) आणि ऑलिव्हिएर सेंजीमाना (रवांडा) यांना देखील हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार नेदरलँडमध्ये 3 मे 2019 रोजी एका सोहळ्यात दिला जाणार आहे.
 • शार्क आणि ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या शाश्वत मासेमारीसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामासाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 
 • डॉ. कर्नाड यांनी ‘इनसिजन फिश’ या त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या कोरोमंडल तटाजवळ होणार्या शार्कच्या अवाजवी मासेमारीला आळा घालण्यात यश मिळवले.


तृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळाची स्थापना
 • राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
 •  सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत.
 • तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल. 
 • याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments