चालू घडामोडी 14 जानेवारी 2019


गगनयान प्रकल्प: ISRO चे नवे ‘मानव अंतराळ उड्डाण केंद्र’ उघडण्यात आले

 • के. सिवान यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) डिसेंबर 2021 पर्यंत भारतीय माणूस अंतराळात पाठवण्याचा संकल्प केला आहे.
 • डिसेंबर 2021 मध्ये एका महिलेसह सात भारतीय अंतराळवीरांना घेऊन 'गगनयान' अंतराळात झेपावेल.  'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड भारतीय हवाई दल आणि ISRO संयुक्तपणे करणार आहेत.
 • भारताच्या या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसंबंधी सर्व कार्ये करण्याकरिता ‘मानव अंतराळ उड्डाण केंद्र’ उभारले गेले आहे.
 • याशिवाय, जून 2019 पर्यंत 'चंद्रयान 2' अंतराळात सोडण्याची योजना आहे.
 • या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे.
 • पाठविण्यात येणार्‍या अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात देण्यात येईल तर, प्रगत प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात येईल.
 • मानवी अंतराळयान पाठवण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे ते विकसित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकल्पासाठी रशियाचीही मदत घेतली जाणार आहे. 


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)


 • ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे दि. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापन करण्यात आलेल्या ISROने 1962 सालच्या ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ (INCOSPAR) याला बरखास्त करीत त्याची जागा घेतली.
 • ही संस्था भरता सरकारच्या विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
 • ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ दि. 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला. 
 • 1980 साली भारतीय बनावटीच्या SLV-2 या प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
 • दि. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला. 
 • त्यानंतर भारताच्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ या मोहिमेने दि. 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


अ‍ॅल्बी मॉर्केलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली


दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू अॅल्बी मॉर्केल याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

क्रिकेटमधील त्याच्या सुमारे 20 वर्षांच्या व्यवसायिक कारकीर्दीत त्याने 58 एकदिवसीय सामने, 50 टी-20 सामने आणि एक कसोटी सामना दक्षिण आफ्रिकेकडून खेळला आहे. त्याने एकूण 1,412 धावा काढल्या आणि 77 बळी घेतले आहेत.

दक्षिण आफ्रिका हा आफ्रिका खंडातला विविध संस्कृती आणि भाषा बोलणाऱ्यांचा बहुवांशिक देश आहे. केप टाउन (संविधानक), प्रिटोरिया (कार्यपालिका), ब्लोमफॉन्टेन (न्यायिक) या देशाच्या राजधान्या आहेत. दक्षिण आफ्रिकन रँड हे राष्ट्रीय चलन आहे.

उझबेकिस्तानात प्रथम ‘भारत-मध्य आशिया संवाद’ संपन्न


दि. 13 जानेवारी 2019 रोजी उझबेकिस्तानच्या समरकंद या शहरात ‘भारत-मध्य आशिया संवाद’ याची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारताचे परराष्ट्र कल्याण मंत्री सुषमा स्वराज या दोन दिवसांच्या उझबेकिस्तान दौर्‍यावर आहेत. उझबेकिस्तानाचे परराष्ट्र मंत्री अब्दुलाझेझ कमिलोव्ह यांच्या समवेत त्यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.


विराट कोहली, रवी शास्त्री यांना सिडनी क्रिकेट ग्राउंडची मानद सदस्यता


क्रिकेटपटू विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सिडनी क्रिकेट ग्राउंडची (SCG) मानद सदस्यता प्राप्त झाली आहे.

कोहली आणि शास्त्री यांच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये केवळ सचिन तेंडूलकर आणि वेस्टइंडीजच्या ब्रायन लारा यांनाही SCGची मानद सदस्यता दिली गेली आहे.

EIU डेमोक्रसी इंडेक्स 2018: नॉर्वे अव्वल स्थानी, भारताचा क्रमांक 41व्या स्थानी


EIU : जागतिक लोकशाही निर्देशांक 2018 (Global Democracy Index 2018)ची ही आठवी आवृत्ती आहे.
ही इकॉनोमिस्ट इंटेलिजेंट युनिटने (EIU) प्रसिद्ध केली, ज्यामध्ये जगाच्या 167 देशांमधून लोकशाहीची स्थिती संकलित केली गेली.
वार्षिक "ग्लोबल डेमोक्रेसी इंडेक्स ऑफ इकोनॉमिस्ट इंटेलिजेंस युनिट" या अहवालात नॉर्वे आघाडीवर आहे आणि भारत 41व्या स्थानावर आहे. हा निर्देशांक 2006 मध्ये सुरु झाला होता.

अरुणाचल प्रदेशात भारतातला सर्वात दीर्घ एकपदरी स्टील केबल ब्रिज उभारले


अरुणाचल प्रदेशात भारतामधील 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेंशन ब्रिज (पूल) उभारण्यात आले आहे.

हा पूल चीनजवळ सियांग जिल्ह्यात सियांग नदीवर उभारण्यात आला आहे. या पूलाला ‘ब्योरुंग पूल’ म्हणून देखील ओळखले जाते.

हा पूल ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या एका योजनेच्या अंतर्गत 4,843 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. या पुलामुळे यिंगकिओनग ते तुतींग या शहरांमधील रस्त्यावाटे आधीचे 192 किलोमीटरचे अंतर जवळ जवळ 40 किलोमीटरने कमी होते.

Post a Comment

0 Comments