चालू घडामोडी 7 फेब्रुवारी 2019

जीसॅट-31


ISROच्या ‘जीसॅट-31’ या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून प्रक्षेपण
 • जीसॅटसोबतच सौदी जियोस्टेशनरी सॅटेलाईट-1/हेलास-4 सॅट या उपग्रहाला देखील अवकाशात प्रस्थापित केले गेले आहे. एरीअनस्पेस या युरोपीय कंपनीच्या ‘एरीयन-5’ या अग्निबाणाच्या सहाय्याने फ्रेंच गयाना येथील प्रक्षेपण केंद्रावरुन या उपग्रहाला प्रक्षेपित करण्यात आले. 
 • प्रक्षेपणाच्या 42 मिनिटांनंतर हा उपग्रह पृथ्वीच्या ‘जिओ-ट्रान्सफर’ कक्षेत स्थापित झाला.जीसॅट-31 चे वजन 2535 किलोग्राम एवढे आहे. 
 • भारताच्या ‘इनसॅट-4 CR' या जुन्या दळणवळण उपग्रहाची जागा घेईल. हा उपग्रह भू-स्थिर कक्षेत Ku-बँड ट्रान्सपॉन्डरची क्षमता वाढवेल. 
 • व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंक, डिजीटल उपग्रह न्यूज गॅदरिंग, डीटीएच टेलिव्हिजन सर्व्हिस, सेल्युलर बॅक-हल संपर्क आणि बऱ्याच सेवांमध्ये या जीसॅटचा वापर केले जाईल. 
 • भारताची मुख्य भूमी आणि भारताच्या लगतच्या बेटांना दूरसंचार सेवा प्रदान करण्यासाठी हा उपग्रह उपयोगात येणार आहे. जीसॅट-31 हा उपग्रह 15 वर्षांपर्यंत कार्यरत राहणार.


‘इंडिया गेट’ जवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आले
 • नवी दिल्लीत ‘इंडिया गेट’ च्या परिसरात देशातले पहिले ‘राष्ट्रीय युद्ध स्मारक’ (National War Memorial) उभारण्यात आले आहे. दिनांक 25 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे ठिकाण देशाला समर्पित केले जाणार आहे.
 • देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते कारगील युद्ध आणि त्यानंतरच्या चकमकींमध्ये देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या 26,000 सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले आहे. सुमारे 500 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.


स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य
 • स्वामीनाथन आयोग लागू करणारे दिल्ली हे पहिले राज्य बनले आहे. दिल्लीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्याचे मानले जात आहे.
 • केजरीवाल सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. 
 • केजरीवाल यांनी आज (ता.06) अधिकृत ट्विट करून ही माहिती दिली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार, शेतकऱ्यांना आता हमीभाव मिळेल.
 • दिल्ली राज्यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास 39000 इतकी छोटी असली तरी हा निर्णय मात्र मोठा असल्याचे बोलले जात आहे. या राज्यात एकूण 75000 ते 80000 एकर एवढी शेती आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल व उत्पादन वाढेल अशी शक्यता वर्वण्यात येत आहे.


वर्डर्स काऊंट महोत्सव 2019
 • पुरस्कार विजेत्या लेखिका अद्विता काला यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या वर्ड काऊंटन महोत्सव 2019 पुण्यात नुकताच पार पडला. 
 • प्रसिद्ध लेखक पवनकुमार वर्मा यांना साहित्यातल्या त्यांच्या योगदानाबद्दल पहिला वर्डस्मिथ पुरस्कार देण्यात आला.


अरुनिमा सिन्हा
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंटार्क्टिकातील माऊंट विन्सन मोहिमेसाठी अरुनिमा सिन्हाकडे तिरंगा सुपूर्द केला.
 • अरुनिमा सिन्हाने यापूर्वी पाच खंडांमधील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली दिव्यांग महिला बनली आहे.


चीनच्या तुलनेत भारतीय शहरांमध्ये हरितगृह वायूच्या उत्सर्जनात सर्वाधिक वाढ 

एन्विरोंमेंटल रिसर्च लेटर्स या नियतकालिकेत प्रसिद्ध केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, वाढत्या शहरीकरणामुळे भारतात वाहनांमधून निघणार्या हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे आणि ते चीनमधील शहरांच्या तुलनेत अधिक आहे, असे दिसून आले आहे.

ठळक बाबी
 • कार्बन डायऑक्साइड (CO2) वायूच्या उत्सर्जनाचे प्रमाण गुरुग्राम जिल्ह्यात (हरयाणा) सर्वाधिक (140 किलो) आहे तर श्रावस्ती जिल्ह्यात (उत्तरप्रदेश) सर्वात कमी (1.8 किलो) आहे.कामासाठी प्रवास करताना भारतीय दरडोई 20 किलो CO2 उत्सर्जित करतो.
 • चीनमध्ये शहरीकरणात 1% वाढ झाल्यामुळे CO2च्या उत्सर्जनात 0.12 टक्क्यांनी वाढ होत आहे, तर भारतात हे प्रमाण 0.24% एवढे आहे.2017 साली भारतात CO2चे उत्सर्जन अंदाजे 4.6 टक्क्यांनी वाढले आणि ते दरडोई 1.8 टन एवढे होते.
 • जगातला चौथा सर्वात मोठा CO2चा उत्सर्जक देश असूनही भारताचे दरडोई उत्सर्जन जागतिक सरासरी (4.2 टन) पेक्षा खूप कमी आहे. 
 • परंतु ग्लोबल कार्बन प्रोजेक्टच्या आकडेवारीनुसार, गेल्या दशकात या उत्सर्जनामध्ये 6 टक्क्यांच्या सरासरीने सातत्याने वाढ झाली आहे.डिझेलच्या किंमतीत 1 रुपयांची वाढ झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये 11 टक्क्यांनी उत्सर्जन कमी झाले. तर काही कमी उत्पन्न असलेल्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण केवळ 3 टक्क्यांनी कमी झाले.दिल्लीत दरडोई सर्वाधिक उत्सर्जन होते आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हे प्रमाण  मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादपेक्षा 2.5 पटीने अधिक आहे.

Post a Comment

0 Comments