चालू घडामोडी 30 जानेवारी 2019

दिल्लीतल्या राजपथावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील(2019) त्रिपुराच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक

त्रिपुराची चित्र रथाची संकल्पना
:
  • ‘Empowering Rural Economy the Gandhian Way' 
  • दुसरा क्रमांक - जम्मू आणि काश्मीर 
  • तिसरा क्रमांक- पंजाब
दिल्लीतल्या राजपथावरील प्रजासत्ताक दिन सोहळ्यातील(2018) मधील चित्ररथ पुरस्कार...
महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात प्रदर्शित ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा’ चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्या हस्ते महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांनी रविवारी (ता. २८) हा पुरस्कार स्वीकारला. तर आसाम राज्याच्या चित्ररथला दुसरा, तर छत्तीसगड राज्याने तिसरा क्रमांक पटकविला. या राज्यांनाही या वेळी गौरविण्यात आले.

१९८० मध्ये देखील प्रथम क्रमांक
राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १९८० मध्ये राज्याच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक’ दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शित केला होता. तेव्हादेखील या चित्ररथास प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यानंतर १९८३ मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला हाेता. यानंतर १९९३ ते १९९५ असे सलग ३ वर्षे प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. तर २०१५ मध्ये प्रदर्शित ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला हाेता.

2018 यावेळी राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ होते.


जागतिक विमान परिषद 2019 मध्ये व्हिजन 2040 प्रसिद्ध

मुंबई येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी जागतिक विमान परिषद 2019 (Global Aviation Summit 2019) मध्ये ‘व्हिजन 2040’ कार्यपुस्तिका प्रसिद्ध केले.
 
व्हिजन 2040 मधील समाविष्ट मुद्दे :
  • 1.1 अब्ज प्रवाशांना ये-जा करण्यासाठी भारताला 2040 मध्ये 200 विमानतळांची तसेच 40-50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची आवश्यकता आहे.
  • 2040मध्ये भारताची (देशांतर्गत व आंतराष्ट्रीय) प्रवासी वाहतूक अंदाजे 1.1 अब्ज होईल, सध्या ती 187 दशलक्ष आहे.
  • मार्च 2018 मधील विमान उड्डाणांची संख्या 623 आहे. 2040 पर्यंत हा आकडा 2,360 पर्यंत पोहोचणार आहे.

व्हिजन 2040 मध्ये सुचविण्यात आलेले उपाय :
  • जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्रचना कायदा 2013 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार नवीन विमानतळांच्या बांधकामासाठी ‘लँद पूलिंग’ तंत्राचा वापर करणे.
  • वस्तू आणि सेवा कराच्या दरात घट करणे.
  • हवाई टर्बाइन इंधनाला (ATF) वस्तू आणि सेवा कराच्या चौकटीत आणावे.
  • याशिवाय व्हिजन 2040 मध्ये देखभाल, दुरुस्ती, मानव संसाधन विकास, हवाई संरक्षण, हाताळणी यंत्रणा, हवाई दिशादर्शन आणि ड्रोन यावरही भर देण्यात आला आहे.


चीननं उभारला जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज

जगातील सर्वाधिक लांब 3D प्रिंटेड ब्रिज चीनमध्ये उभारण्यात आला आहे. शांघायमधील वाटसरूंसाठी हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलाची लांबी 26.3 मीटर आणि रुंदी 3.6 मीटरएवढी आहे. रोबोटिक आर्म्सच्या मदतीनं केवळ 19 दिवसांमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. यामध्ये 3D-प्रिंटेड 44 काँक्रीट ब्लॉकचाही वापर करण्यात आला आहे. हा पूल उभारण्यासाठी 2 लाख 70 हजार युआन (जवळपास 28.09 लाख रुपये) एवढा खर्च करण्यात आला आहे.
 
शांघायमधील Wisdom Innovation Parkमध्ये हा ब्रिज बांधण्यात आला आहे. चीनच्या 3D प्रिंटिंग म्युझिअमव्यतिरिक्त आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि रोबोटिक्सवर काम करणाऱ्या टॉप हायटेक कंपनीचं कार्यालयदेखील या पार्कमध्ये आहे. पुलावर पडणाऱ्या वजनाची नोंद ठेवण्यासाठी विशेष असे तंत्रज्ञानदेखील येथे उपलब्ध आहे. 3 डी तंत्रज्ञानाच्या आधारावर ब्रिज बांधण्यात आल्याने याचा खर्च 33 टक्के कमी झाला आहे.
 
Tsinghua Universityचे प्राध्यापक सू बिगुओ यांनी ब्रिजचा आराखडा तयार केला आहे. या ब्रिजची निर्मिती करण्यासाठी पॉलिथिलीन फायबर काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे.
 
प्रोफेसर सू यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3डी प्रिंटिंगच्या मदतीनं ब्रिजची निर्मिती केल्यास कामगारांची गरज कमी प्रमाणात लागते. यासोबत खूपच कमी कालावधीत ब्रिजची निर्मिती केली जाऊ शकते. आगामी काळात चीनमध्ये बऱ्याच गोष्टींची निर्मिती करण्यासाठी थ्री डी प्रिटिंग तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे.


गोव्यात मांडवी नदीवर 5.1 किलोमीटर लांबीच्या ‘अटल सेतू’चे उद्घाटन

हा पूल राजधानी शहर पणजीमध्ये प्रवेश करण्यास सुलभता आणणार आहे. चार पदरी पूलाचे बांधकाम गोवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (GIDC) आणि लार्सन अँड टुब्रो यांनी केले.

✍मांडवी नदी (किंवा महादयी नदी)
ही गोव्यामध्ये वाहते, मात्र प्रत्यक्षात कर्नाटकमधील भीमगड येथील जवळ जवळ 30 सरीच्या समूहापासून याचे पात्र बनलेले आहे. कर्नाटकातून 35 किलोमीटर आणि गोव्यामधून 52 किमीचे अंतर कापत ती अरबी समुद्राला मिळते. याचे पाणी कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना मिळते.