चालू घडामोडी 5 फेब्रुवारी 2019

लेह येथे प्रदेशातले पहिलेच लद्दाख विद्यापीठ उघडण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू व काश्मीर राज्यातल्या लद्दाख प्रदेशात लेह येथे एकूण 12,000 कोटी रूपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन तसेच बांधकामाला दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी सुरुवात करण्यासाठी कोणशीला ठेवण्यात आली आहे.

first ladakh univercity
first ladakh univercity

उद्घाटन झालेले प्रकल्प :
  • लद्दाख विद्यापीठ - (लेह, कारगिल, नुब्रा, झंस्कार, द्रास आणि खालत्सी येथील महाविद्यालयांचा समावेश)
  • दातंग गावाजवळ 9 मेगावॉट दाह जलविद्युत प्रकल्प.
  • 220 KV श्रीनगर-अलुस्तेंग-द्रास-कारगिल-लेह प्रेषण प्रणाली.
  • कोणशीला ठेवण्यात आलेले प्रकल्प.
  • लेह विमानतळावरील टर्मिनल इमारत.
  • बिलासपुर-मनाली-लेह रेल मार्ग.
  • याव्यतिरिक्त, राज्याच्या किश्तवाड या शहरात अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था (AIIMS) आणि 624 मेगावॉट किरु जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामासाठी कोणशीला ठेवण्यात आली आहे.


इराणच्या बेहरूज बुचानीला ऑस्ट्रेलियाचा सर्वात मौल्यवान साहित्य पुरस्कार मिळाला

इराणच्या बेहरूज बुचानी या पत्रकाराला "नो फ्रेंड बट द माउंटन्स: राईटिंग फ्रॉम मॅनस प्रिझन" या पुस्तकासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून 100,000 ऑस्ट्रेलियाई डॉलर्स (US$ 72,600) इतक्या सर्वाधिक रकमेचा ‘विक्टोरियन प्राइज फॉर लिटरेचर’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या निर्वासित कायद्याच्या अंतर्गत 2013 साली पापुआ न्यू गिनीमध्ये अटक करण्यात आलेल्या बेहरूज बुचानीने व्हाट्सएप ही ऑनलाइन संदेश सेवा वापरुन ते पुस्तक लिहिले आहे.
ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रकुल दक्षिण गोलार्धाच्या खंडाच्या अंतर्गत असलेला एक देश आहे, जो जगातला सर्वात छोटा खंड आहे आणि जगातला सर्वात मोठा बेट देखील आहे, जो हिंद व प्रशांत महासागरात पसरलेला आहे. ऑस्ट्रेलिया हा एकमेव असा प्रदेश आहे, जो एक खंड, एक राष्ट्र आणि एक बेट आहे. कॅनबेरा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि ऑस्ट्रेलियाई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.


उपकर्णधार स्मृती मंधाना: ICC ODI मधील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू

भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना हिला यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) याचे मानाचे 'सर्वोत्तम क्रिकेटपटू' आणि 'एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) यातली सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू' असे दोन पुरस्कार लाभले आहेत.
12 ODIमध्ये 669 धावा, तर 25 आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 622 धावांची कामगिरी करणार्या सलामीवीर स्मृतीला 'वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू'चा मान म्हणून ‘रिचेल हेहोइ फ्लिंट’ पुरस्काराने गौरवले जाणार आहे. ICCचा मानाचा पुरस्कार पटकावणारी स्मृती ही भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. याआधी तेज गोलंदाज झुलन गोस्वामीने हा पुरस्कार जिंकला आहे.
स्मृती मंधाना ICCच्या ODI क्रमवारीमध्ये चौथ्या, तर टी-20 क्रमवारीमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. 


​​RBI कडून विविध कार्डच्या व्यवहारांमध्ये टोकन प्रणालीबाबत नवीन मार्गदर्शके जाहीर

टोकन प्रणाली :
भारतीय रिझर्ह बँक (RBI) कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डसारख्या विविध कार्डद्वारे होणार्या व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यामधील टोकन प्रणालीच्या संदर्भात (tokenisation) मार्गदर्शके प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 

टोकनायझेशन म्हणजे काय? 
देयके प्रणालीच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने असणारी टोकनायझेशन प्रक्रिया म्हणजे कार्डचा मूळ तपशील वापरण्याच्या जागी प्रदान करण्यात येणारा एक विशिष्ट पर्यायी कोड ज्याला आपण 'टोकन' म्हणतो. या सुविधेमुळे कार्डचा मूळ तपशील गुप्त राहतो आणि त्याऐवजी दिले जाणारे टोकन विक्री केंद्र (PoS), क्विक रिस्पोन्स (QR) कोड मार्फत देयके अश्या संपर्क - विरहित पद्धतीत कार्डमार्फत व्यवहार करण्यासाठी वापरले जाते.


मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘iAPS’ नावाचे नवे स्मार्टफोन अॅप

अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘इंटरऑपरेबल आर्टिफिशियल पॅन्क्रिया सिस्टम (iAPS)’ नावाचे एक नवे स्मार्टफोन अॅप विकसित केले आहे.

हे अॅप वायरलेसद्वारे ग्लूकोज मॉनिटर आणि इंसुलिन पम्प उपकरणाशी जोडले जाणार, ज्यामधून रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करता येणार. हे अॅप ​​आव्हानात्मक परिस्थितीत शरीरामधील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे तसेच अवांछित वातावरणात वापरण्यासही योग्य आहे.

मधुमेह असलेल्या व्यक्तिमध्ये लक्ष्यित साखरेची पातळी ही 70-180 मायक्रोग्राम प्रति डेसिलीटर या प्रमाणात असणे आवश्यक आहे. या अॅपमुळे ही पातळी राखण्यात यश आले आहे.

Post a Comment

0 Comments