Daily Current Affiars 1 March 2019 in Marathi


राष्ट्रीय ई-प्रशासन पुरस्कार-2019
 यंदा माहिती तंत्रज्ञानासंबंधी 14 प्रकल्पांना हा पुरस्कार दिला गेला आहे. पुरस्कार विजेत्यांची नावे :
 • महाराष्ट्र बांधकाम उद्योग नियामक प्राधिकरणाचे 'महारेरा' (MahaRERA)
 • भारतीय रेल्वेचे ‘IRCTC रेल कनेक्ट’ मोबाइल अॅप
 • छत्तीसगड राज्य सरकारचे ‘खंजी ऑनलाइन' पोर्टल
 • हरियाणाचे भिवानी जिल्हा प्रशासन (अल्ट्रा-रिझोल्यूशन अन-मॅन्ड एरियल व्हेइकल (UAE) / ड्रोन आधारित जिओ ICT-एनेबल्ड मालमत्ता कर व्यवस्थापन प्रणाली)
 • उत्तरप्रदेशाच्या लखनऊच्या महसूल मंडळाचा ‘डिजिटल लँड’ प्रकल्प
 • इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय ई-प्रशासन विभागाचे ‘उमंग’ पोर्टल
 • NICचे ‘राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल 2.0’
 • मसुरी देहरादून विकास प्राधिकरणाची (देहरादून) ऑनलाइन मॅप प्रणाली
 • उत्तराखंड टेहरी गढवाल जिल्हा कार्यालयाचे ‘हॅलो डॉक्टर 555’ पोर्टल
 • तामिळनाडूसाठीचे पवन ऊर्जा अंदाज सेवा
 • नवकल्पना विभागामध्ये गुजरातची गिरिबाला क्रिएटिव्ह व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी
 • उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी राजस्थान सरकारचा 'आयस्टार्ट राजस्थान' प्रकल्प
 
National e-Governance Awards-2019
National e-Governance Awards-2019

पुरस्काराविषयी :
 • ई-प्रशासन संदर्भात पुढाकारांच्या अंमलबजावणीमध्ये उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. 
 • हा पुरस्कार सहा विभागांमध्ये दिला जातो. हा शाश्वत ई-प्रशासन संदर्भात पुढाकारांची संरचना आणि अंमलबजावणी करण्याच्या प्रभावी पद्धतींना प्रोत्साहन देणारा पुढाकार आहे.


संजय बर्वे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त बनले
 • राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 • तर मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना राज्याच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्याने सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती मिळाली आहे.


‘जीत’ प्रकल्प : क्षयरोगमुक्त महाराष्ट्र
 • राज्यातील १३ शहरांचा समावेश 'जीत' प्रकल्पाच्या माध्यमातून क्षयरोगमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त क्षयरुग्णांना वेळेवर व संपूर्ण उपचार घेण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे.
 • या उपक्रमात खासगी रुग्णालये तसेच शासकीय आरोग्य संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. 
 • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे 'राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम' अंतर्गत 'जीत' प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला.


“श्रेयस”: पदवीधरांना उद्योगांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मनुष्यबळ मंत्रालयाची योजना
 • केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून “स्किम फॉर हायर एज्युकेशन युथ इन अप्रेंटीसशीप अँड स्किल (SHREYAS / श्रेयस)” नावाची नवी योजना चालू करण्यात आली आहेत, ज्यामार्फत नव्या पदवीधारकांना संबंधित उद्योगांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 • मनुष्यबळ मंत्रालय, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय आणि कामगार व रोजगार मंत्रालय या तीन केंद्रीय मंत्रालयांच्या पुढाकारामधून चालवला जाणारा हा कार्यक्रम आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना अधिक कुशल, सक्षम बनविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.
 • श्रेयस पोर्टलवर शैक्षणिक संस्था आणि उद्योग लॉग-इन करू शकतात आणि त्यांच्या संबंधित मागण्या आणि प्रशिक्षणाची पूर्तता करेल.


पाकिस्तान सोबत जिनिव्हा करार का केला?
 • भारताचा बेपत्ता असलेला वैमानिक पाकिस्तानकडेच असल्याच भारतानं मान्य केलं आहे. 
 • तसेच भारतीय वैमानिकाला सुखरुप आमच्याकडे सोपवा अशी मागणीही भारतानं पाकिस्तानकडे केली आहे.  जर भारतीय वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात असेल, तर तो पर येऊ शकतो का? आणि या संपूर्ण हालचालींदरम्यान जिनिव्हा कराराचा वारंवार उल्लेख होत आहे.

काय आहे जिनिव्हा करार?

 • युद्ध कैदी कुणाला म्हणावे, त्यांना कशी वागणूक द्यावी याचे आंतरराष्ट्रीय नियम ठरवले गेले आहेत.
 • युद्धादरम्यान पकडल्या जाणाऱ्या लष्करी अधिकारी, जखमी जवान, संबंधित नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण करणे हा उद्देश आहे.
 • 1929 साली हा करार पहिल्यांदा अस्तित्वात आला. त्यात वेळेनुरुप बदल केले गेले. रेड क्रॉस या संस्थेनं यात पुढाकार घेतला.
 • खास करुन दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांच्या छळाचा मुद्दा गाजला आणि 1949 साली आणखी काही बदल केले गेले, त्यानंतर 194 देशांनी या कराराला मान्यता दिली.
 • युद्धकैंद्यांना कारावासात टाकता येत नाही तर फक्त युद्धात सहभागी होऊ नये म्हणून ताब्यात ठेवता येतं.

काय सांगतो हा जिनिव्हा करार ?

 • सैनिक पकडला गेल्या क्षणी हा करार लागू होतो.
 • युद्धकैद्याला त्याचा जन्म, जात, धर्माबद्दल विचारता येत नाही.
 • अशा युद्धकैद्यांना फक्त त्यांचं नाव, नंबर, पद आणि युनिटबद्दल विचारता येतं.
 • युद्धकैद्यांचा वापर जनतेच्या मनात रोष निर्माण करता येत नाही.
 • युद्धकैद्यांसोबत अमानवी व्यवहार, छळ करण्यावर बंदी आहे.
 • त्यांना भीती दाखवणे, धमकी देणे, त्याचा जीव धोक्यात येईल असे वर्तन करण्यावर बंदी असते.
 • युद्धकैद्यांचा अपमान होईल असं वर्तन करता येत नाही.
 • पकडलेल्या कैद्यांना वेळच्या वेळी खाण्यापिण्याची तसेच इतर मूलभूत सुविधा देणे बंधनकारक असतं.
 • जखमी सैनिकावर योग्य उपचार करावे लागतात.
 • युद्धकैद्यांवर वॉर क्राईमचा खटला दाखल करता येतो.
 • अशा युद्धबंदीना कायदेशीर मदत देणं बंधनकारक असतं.
 • युद्ध संपल्यावर युद्धकैद्यांना संबंधित देशाला तात्काळ सुपुर्द करणं बंधनकारक असतं.

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या वैमानिक परत येणार?

 • जो व्हिडिओ पाक मीडियात फिरतोय त्यावरुन तरी जिनिव्हा कराराचं पालन होत आहे असं दिसत नाही. 
 • काही काळानंतर तो व्हिडिओ अधिकृत साईट्सवरुन हटवण्यात आला त्याचं कारणही तेच असावं. 
 • जिनिव्हा कराराचं काटेकोर पालन केलं गेलं तर जसा चंदू परत आला तशीच भारतीय वैमानिक परत येण्याची आशा आपण करु शकतो.
 • पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी जम्मू काश्मीरच्या भागात घुसखोरी करुन बॉम्ब हल्ले केले.
 • पाकिस्तानच्या एका लढाऊ विमानाला भारतीय वायुसेनेनं नौशेराच्या लाम वॅलीमध्ये पाडलं, अशी
 • माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिली.
 • भारतीय वायुसेनेनं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला.
 • मात्र या कारवाईदरम्यान भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे.या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.


4G/LTE, 5G NR मोडेमसाठी नवी देशी इलेक्ट्रॉनिक चीप तयार करण्यात आली
 • बेंगळुरूच्या सिग्नलचीप या फॅब-लेस सेमीकंडक्टर कंपनीकडून 4G / LTE आणि 5G NR मोडेमसाठी भारतात प्रथमच संरचित केलेल्या सेमीकंडक्टर चीपचे अनावरण करण्यात आले आहे.
 • 'अगुम्बे' हे गुप्तनाव देण्यात आलेल्या चीपच्या SCBM34XX आणि SCRF34XX/45XX शृंखलेच्या चार चीप प्रसिद्ध करण्यात आल्या, त्या आहेत - SCBM3412, SCBM3404, SCRF3402, SCRF4502. ही चीप कंबाइंड मल्टी-स्टँडर्ड सिस्टम-ऑन-चिप (SoC) पद्धतीची आहे.
 • 'अगुम्बे' शृंखला SCRF1401 चीपच्या आधारावर तयार करण्यात आली. SCRF1401 ही 3G/4G आणि वाय-फाय संबंधी उच्च कार्यक्षमता संदर्भात वायरलेस मानकांसाठी भारतात तयार केलेली पहिली RF ट्रान्सरिसीव्हर चीप आहे, जी सिग्नलचिप कंपनीने तयार केली.
 • या इलेक्ट्रॉनिक चीपने भारताला मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या मूलभूत तंत्रज्ञानाचा मालक असलेल्या एका विशिष्ट देशांच्या गटात सामील होण्यास मदत केली आहे. या इलेक्ट्रॉनिक चीप संरक्षण क्षेत्रासारख्या विविध महत्त्वाच्या क्षेत्रात उपयोगात येणार्‍या उपकरणांमध्ये वापरल्या जाऊ शकतात.

Post a Comment

0 Comments