loading...

चालू घडामोडी 22 जानेवारी 2019

loading...

सिटी मोमेंटम इंडेक्स 2019 जाहीर
 • जेएलएलच्या सिटी मोमेंटम निर्देशांकाद्वारे (City Momentum Index 2019) जगातील व्यावसायिकरित्या सक्रीय 131 शहरांमध्ये गतिशीलतेचे मोजमाप केले जाते.
 • यासाठी तीन वर्षे शहराच्या सामाजिक-आर्थिक आणि व्यावसायिक संकेतकांचा मागोवा घेण्यात येतो.
 • या संकेतकांच्या आधारे वेगवान विकास करणाऱ्या स्थावर मालमत्ता (रिअल इस्टेट) बाजारांना चिन्हांकित केले जाते.
 • या यादीतील टॉप 20 शहरांपैकी 19 शहरे आशिया-प्रशांत क्षेत्रातील आहेत.
 • हे आशिया- प्रशांत विभागाची गतिशील नागरीकरण व आर्थिक विकास दर्शविते.
 • या निर्देशांकानुसार, RERA व GST सारख्या सुधारणांच्या अंमलबजावणीनंतर तसेच पायाभूत सुविधांचा विकास व व्यापार सुलभता यामूळे भारताच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आली आहे.

सिटी मोमेंटम निर्देशांक 2019 :
 • या निर्देशांकात भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बेंगलुरु शहर जगातील सर्वात गतिशील शहर ठरले असून ते पहिल्या स्थानी आहे.
 • या यादीमध्ये हैदराबाद दुसऱ्या स्थानी आहे.
 • ही यादीमध्ये टॉप 20 शहरांमध्ये समावेश असलेली भारतीय शहरे: दिल्ली (4), पुणे (5), चेन्नई (7) आणि कोलकाता (20).

या यादीतील टॉप 10 शहरे :
 • बेंगलुरू, हैद्राबाद, हनोई, दिल्ली, पुणे, नैरोबी, चेन्नई, हो चि मिन्ह सिटी, शी’आन, ग्वान्गझौ.


CNR राव यांना पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ जाहीर

भारताचे नामांकित शास्त्रज्ञ भारतरत्न सी. एन. आर. राव यांची पहिला-वहिला ‘पदार्थ संशोधनासाठीचा शेख सौद आंतरराष्ट्रीय पारितोषिक’ (Sheikh Saud International Prize for Materials Research) या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

यावर्षीपासून संयुक्त अरब अमिरात या आखाती देशाच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड मटेरियल या संशोधन संस्थेकडून हा पुरस्कार दिला जात आहे.

एक लक्ष डॉलर एवढी रोख रक्कम, एक पदक आणि चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


जागतिक विमान परिषद 2019 मध्ये व्हिजन 2040 प्रसिद्ध

मुंबई येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभु यांनी जागतिक विमान परिषद 2019 (Global Aviation Summit 2019) मध्ये ‘व्हिजन 2040’ कार्यपुस्तिका प्रसिद्ध केले.

व्हिजन 2040 मधील समाविष्ट मुद्दे :
 • 1.1 अब्ज प्रवाशांना ये-जा करण्यासाठी भारताला 2040 मध्ये 200 विमानतळांची तसेच 40-50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची आवश्यकता आहे.
 • 2040मध्ये भारताची (देशांतर्गत व आंतराष्ट्रीय) प्रवासी वाहतूक अंदाजे 1.1 अब्ज होईल, सध्या ती 187 दशलक्ष आहे.
 • मार्च 2018 मधील विमान उड्डाणांची संख्या 623 आहे. 2040 पर्यंत हा आकडा 2,360 पर्यंत पोहोचणार आहे.

व्हिजन 2040 मध्ये सुचविण्यात आलेले उपाय :
■ जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्रचना कायदा 2013 मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार नवीन विमानतळांच्या बांधकामासाठी ‘लँद पूलिंग’ तंत्राचा वापर करणे.

■ वस्तू आणि सेवा कराच्या दरात घट करणे.

■ हवाई टर्बाइन इंधनाला (ATF) वस्तू आणि सेवा कराच्या चौकटीत आणावे.

■ याशिवाय व्हिजन 2040 मध्ये देखभाल, दुरुस्ती, मानव संसाधन विकास, हवाई संरक्षण, हाताळणी यंत्रणा, हवाई दिशादर्शन आणि ड्रोन यावरही भर देण्यात आला आहे.


NROL-71: अमेरिकेचा अत्याधुनिक गुप्तचर उपग्रह

19 जानेवारी 2019 रोजी अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या अंतराळ संस्थेनी “NROL-71” या नावाचा नवा गुप्तचर उपग्रह अवकाशात पाठवला.

‘युनायटेड लॉन्च अलायन्स (ULA) डेल्टा IV हेवी रॉकेट’ या अग्निबाणाच्या सहाय्याने हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला गेला.

हा उपग्रह ‘यू.एस. नॅशनल रिकोनिसन्स ऑफिस’द्वारे संचालित केला जाणार आहे आणि याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.


​​प्रभात सिंह यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे महानिर्देशक (DG) पदी नियुक्ती

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने भारत सरकारच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातील वरिष्ठ IPS अधिकारी प्रभात सिंह यांची महानिर्देशक (तपासणी) म्हणून नियुक्ती केली आहे.

सिंह हे AGMUT कॅडरचे 1985च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत, जे सध्या केंद्रीय रिझर्व पोलिस फोर्स (CRPF) मधील विशेष संचालक आहेत.

प्रभात सिंह यांना 30 एप्रिल, 2020 या कालावधीसाठी त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच एस. एन. प्रधान 1988 बॅचचे IPS अधिकारी - झारखंड कॅडर यांची राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे महासंचालक (DG) पदी नियुक्त केली आहे.

एस. एन. प्रधान हे सध्या उत्तर-पूर्व क्षेत्र विकास विभाग (DoNER)चे संयुक्त सचिव आहेत.

NHRC अध्यक्ष: न्यायमूर्ती एच. एल. दत्तू, 

मुख्यालय: नवी दिल्ली.

अलीकडेच वरीष्‍ठ IAS अधिकारी जयदीप गोविंद (1984 - बॅच, मध्यप्रदेश कॅडर) यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC)चे 15वे महासचिव पदि नियुक्ती केली होती.

Post a Comment

0 Comments