loading...

चालू घडामोडी 9 जानेवारी 2019

loading...

1 फेब्रुवारीला जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम पद सोडणार

जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी अचानकपणे राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. ते दि. 1 फेब्रुवारी 2019 रोजी पद सोडणार.

58 वर्षीय किम सहा वर्षांपासून या पदावर कार्यरत आहेत. 2017 साली ते दुसर्यांदा पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी निवडून आले आणि ते या पदावर 2022 सालापर्यंत होते. जवळजवळ तीन वर्षांच्या कारकिर्दीनंतर त्यांनी अचानकपणे राजीनामा दिला आहे.

1 फेब्रुवारीपासून जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) क्रिस्टलिना जॉर्जिव्हा या अंतरिम अध्यक्ष म्हणून पदाची जबाबदारी स्वीकारणार.


निवडणुकीआधी सरकारचा मोठा निर्णय, सवर्णांना नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण

लोकसभा निवडणुकीसाठी आता 100 पेक्षाही कमी दिवस राहिले आहेत. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्ण (upperclass) वर्गांसाठी 10% आरक्षणास मंजुरी दिली आहे. सामान्य श्रेणीत आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीचे आरक्षण सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्क्यांच्या वर असेल. या निर्णयामुळे आरक्षणाचा कोटा 50 टक्क्यांवरून 60 टक्के होईल. यासाठी संविधानातील अनुच्छेद क्र. 15 आणि 16 मध्ये दुरूस्ती केली जाईल.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येत नाही. आतापर्यंत 22.5% अनुसूचित जाती (SCसाठी 15%) आणि अनुसूचित जमातीच्या (STसाठी 7.5%), OBCसाठी अतिरिक्त 27% आरक्षण असे 49.5% आरक्षण होते.

नव्या निर्णयानुसार, आरक्षणासाठी ज्यांचे 8 लक्ष रूपये किंवा त्याहून कमी वार्षिक उत्पन्न आहे; ज्याची 5 एकर किंवा त्याहून कमी शेत जमीन; ज्याचे 1000 चौ. फुटापेक्षा कमी जागेवर घर आहे, असे पात्रता निकष ठरविण्यात आलेली आहेत.


एन. बिरेन सिंग यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्कार

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांना उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ पुरस्काराने सन्मानित केले. मणिपूरमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

त्याशिवाय केंद्रीय अन्न मंत्रालयाचे मंत्री साध्वी निरंजन ज्योती, आदिवासी व्यवहार मंत्री सुदर्शन आणि खासदार निशिकांत दुबे यांनाही सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार 115 आकांक्षित जिल्ह्यांमधील प्रगतीसाठी स्थापन करण्यात आला आहे. या जिल्ह्यातील विकास कार्यांच्या प्रगतीचे अवलोकन नीती आयोगाद्वारे केले जात आहे.


मुंबई येथे पहिले ग्लोबल एविएशन परिषद आयोजित केली

भारतात प्रथमच ग्लोबल एविएशन परिषद मुंबई येथे आयोजीत करण्यात येत आहे.

ही परीषद 15 दिवस चालणार असून मुंबई येथे 15 ते 16 जानेवारी 2019 ला आयोजीत केली आहे.

》ठिकाण - मुंबई
》कालावधी - 15 ते 16 जानेवारी 2019
》विषय #Theme - "Flying for all" (सर्वांसाठी उड्डाण)
》आयोजक - नागरी उड्डयन मंत्रालय (MoCA)
》सह-आयोजक - फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)

या शिखर परिषदेस -
 • आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना (ICAO), 
 • फेडरल एविएशन अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ अमेरिका (FAA)
 • आंतरराष्ट्रीय वायु वाहतूक संघटना (IATA)
 • नागरी हवाई नेव्हिगेशन सेवा संस्था (CANSO)
 • विमानतळ परिषद आंतरराष्ट्रीय (ACL)
 • असोसिएशन ऑफ एशिया पॅसिफिक एयरलाइन्स (AAPA) यांची सहमाती मिळालेली असून यांचा सहभाग या परीषदेत असणार आहे.
❇ या शिखर परिषदेचा उद्देश -  'सर्वांसाठी उड्डाण' असून यावर लक्ष केंद्रित करणे आणि नवीन विकनसशील क्षेत्रातील आव्हाने प्रदर्शित करणे होय.


इराणमध्ये चाबहार बंदराच्या भागाचा कार्यभार भारताने स्वीकारला

भारताने दि. 7 जानेवारी 2019 रोजी इराणमधील चाबहार बंदऱ्याचा कार्यभार भारताने आपल्या ताब्यात घेतला आहे. पहिल्यांदाच भारत आपल्या क्षेत्राबाहेर एक बंदर चालवत आहे.

चाबहार बंदराच्या ठिकाणी भारताबाहेरून व्यापार चालविण्यासाठी ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’ या भारतीय कंपनीने आपले कार्यालय उघडले आणि चाबहार येथे शाहीद बेहेस्ती बंदरावरील कार्यभार आपल्या हातात घेतला आहे.

दि. 24 डिसेंबर 2018 रोजी चाबहार येथे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या चाबहार बंदराच्या संदर्भात भारत, अफगाणिस्तान आणि इराण यांच्यामधील बैठक पार पडली. या बैठकीत भारत, अफगाणिस्तान, इराण या देशांमधील व्यापार करण्यासाठी ठरविलेल्या मार्गांना आणि वाहतुकीच्या मार्गिकांना सहमती देण्यात आली.

चाबहार हा इराणमधील सिस्तान आणि बलूचिस्तान प्रांताचा एक शहर आहे. हे एक मुक्त बंदर आहे आणि ओमानच्या खाडीच्या किनार्यावर वसलेले आहे. हे बंदर इराणमध्ये पर्शियन आखाती प्रदेशाच्या बाहेर स्थित आहे आणि या प्रदेशामध्ये सागरी व्यापार विस्तारीत करण्यामध्ये मदत करेल.

भारताने पाकिस्तानमधून जाणारा मार्ग वगळत अफगाणिस्तानाशी थेट संपर्क साधण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून चाबहार येथील शाहीद बिहेष्टी बंदर येथे भारत आपले स्थान निर्माण करीत आहे. भारताच्या जलवाहतुक मंत्रालयाने चाबहार बंदर विकास प्रकल्प आणि अनुषंगिक कामे यांच्या अंमलबजावणीसाठी इराणमध्ये एक कंपनी तयार केली आहे.


SSBच्या महासंचालकपदी कुमार राजेश चंद्रा यांची नियुक्ती

नागरी विमानचालन सुरक्षा प्रमुख व वरिष्ठ आयपीएस अधिकारी कुमार राजेश चंद्रा यांची सशस्त्र सीमा बलचे (SSB) महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

पदभार स्वीकारल्यापासून ते 31 डिसेंबर 2021 या त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत ते या पदावर राहतील.

कुमार राजेश चंद्रा बाबत :
 • कुमार राजेश चंद्रा सध्या BCASचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
 • 2001 पूर्वी या सैन्य बलास विशेष सेवा ब्यूरो (SSB) म्हणून ओळखले जात होते.
 • सशस्त्र सीमा बल (SSB), यास इंग्रजीमध्ये Armed Border Force असे संबोधतात.
 • हे एक भारतातील केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांपैकी एक आहे.
 • सध्या हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे.

Post a Comment

0 Comments