चालू घडामोडी 16 जानेवारी 2019


औरंगाबादमध्ये नववी ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद’ आयोजित

दि. 16 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत औरंगाबाद (महाराष्ट्र) येथे ‘आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद 2019’ (International Micro Irrigation Conference -9IMIC) भरविण्याचे ठरविण्यात आले आहे.
या परिषदेत चर्चेचा विषय 'आधुनिक शेतीमधील सूक्ष्म सिंचन' (Micro Irrigation in Modern Agriculture) हा आहे. केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे हा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आहेत.
आंतरराष्ट्रीय सिंचन व नाला आयोग (ICID), भारत राष्ट्रीय भुपृष्ठावरील जल समिती (INCSW) आणि WAPCOS लिमिटेड यांच्या सहयोगाने भारत सरकारच्या कृषी मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


​​भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7.3% असेल: भारत बॅरोमीटर अहवाल 2019

PwC संस्थेच्या सहकार्याने भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry -FICCI) कडून ‘भारत बॅरोमीटर अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

भारताच्या उत्पादन निर्मिती क्षेत्रामध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उत्पादकांचा दृष्टीकोन, पुढील 12 महिन्यांसाठी व्यवसायाचे वातावरण आणि व्यापारामधील स्पर्धात्मकता निर्धारित करणारे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.
महत्त्वाचे निष्कर्ष :
  • उत्पादन निर्मिती क्षेत्र हे देशाच्या संपत्तीच्या एका महत्त्वाच्या भागासाठी एक आर्थिक क्षेत्र खाते आहे. 2025 सालापर्यंत भारत USD 1 लक्ष कोटी (ट्रिलियन) एवढी उत्पादन निर्मिती अर्थव्यवस्था असण्याची अपेक्षा आहे. 
  • पुढील 12 महिन्यांमध्ये भारत सरासरी 7% किंवा त्याहून अधिक वृद्धीदराने वाढण्याची क्षमता ठेवतो. हा अंदाज जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सारख्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थांच्या अंदाजपत्रकांशी जुळलेला आहे.
  • आगामी 12 महिन्यात उद्योजकांनी त्यांच्या क्षेत्रात वेगाने वाढ होण्याची अपेक्षा दर्शविलेली आहे. वस्तू व सेवा कर (GST) यामुळे मालवाहतुकीमधील वेग आणि सुलभतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 
  • 85% उद्योजकांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की त्यांची भविष्यातली वाढ वाढत्या निर्यातीमुळे होणार. वित्त वर्ष 2017-18 मध्ये भारताच्या निर्यातीमधला वृद्धीदर 9.8% इतका आहे, जो गेल्या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. 
  • भारताची अर्थव्यवस्था 7.3% ते 7.7% या दरम्यान वाढू शकते आणि देशांतर्गत बाजारपेठेतली मागणी ही देशासाठी चालक ठरणार आहे, असा अंदाज आहे.


सौदी अरब पाकिस्तानात ग्वादर बंदरावर तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार

सौदी अरब या आखाती देशाने पाकिस्तान या आशियाई देशातल्या ग्वादर बंदरावर USD 10 अब्ज खर्चून एक तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारणार असल्याची एक योजना तयार केली आहे.
पाकिस्तानात चीनच्या मदतीने हिंद महासागर बंदर (Indian Ocean port) उभारण्यात येत आहे. या ठिकाणी एक कार्यक्रमात यासंबंधी घोषणा करण्यात आली.

तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे पाकिस्तानाची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी मदत म्हणून सौदी अरब देशात गुंतवणूक करीत आहे. शिवाय चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका (China Pakistan Economic Corridor -CPEC) या प्रकल्पामधून चीनने पाकिस्तानाला USD 60 अब्ज एवढी आर्थिक मदत देण्याचे वचन दिले आहे. त्यामधूनच हिंद महासागर बंदर उभारण्यात आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘फिलीप कोटलर अध्यक्षीय’ पुरस्काराने सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्या वहिल्या ‘फिलीप कोटलर अध्यक्षीय’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कारासाठी नरेंद्र मोदी यांची निवड राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे त्यांनी दिलेल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी झाली आहे.
प्राध्यापक फिलीप कोटलर हे अमेरिकेच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट (नॉर्थ वेस्टन विद्यापीठ) येथे विपणन शास्त्राचे जागतिक दर्जाचे जेष्ठ प्राध्यापक आहेत. ते जागतिक ख्यातीचे एक लेखक आणि सल्लागार देखील आहेत. हा पुरस्कार ‘पीपल, प्रॉफीट आणि प्लॅनेट’ या तिहेरी टॅगलाईनवर प्रकाश टाकतो. हा पुरस्कार कोटलर यांच्याकडून दरवर्षी राष्ट्राच्या प्रमुखांना दिला जाईल.


सिक्किम राज्य सरकारची ‘एक कुटुंब एक नोकरी’ योजना


सिक्किम राज्य सरकारने दि. 12 जानेवारी 2019 रोजी राज्यात ‘एक कुटुंब एक नोकरी’ (One Family One Job) योजना लागू केली आहे.

मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नेतृत्वात राज्य सरकार राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामधील एका सदस्याला एकतरी सरकारी नोकरी मिळावी या उद्देशाने ही योजना राबवित आहे. अशा प्रकारचा खास कार्यक्रम चालविणारे हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे.

या अनुषंगाने 12 जानेवारीला गंगटोकमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात 12,000 हून अधिक बेरोजगार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला फक्त त्या कुटुंबांच्या सदस्यांना नियुक्ती पत्र दिले गेलेत, जे सध्या सरकारी नोकरीमध्ये नाहीत. यापूर्वीच 25,000 पेक्षा अधिकांना नोकर्‍या दिल्या गेल्या.

केवळ 6.4 लक्ष लोकसंख्या असलेल्या या राज्यात वर्तमानात 1 लक्ष नियमित सरकारी कर्मचारी आहेत.

शिवाय सिक्किम हे देशातले एकमेव राज्य आहे, जे सरकारी कर्मचार्‍यांना सर्वाधिक वेतन देते.