loading...

चालू घडामोडी 27 जानेवारी 2019

loading...

12 व्या जयपूर साहित्य महोत्सवाला सुरुवात झाली

पाच दिवस चालणार्या या कार्यक्रमात सुमारे 500 लेखक, साहित्यिक आणि विचारवंतांनी सहभाग घेतला. यावर्षी 17 भाषेत लिखाण करणार्या लेखकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे सहभागी होणारा सर्वात तरुण लेखक हा फक्त 10 वर्षांचा आहे.
 
जयपूर साहित्य महोत्सव हा 2006 सालापासून आयोजित केला जाणारा एक वार्षिक साहित्यिक महोत्सव आहे, जो जयपूरमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो. 2018 साली प्रथमच परदेशात (ह्युस्टनमध्ये) हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता


व्हेनेझुएलाने अमेरिकेशी आपले राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली

दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस माडूरो यांनी अमेरिकेशी देशाचे राजनैतिक संबंध तोडण्यात येत असल्याची घोषणा केली.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्षनेते जुआन ग्वेडो यांना दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला या देशाचे अंतरिम राष्ट्रपती म्हणून आपली मान्यता दिली.

व्हेनेझुएलामधील माडूरो यांची सत्ता उलथवून लावण्याचा अमेरिकेच्या प्रयत्नामुळे अमेरिकेच्या सर्व राजनैतिक अधिकार्यांना देश सोडण्याचे निर्देश दिले गेले आहेत.


मानव अधिकारांना समर्पित जगातील पहिले टीव्ही चॅनेल

इंटरनॅशनल ऑब्जर्वेटरी ऑफ ह्यूमन राइट्स (IOHR) या संस्थेने लंडनमध्ये मानव अधिकारांना समर्पित जगातील पहिले टीव्ही चॅनेल सुरु केले.

हे वेब-आधारित चॅनेल असेल. ते युरोप, लॅटिन अमेरिका आणि मध्य पूर्वसह 20 देशांच्या प्रेक्षकांसाठी मानवाधिकारांशी संबंधित समस्यांवरील कार्यक्रम प्रसारित करेल.
 
या चॅनेलचे प्रसारण Netgem.tv प्लॅटफॉर्मद्वारे पाहिले जाऊ शकते. सध्या या चॅनेलचे कार्यक्रम इंग्रजीमध्ये प्रसारित केले जात आहेत, भविष्यात हे कार्यक्रम फारसी, तुर्की, अरबी आणि रशियन भाषांमध्येही प्रसारित केला जाऊ शकतो.

मुख्य प्रसार माध्यमांनी दुर्लक्षित केलेल्या मानवी हक्कांच्या कथा प्रेक्षकांच्या समोर घेऊन येणे, हा या चॅनेलचा उद्देश आहे.
हे चॅनेल शरणार्थी, पत्रकारिता स्वातंत्र्य, दहशतवाद, महिला अधिकार, एलजीबीटी इत्यादी मुद्द्यांवर कार्यक्रम प्रसारित करेल.


ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2019

जपानच्या नाओमी ओसाकाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेवर नाव कोरले आहे. एकेरीच्या अंतिम सामन्यात नाओमीने चेक रिपब्लिकच्या पेट्रा क्वितोवाचा 7-6, 5-7, 6-4 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी ओसाका पहिली जपानी खेळाडू आहे.


धक्कादायक! जगातील अर्धे कुष्ठरोगी भारतात : डब्ल्यूएचओ

जगभरातील अर्धे कुष्ठरोगी भारतात सापडत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालात खुलासा

कुष्ठरोगाबद्दल असलेली अनास्था, कुष्ठरोग्यांसोबत केला जाणारा भेदभाव आणि प्रचंड अज्ञान या तीन कारणांमुळे भारतात कुष्ठरोग्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात स्पष्ट


One-Liner Current Affairs 2019

🏵2019 पद्म पुरस्कार - 112 (4 पद्मविभूषण, 14 पद्मभूषण आणि 94 पद्मश्री).

🏵भारताद्वारे ‘गांधी-मंडेला कौशल्य’ संस्थेची स्थापना - प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका इथे केली जाणार आहे.

🏵2019 साली पद्मश्री देवून सन्मानित केले जाणारा क्रिकेटपटू - गौतम गंभीर.

🏵ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2019 महिला एकेरी विजेती - नाओमी ओसाका.

🏵2019 साली भारतरत्न पुरस्काराचे विजेते - प्रणब मुखर्जी, भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख (मरणोत्तर).

🏵2019 साली सशस्त्र दलाच्या या व्यक्तीला अशोक चक्र हा सन्मान दिला गेला - नाझीर अहमद वाणी.

🏵26 जानेवारी 2019 - 70 व्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे दक्षिण आफ्रिकेचे वर्तमान राष्ट्रपती - सिरिल रामाफोसा

Post a Comment

0 Comments