loading...

चालू घडामोडी 21 जानेवारी 2019

loading...

ओडिशाची ‘अमा घरे एलईडी’ योजना

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि राज्य अन्न सुरक्षा योजनेमध्ये सहभागी लोक या योजनेचे लाभार्थी आहेत.
 
ओडिशा पावर ट्रांसमिशन कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ही योजना राबविली जाईल. या योजनेचा फायदा घेण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे.
 
एलईडी बल्ब नसल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सीएफएल बल्ब वापरले जातात. यामुळे अतिरिक्त वीज खर्च होते आणि वीज बिलही अधिक येते.
 
या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ओडिशाला 3.8 कोटी LED बल्बची आवश्यकता लागणार आहे.


मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ उभारण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत ‘भारतीय सिनेमाचे राष्ट्रीय संग्रहालय’ या वास्तुचे उद्घाटन करण्यात आले.

संग्रहालय दक्षिण मुंबईच्या चित्रपट विभाग संकुल येथे उभारण्यात आले आहे आणि हे संग्रहालय ऐतिहासिक काळातले गुलशन महाल आणि आणखी एक नवी इमारत अश्या दोन इमारतींमध्ये तयार करण्यात आले आहे.


युरेनियमचा पुरवठा करण्याबाबत भारताचा उझबेकिस्तानाशी करार झाला

अहमदाबाद शहरात झालेल्या ‘व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2019’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उझबेकिस्तानाचे राष्ट्रपती शौकत मिर्झीयोयेव यांच्यात द्वैपक्षीय बैठक पार पडली.

बैठकीनंतर भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी युरेनियम या किरणोत्सर्गी पदार्थाचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबत भारतीय अणुऊर्जा विभाग आणि उझबेकिस्तानाच्या नोवोई मिनरल्स अँड मेटलर्जिकल कंपनी यांच्या दरम्यान करार करण्यात आला.


महाराष्ट्र सरकारने मियावाकी घनवन प्रकल्पाची राज्यात 'आनंदवन प्रकल्प' म्हणून अंमलबजावणी

मियावाकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञाने कमी जागेमध्ये घनवन (Dense Forest) संकल्पना विकसित केली असून जागतिक स्तरावर हा प्रकल्प रूजत आहे. 

महाराष्ट्रातील सध्याचे 20 टक्क्यांचे वनक्षेत्र 33 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी वन विभागाने लोकसहभागातून 50 कोटी वृक्षलागवडीचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.
 
या मोहिमेत मियावाकी घनवन प्रकल्पाची आनंदवन प्रकल्प म्हणून अंमलबजावणी करण्यासंदर्भात वन विभागास शिफारसी केल्या.


नवा CBI संचालक निवडण्यासाठी 24 जानेवारीला बैठक
सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी उच्चस्तरीय निवड समितीची 24 जानेवारीला बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नवा सीबीआय संचालक निवडणार आहे. भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गेंचा या निवड समितीमध्ये समावेश आहे.
 
सरकारने 21 जानेवारीला बैठकीचा प्रस्तावर दिला होता. पण मल्लिकार्जून खर्गे यांना 24 किंवा 25 जानेवारीला बैठक हवी होती असे सूत्रांनी सांगितले. अखेर परस्परसहमतीने नव्या संचालकांची निवड करण्यासाठी 24 जानेवारीची तारीख ठरवण्यात आली. निवड समितीने आलोक वर्मा यांना हटवल्यापासून सीबीआय संचालकाचे पद रिक्त आहे.

आयपीएस अधिकारी नागेश्वर राव सध्या हंगामी सीबीआय संचालक म्हणून कामकाज संभाळत आहेत. सीबीआय संचालकपद रिक्त ठेवल्याबद्दल काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका सुरु होती.


फेलिक्स ताशीसेकदी: काँगो देशाचे नवे राष्ट्रपती

काँगो देशाच्या घटनात्मक न्यायालयाने फेलिक्स ताशीसेकदी यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बहुमताने निवडून येणारे राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे आणि निवडणूकीत त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या मार्टिन फायुलू यांची याचिका फेटाळून लावली.
 
आफ्रिकन यूनियन या आंतरराष्ट्रीय संस्थेनी निवडणूकीच्या निकालाविषयी गंभीर शंका व्यक्त केल्या होत्या आणि त्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील नेमले होते. मात्र देशाच्या घटनात्मक न्यायालयाने याबाबतची याचिका फेटाळून लावली.

काँगो लोकशाही प्रजासत्ताक : (ऊर्फ कांगो) (सन 1971-1997: ‘झैरे’) हा मध्य आफ्रिकेतला दक्षिणेकडील एक देश आहे. किन्शासा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि काँगोलीज फ्रँक, झैरियन झैरे ही राष्ट्रीय चलने आहेत. फ्रेंच ही देशाची अधिकृत भाषा आहे.


अँड्री राजोलीना: मेडागास्करचे नवे राष्ट्रपती

दि. 19 जानेवारी 2019 रोजी अँड्री राजोलीना यांनी मेडागास्कर या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. मेडागास्कर (ऊर्फ मादागास्कर) हा आग्नेय आफ्रिका भागाच्या सागरी तटापासून जवळच असलेला एक मोठा बेट राष्ट्र आहे.