कुस्तीच्या आखाड्यात तिरंगा फडकवणारा राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'
- 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने राहुलचा सन्मान करण्यात येत आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात राहुल आवारेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
![]() |
राहुल आवारे ठरला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' |
- 'रूस्तम-ए-हिंद' हरिश्चंद्र उर्फ मामा बिराजदार आणि अर्जन पुरस्कारविजेते मल्ल काका पवार यांचा शिष्य असलेल्या राहुलने सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत. या स्पर्धेत त्याने प्रतिस्पर्ध्यांना सहजपणे नमवून सुवर्णपदकाला गवसणी घातली.
- तेव्हापासून तर मागील वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णयशापर्यंतचा विचार करता राहुलने विविध पातळ्यांवर सर्वोच्च यश मिळवले आहे.
- राहुलने २००९ मध्ये धडाकेबाज कामगिरी केली.उझबेकिस्तानमध्ये झालेल्या ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. त्याच वर्षी जर्मन ग्रां-प्रीमध्येही त्याने सर्वोच्च यश संपादन केले. जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत रौप्य आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून राहुलने २००९ हे वर्ष अविस्मरणीय केले.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2019
- केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2019’ याला मंजुरी दिली आहे. 2012 साली आखलेल्या राष्ट्रीय धोरणाच्या जागी नवे धोरण आणले जाणार.
- ठरविलेले लक्ष्य - 2025 सालापर्यंत $400 अब्ज (जवळपास 26 लक्ष कोटी रुपये) एवढ्या रकमेची उलाढाल हे लक्ष्य साध्य करण्यासाठी आर्थिक विकासासाठी ‘इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा संरचना आणि उत्पादन’ (ESDM) क्षेत्राच्या संपूर्ण मूल्य-साखळीत देशांतर्गत उत्पादनास प्रोत्साहन देणे. यात 100 कोटी मोबाइल हँडसेटचे लक्ष्य ठेवले आहे.
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाची उद्दिष्टे
- ESDM क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी समर्थन देणे.
- देशात देशातच संरचित मायक्रोचिपचे उत्पादन देण्यास तसेच त्यांचा धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण आधारभूत संरचना क्षेत्रांमध्ये वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
- पर्यावरणाला अनुकूल अश्या पद्धतीने ई-कचर्याची सुरक्षितपणे विल्हेवाट, ई-कचर्याचे पुनरुत्पादन घेणारे उद्योग आणि ई-कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा विकास करण्यासाठी उद्योगांना संशोधन, अभिनवतेला प्रोत्साहन आणि समर्थन देणे.
- जागतिक स्पर्धात्मक ESDM क्षेत्रासाठी पर्यावरण-प्रणाली तयार करणे. स्थानिक उत्पादन आणि निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे.
- मोठ्या प्रकल्पांसाठी प्रोत्साहनपर विशेष पॅकेज प्रदान करणे आणि सेमिकंडक्टर सुविधा, डिसप्ले उत्पादन इत्यादी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणे.
- नवीन आणि सध्याच्या उद्योगांच्या विस्तारास प्रोत्साहन देण्यासाठी योग्य योजना आणि प्रोत्साहन पद्धती तयार करणे.
डिजिटल इंडिया पुरस्कार 2019
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती
तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत 22 फेब्रुवारी 2019 ला
डिजिटल इंडिया पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
- आयोजक - नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरतर्फे (NIC)
- वर्ष 2010 पासून दर दोन वर्षांनी हे पुरस्कार दिले जातात.
- यंदाचे हे पुरस्कारांचे 5वे वर्ष आहे.
- डिजिटलकरणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी विभागांचा या पुरस्कारांद्वारे सन्मान करण्यात येणार आहे.
पुरस्काराची वर्गवारी :
- उदयोन्मुख तंत्रज्ञान,
- सर्वोत्तम मोबाईल ॲप,
- सर्वोत्कृष्ट ऑनलाइन सेवा,
- ओपन डेटा चॅम्पियन,
- वेब रत्न-मंत्रालय / विभाग,
- वेब रत्न-राज्य / केंद्रशासित प्रदेश,
- वेब रत्न-जिल्हा,
स्थानिक प्राधिकरणाचा सर्वोत्तम डिजिटल उपकरण अशा वर्गवारीत हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींना द. कोरियाकडून सेऊल शांतता पुरस्कार
- दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी आज द. कोरियाच्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून-जे-इन यांची भेट घेतली.
- या भेटीवेळी मोदी यांना सेऊल शांती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.सेऊल शांती पुरस्कार 1990 पासून देण्यात येत आहे. याआधी संयुक्त राष्ट्राचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चान्सलर एंजेला मर्केल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
- या पुरस्कारासाठी जगभरातून 1300 नावांच्या शिफारसी आल्या होत्या. पुरस्कार निवड समितीने यामधून 150 उमेदवार निवडले गेले. त्यामधून मोदींचे नाव 'द परफेक्ट कॅन्डिडेट फॉर द 2018 सेऊल पीस प्राईज' निवडले गेले.
गोंदिया जिल्ह्यातील कचारगडला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
- कचारगड हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. देशाच्या अनेक राज्यातून दरवर्षी या ठिकाणी भाविक येतात. कचारगडच्या विकासासाठी देवस्थानला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
- कचारगडचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात यावा, महाराष्ट्र शासन आवश्यक तो सर्व निधी देईल असे श्री. फडणवीस म्हणाले. राष्ट्रीयस्तरावरचा गोंडी समाजाचा सांस्कृतिक उत्सव, महाअधिवेशन तथा कोया पुनेमनिमित्त सालेकसा तालुक्यातील धनेगाव येथील कचारगड येथे 17 फेब्रुवारीपासून पारी कोपार लिंगो मां काली कंकाली पेनठाना देवस्थान येथील यात्रेनिमित्त राष्ट्रीय गोंडवाना महा अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.
0 Comments