loading...

चालू घडामोडी 8 फेब्रुवारी 2019

loading...

नीला पाटील यांची स्वीडन पीएमओ सल्लागार पदी निवड
 • नीला पाटील (32) या स्वीडनचे नवनिर्वाचित पंतप्रधान तथा सोशल डेमोक्रॅट पक्षाचे नेते स्टीफन लोफव्हन यांच्यासोबत काम करणार आहेत. सोशल डेमोक्रॅट पक्षाने ग्रीन पार्टीशी आघाडी करून स्वीडन मध्ये सरकार स्थापन केले आहे.
 • नीला विखे-पाटील यांनी या अगोदरच्या सरकारमध्ये देखील पीएमओ कार्यालयाच्या सल्लागार पदी काम केले असून त्या ग्रीन पार्टीच्या सक्रिय सदस्या देखील आहेत. 
 • नीला यांची निवड पंतप्रधान कार्यालयाच्या राजकीय सल्लागार पदी झाली असून त्यांच्याकडे अर्थविषयक कार्यभार सोपवण्यात आला आहे.'


प्रमुख युरोपीय देशांनी जुआन गुएदो यांना व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली
 • दिनांक 4 फेब्रुवारी 2019 रोजी अमेरिकेच्या पाठोपाठ आता आठ युरोपीय देशांनी व्हेनेझुएला देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून विरोधी पक्षनेता जुआन गुएदो (ऊर्फ जुआन ग्वेडो) यांना मान्यता दिली. 
 • हे देश म्हणजे - ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, स्वीडन, डेन्मार्क, ऑस्ट्रिया आणि जर्मनी. या देशांनी व्हेनेझुएलात नवीन निवडणूक लढवण्याकरिता दबाव टाकला आहे.


क्रीडा घडामोडी

सुनील छत्री :
 • सुनील छत्री ने आंतरराष्ट्रीय सामन्यात आजपर्यंत ६७ गोल केले असून आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये त्याने दुसरे स्थान कमावले आहे.
 • प्रथम स्थानावर ८५ गोल्ससह रोनोल्डो प्रथम स्थानावर आहे. तर बाईचुंग भूतीया नंतर अंतरराष्ट्रीय १०० सामने खेळणारा भारताचा दुसरा फुटबॉल खेळाडू ठरला

अँडी मरे :
 • इंग्लंडचा टेनिसपटू अँडी मरेने आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली.
 • कारकीर्दीत तीन ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या मरेने मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधून दुखापतीमुळे माघार घेतली होती.
 • मरेने त्याच्या कारकिर्दीत 2 वेळा विम्बल्डन (2013, 2016), एक वेळा युएस ओपन (2012), 2 ऑलिंपिक सुवर्णपदके आणि एक डेविस कपचे विजेतेपद मिळवले आहे. त्याचबरोबरच त्याने एकूण 45 एटीपी एकेरीचे विजेतेपद आणि 14 एटीपी मास्टर्स 1000 पटकावले आहे.
 • 2013मध्ये विम्बल्डन एकेरीचे विजेतेपद मिळवणारा मरे 77 वर्षानंतर पहिलाच ब्रिटीश टेनिसपटू ठरला होता. फ्रेड पेरी यांनी 1936ला ब्रिटनकडून खेळताना विम्बल्डन जिंकले होते.

रेक्स सिंह राजकुमार :
 • अंडर-19 कूच बिहार ट्रॉफी स्पर्धेत मणिपूरचा गोलंदाज राजकुमार रेक्स सिंह ने अरुणाचल प्रदेश विरूद्ध खेळताना दुसऱ्या पारीत सर्व १० विकेट पटकावल्या.रेक्स ने ९.५ षटकात ११ धावा देत १० विकेट प्राप्त केल्या

मनु भाकर :
 • भारतीय ऑलोम्पिक संघाने (आईओए) तिसऱ्या युवा ऑलोम्पिक स्पर्धेत भारतीय संघाची ध्वजवाहक म्हणून निवड केली
जेमिमा रोड्रिग्स :
 • एक षटकात ३ षटकार लावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

विराट कोहली :
 • विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 2000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तर आतंरराष्ट्रीय टी-20मध्ये 2000 धावांचा पल्ला गाठणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटनं हा विक्रम आपल्या नावे केला. 
 • विराटने अवघ्या 56 सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्क्युलमच्या नावे होता. 
 • टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिल 2271 धावांसह आघाडीवर आहे. ब्रॅंडन मॅक्क्युलम 2140 धावांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा शोएब मलिक 2039 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

वृद्धिमान साहा :
 • भुवनेश्वहर कुमारच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या मॉर्ने मॉर्केलचा झेल घेऊन भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने एका कसोटी सामन्यात दहा झेल घेण्याची विक्रमी कामगिरी केली. त्
 • याने महेंद्रसिंह धोनीचा ९ झेलांचा विक्रम मोडला

बाबर आझम :
 • पाकिस्तानीफलंदाज बाबर आझम ने सर्वात कमी टी-20 सामन्यात 1000 धावा करण्याचा विश्वविक्रम केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला . 
 • या अगोदर अशी कामगिरी भारताच्या विराट कोहलीने केली होती .विराटने २७ सामन्यात १००० धावा केल्या होत्या

एम.सी. मेरीकॉम :
 • दिल्ली येथे आयोजित आइबा महिला विश्व बॉक्सिंग चैंपियनशिप (AIBA Women’s World Boying Champions) स्पर्धेत 35 वर्षीय भारतीय मुष्टीयुद्ध एम.सी. मैरीकॉम हिने स्वर्ण पदक पटकावले. 
 • तिचे हे विश्व चैंपियनशिप स्पर्धेतील 6 स्वर्ण पदक होते
  मेरीकॉम ने आयरलैंड ची महिला मुष्टीयुद्धपटू केटी टेलर (5 स्वर्ण आणि 1 कांस्य) हिचे रेकॉर्ड मोडला तर क्युबाच्या फेलिक्स सेवन (6 स्वर्ण व 1 रौप्य ) ची बरोबरी केली 
 • मेरीकॉम ने 2002, 2005, 2006, 2008, 2010 व 2018 मध्ये विश्व चैंपियनशिप स्पर्धेत स्वर्ण पदक पटकावले

शोएब मलिक :
 • पाकिस्तानचा क्रिकेपटू शोएब मलिक १०० आंतराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला

जेनी गुन :
 • इंग्लंडची महिला क्रिकेटपटू जेनी गुन १०० आंतराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू

हिमा दास :
 • फिनलंडमध्ये २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षीय हिमाने चारशे मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली. 
 • जागतिक स्तरावर अशा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली तर हिमा दासची UNICEF India ची युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आसाम राज्य सरकाने तिला स्पोर्ट्स अॅम्बेसेडर म्हणून निवड केली.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार घोषित
सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला. पुरस्काराचे रु. 1 लाख रोख, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे स्वरुप असून आहे.
 • नाटक विभागासाठी = रवी पटवर्धन,
 • कंठसंगीतासाठी = माधुरी विश्वनाथ ओक, 
 • उपशास्त्रीय संगीतासाठी = श्याम देशपांडे, 
 • मराठी चित्रपटासाठी = उषा नाईक, 
 • कीर्तनासाठी = ह.भ.प.विनोदबुवा खोंड, 
 • शाहिरीसाठी = शाहीर विजय जगताप, 
 • नृत्यासाठी = माणिकबाई रेंडके, 
 • आदिवासी गिरीजनसाठी = वेणू बुकले, 
 • वाद्यसंगीतासाठी = पं.प्रभाकर धाकडे, 
 • तमाशासाठी = चंद्राबाई अण्णा आवळे, 
 • लोककलेसाठी = मोहन कदम आणि  
 • कलादानसाठी = श्रीकांत धोंगडे

यांना हा पुरस्कार जाहिर झालेला आहे. पुरस्कार प्राप्त सर्व कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments