loading...

कवयित्री रंजनी मुरली यांना वूमन्स व्हॉइस अवॉर्ड प्रदान

​​​​भारतीय वंशाच्या कवयित्री रंजनी मुरली यांना APJ कलकत्ता साहित्य महोत्सवामध्ये ‘वूमन्स व्हॉइस अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

Singer Ranjani Murli Image


पुरस्कारा बाबत :-

  • या पुरस्कार विजेत्याला 1 लाख रुपये पुरस्कार स्वरूप दिले जातात.

  • प्रभा खैतान वूमन्स व्हॉइस अवॉर्ड हा वूमन्स व्हॉइस अवॉर्ड या नावानेही ओळखला जातो. 

  • हा पुरस्कार भारतातील रचनात्मक लेखन क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना प्रदान केला जातो.

  • स्त्रियांना प्रेरणा देणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. ऑक्सफर्ड बुकस्टोर आणि प्रभा खैतान फाऊंडेशनचा हा संयुक्त उपक्रम आहे.

काय आहे APJ कलकत्ता साहित्य उत्सव ?

  • एपीजे कलकत्ता साहित्य उत्सव (AKLF) हा भारताचा पहिला साहित्यिक महोत्सव होता. 
  • पुस्तकांच्या दुकानाद्वारे संचालित हा एकमेव साहित्यिक उत्सव आहे.
  • या महोत्सवात पुस्तके, संगीत, कला आणि चित्रपट यासारख्या विषयांवर चर्चा केली जाते.

Post a Comment

0 Comments