loading...

चालू घडामोडी 23 जानेवारी 2019

loading...
https://goo.gl/yhXkBD

भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतचा आयसीसीकडून गौरव, जाहीर केला 'हा' पुरस्कार

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पुरस्कारांवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाच दबदबा राहिला. वन डे व कसोटी संघाच्या नेतृत्वाच्या जबाबदारीबरोबर कोहलीला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कार जाहीर झाला. याशिवाय वन डे आणि कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा मानही त्याने पटकावला. भारताच्या जसप्रीत बुमरानेही उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्यावन डे व कसोटी संघात स्थान पटकावले. यामध्ये यष्टिरक्षक रिषभ पंत पुन्हा चर्चेत आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बेबी सीटर म्हणून नवं टोपण नाव मिळालेल्या रिषभ पंतलाआयसीसीने 2018 मधील उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला.

2018 मध्येच कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या पंतने इंग्लंडमध्ये शतकी खेळी केली. इंग्लंडमध्ये शतक करणारा तो भारताचा पहिला यष्टिरक्षक ठरला. याशिवाय अॅडलेड कसोटीत त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 झेल टिपले. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रमही त्याने नावावर केला. आयसीसी कसोटी क्रमवारीत पंतने 21व्या स्थानावर झेप घेतली. पंतने 2018च्या ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत दोन शतकांसह जवळपास 700 धावा केल्या आहेत. 

आयसीसी क्रमवारीत पंतच्या खात्यात 673 गुण जमा झाले आहेत आणि त्याने महेंद्रसिंग धोनी व फारूख इंजीनियर यांनाही गुणांच्या बाबतित मागे टाकले आहे. धोनीने कारकिर्दीत सर्वोत्तम 662, तर इंजीनियर यांनी 619 गुणांची कमाई केली होती.


🇮🇳 15 वा प्रवासी भारतीय दिवस 🇮🇳

◆21 ते 23 जानेवारी 2019
◆स्थळ - वाराणसी
◆ 21 जानेवारी रोजी उदघाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
◆प्रमुख पाहुणे - मॉरिशस पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ
◆15 व्या प्रवासी भारतीय दिवसाची Theme(संकल्पना) - "Role of Indian Diaspora in building New India".


व्हिएतनाममध्ये ‘ASEAN-भारत पर्यटन मंत्र्यांची बैठक’ पार पडली

व्हिएतनाम देशाच्या हा लाँग सिटी या शहरात ‘ASEAN-भारत पर्यटन मंत्र्यांची बैठक’ या मालिकेची सातवी बैठक पार पडली. भारताचे केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे. अल्फॉन्स यांनी या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले.

सिंगापूरमध्ये दि. 15 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या ‘ASEAN-भारत इन्फॉर्मल ब्रेकफास्ट’ शिखर परिषदेत घेतलेल्या एका निर्णयानुसार, पर्यटन मंत्र्यांनी ‘ASEAN-भारत पर्यटन सहकार्य वर्ष 2019’ हा पर्यटनाला चालना देणारा नवा कार्यक्रम अनावरीत केला आहे.

या कार्यक्रमामुळे आग्नेय आशियाई राष्ट्रांचा संघ (ASEAN) आणि भारत दरम्यान लोकांच्या आदान-प्रदानास प्रोत्साहन मिळण्याचे अपेक्षित आहे.

ASEAN समूहाचे देश आणि भारत या देशांना 2018 साली 139.5 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली, जी 2017 सालच्या तुलनेत 7.4% ने अधिक आहे. या दृष्याला पाहता, पर्यटन मंत्र्यांनी पर्यटन क्षेत्रात सहकार्याला बळकटी आणण्यासाठी ASEAN आणि भारत यांच्या दरम्यान 2012 साली झालेल्या सामंजस्य कराराच्या आराखड्याच्या अंतर्गत पर्यटनाच्या क्षेत्रात ASEAN-भारत सहकार्य वाढविण्यास देखील सहमती दिली आहे.

हवामानशास्त्र विभागाचे ‘दामिनी’ मोबाइल ॲप

अतिवृष्टी, उष्णतेची लाट, वादळ, थंडीची काडाका याबाबतचे हवामानाशी निगडित सर्व अपडेट नागरिकांना मोबाइलवर मिळावेत, यासाठी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने ‘दामिनी’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे.

'दामिनी’ या मोबाइल ॲपचे वैशिष्ट्य :
  • मान्सूनमधील वादळी पाऊस, विजांच्या गडगडाटाचे अचूक अंदाज या ॲपवरून नागरिकांना मिळणार आहे.
  • ॲपचे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच ते देशभरातील सर्व नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
  • भारतीय उष्णदेशीय हवामान संशोधन संस्था (IITM) आणि हवामान शास्त्र विभागातर्फे गडगडाटासह पडणारा पाऊस आणि विजांचे अचूक अंदाज व्यक्त करणारे मॉडेल विकसित करण्यात येते आहे. 
  • यासाठी आयआयटीएमने देशभरात 48 ठिकाणी सेन्सर बसवले आहेत.
  • यातून हवामान विभागाला वातावरणातील घडामोडी तत्काळ उपलब्ध होत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आयआयटीएम पुण्याने ‘दामिनी’ हे मोबाइल ॲप विकसित केले आहे.

Post a Comment

0 Comments