loading...

Daily Current Affiars 24 February 2019 in Marathi


वर्दीतली दर्दी लोकं ! मुंबईत रंंगतंय देशातलं पहिलं 'पोलीस साहित्य संमेलन'
 • ऐरवी नेहमी हातात शस्त्र, काठ्या घेवून समाजकंटक, आंदोलकांना पांगविणारे आणि नेत्यांच्या बंदोबस्तात दिवसरात्र व्यस्त असलेले आढळून येणारे खाकी वर्दीवाल्यांकडून आता चक्क कविता, चारोळी, शौर्यगीत आणि साहित्यावरील चर्चा, मतमतांतरे ऐकू येणार आहेत. 
 • तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही पण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यादाच ही घटना घडत आहे. महाराष्टÑ पोलिसांचे साहित्य संमेलन सोमवार, २५ फेब्रुवारीला मुंबईत भरत आहे.


आयर्लंडला ‘अफगाणी’ तडका, टी-२० सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येची नोंद
 • कांगारुंचा २६३ धावांचा विक्रम काढला मोडीत देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात येत असलेल्या आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० सामन्यात आज इतिहासाची नोंद झाली आहे. 
 • ३ गड्यांच्या मोबदल्यात २७८ धावांपर्यंत मजल मारत अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा २६३ धावांचा विक्रम मोडीत काढला. 
 • २०१६ साली श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाने या विक्रमाची नोंद केली होती. हजरतउल्ला झजाई (६२ चेंडूत १६२ धावा) आणि उस्मान घानी (४८ चेंडू ७३ धावा) यांनी सलामीच्या जोडीसाठी २३६ धावांची भागीदारी रचत आणखी एका विक्रमाची नोंद केली. 
 • हजरतउल्लाच्या नाबाद १६२ धावा या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही आशियाई फलंदाजाने केलेल्या सर्वोत्तम धावा ठरल्या आहेत. अफगाणिस्तानने दिलेलं २७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडनेही चांगली लढत दिली. 
 • मात्र त्यांचा संघ २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १९४ धावांपर्यंत मजल मारु शकला. या विजयासह अफगाणिस्तानने ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे


जपानचे यान उतरले लघुग्रहावर
 • जपानचे एक यान ‘हायाबुसा-2’ एका लघुग्रहावर यशस्वीरीत्या उतरले आहे. ‘रियुगु’ नावाच्या या लघुग्रहावर उतरून ते तेथील नमुने गोळा करणार आहे. जून 2018 मध्ये ते साडेतीन वर्षांचा प्रवास करून या लघुग्रहाजवळ जाऊन पोहोचले होते. 
 • ते लघुग्रहावरील नमुने घेऊन पुढील वर्षी पृथ्वीवर परतणार आहे.हा लघुग्रह सुमारे 1 किलोमीटर रुंदीचा आहे. ‘सॅम्पलर हॉर्न’ नावाच्या उपकरणाच्या सहाय्याने हे यान तेथील नमुने गोळा करीत आहे. ते लघुग्रहावर उतरत असतानाच उडालेल्या ठिकर्यांचे नमुनेही यामध्ये असतील. 
 • ‘हायाबुसा-2’ प्रकल्पाचे व्यवस्थापक युची त्सुदा यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, यानाने अतिशय यशस्वीपणे लँडिंग केले. त्यावेळी बुलेट फायरिंगही अपेक्षेप्रमाणे झाली. अत्यंत अचूक स्थितीत हे टचडाऊन झाल्याचा आम्हाला आनंद आहे. ‘रियुगु’ हा सी-टाईप या गटातील एक अवकाशीय खडक आहे.


बॅडमिंटनपटू सिंधूने इतिहास रचला, स्वदेशी 'तेजस'ने भरारी घेणारी पहिला महिला
 • बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये विरोधी खेळाडूला नामोहरण करणारी ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूने इतिहास रचला आहे. 
 • 23 वर्षीय सिंधू स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या फायटर विमानाने भरारी घेणारी पहिला महिला ठरली आहे. 
 • बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पाच दिवसीय एअर शोदरम्यान सिंधून 'तेजस'मधून भरारी घेत इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले.
 • हिदुस्थानच्या वायुसेनेमध्ये नुकतेच तेजसचा समावेश करण्यात आला आहे.
 • तेजसची निर्मिती हिंदुस्थान एअरोनॉटिक्स कंपनीद्वारे करण्यात आली आहे. हलक्या वजनाच्या या फायटर विमानाने सह-पायलट म्हणून भरारी घेणारी सिंधू पहिला महिला ठरली.


देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत
 • केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस 'केपी-बॉट'चे उद्घाटन केले.
 • केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. 
 • हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे.


स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य
 • स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे.
 • केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. 
 • केजरीवाल यांनी आज (ता.06) अधिकृत ट्विट करून ही माहिती दिली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार, शेतकऱ्यांना आता हमीभाव मिळेल.
 • दिल्ली राज्यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास 39000 इतकी छोटी असली तरी हा निर्णय मात्र मोठा असल्याचे बोलले जात आहे. या राज्यात एकूण 75000 ते 80000 एकर एवढी शेती आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल व उत्पादन वाढेल अशी शक्यता वर्वण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments