loading...

चालू घडामोडी 20 जानेवारी 2019

loading...


विमेन ऑफ इंडिया ऑर्गनिक फेस्टिव्हलचे आयोजन
या उत्सवात 1 हजारपेक्षा जास्त सेंद्रिय उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी एक मंच प्रदान करण्यात येणार आहे. यात कपडे, धान्य, बियाणे, बेकरी वस्तू इत्यादींचा समावेश आहे. 2015 पासून दरवर्षी हा उत्सव आयोजित केला जात आहे.
 
या योजनेचे उद्देश :
 • महिला शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक ग्राहकांशी जोडणे आणि वित्तीय समावेशनाद्वारे त्यांचे
 • सशक्तीकरण करणे.
 • भारतात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे.
 • स्त्रिया आणि बालकांशी संबंधित विविध उपक्रम आणि योजनांबाबत जनजागृती करणे.
 • महिला उद्योजक आणि शेतकऱ्यांच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनासाठी एक मंच प्रदान करणे.


​​"हुनर हाट" प्रदर्शनाचे उद्घाटन

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी नवी दिल्ली येथे ‘हुनर हाट’ प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
 
भारतीय कारागीरांच्या वारशाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग करण्यामध्ये हुनर हाट महत्त्वपूर्ण भूमिका निभावते.
 
हुनर हाटचा उद्देश :
 • अल्पसंख्याक समाजातील कारागीर व शिल्पकारांच्या ‘सम्मानासह विकासाला’ प्रोत्साहन देणे, हा त्याचा उद्देश आहे.

हुनर हाटचे फायदे :
 • प्रतिभावान कलाकारांना मंच मिळतो.
 • भारतीय कारागीर आणि कारागीरांच्या विश्वासार्ह ब्रँडची निर्मिती.
 • भारतीय वारशाचा प्रसार करणाऱ्या कारागीर आणि शिल्पकारांना प्रोत्साहन.
 • कारागीर आणि शिल्पकारांचे सशक्तीकरण आणि रोजगारासाठी मंच प्रदान करतो.
 • मेक ईन इंडिया, स्टँडअप इंडिया आणि स्टार्टअप इंडियाची उद्दिष्टे सध्या करण्यास सहाय्यक.

हुनर हाट बाबत :
 • उस्ताद योजनेअंतर्गत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय हुनर हाटचे आयोजन करते.
 • भारतातील अल्पसंख्यांक समुदायाच्या पारंपारिक कला आणि शिल्प जतन करणे हा उस्ताद योजनेचा उद्देश आहे.


उत्तर प्रदेशात सवर्णांसाठीच्या 10 टक्के आरक्षणास मंजुरी देणारे सहावे राज्य ठरले

उत्तर प्रदेश सरकारने राज्यात गरीब सवर्णांसाठी 10 टक्के आरक्षण लागू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक मंजूर केले होते.
 
आर्थिकदृष्ट्या मागासांकरीता आरक्षण लागू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील सहावे राज्य ठरले आहे.
 
यापूर्वी गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर 
 1. गुजरात, 
 2. तेलंगणा, 
 3. आंध्र प्रदेश, 
 4. हिमाचल प्रदेश
 5. उत्तराखंडमध्ये 
 6.  उत्तरप्रदेश


गुरु गोविंद सिंग जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या नाण्याचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी रोजी नवी दिल्लीत गुरु गोविंद सिंग यांच्या 350व्या जयंतीनिमित्त 350 रुपयांच्या स्मृती नाण्याचे प्रकाशन केले.
 
गुरु गोविंद सिंग यांचा हा जयंती उत्सव 30 डिसेंबर 2016 ते 5 जानेवारी 2017 दरम्यान तख्तश्री पाटणासाहिब येथे साजरा करण्यात आला होता.
 
या विशेष नाण्याचे वैशिष्ट्य :
 • या नाण्याचे वजन 35 ग्रॅम आहे (वजनापैकी 50 % चांदी, 40 % तांबे, 5 % निकेल आणि 5 % जस्त आहे)
 • नाण्याच्या समोरच्या बाजूवर - अशोकचिन्हाची प्रतिकृती, त्याखाली ‘सत्यमेव जयते’ची मुद्रा आहे. याच बाजूला मधोमध रुपयाचे चिन्ह आणि 350 हा आकडा आहे.
 • नाण्याच्या एका बाजूला इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ आणि दुसऱ्या बाजूला देवनागरीमध्ये ‘भारत’ असे मुद्रित करण्यात येणार आहे.
 • नाण्याच्या दुसऱ्या बाजूला - श्री हरिमंदिरजी पाटणासाहिबचे चित्र असणार आहे. 
 • या चित्राच्या वर आणि खालच्या बाजूला इंग्रजी आणि देवनागरीमध्ये ‘श्री गुरु गोविंद सिंग यांचा 350वी जयंती उत्सव’ असे मुद्रित करण्यात येणार आहे.
 • नाण्याच्या दोन्ही बाजूंना वर्ष 1666 आणि 2016 असेही मुद्रित करण्यात आले आहे.


इस्त्रोने सॅटेलाईटशी जोडले रेल्वे इंजिन

रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि अचूक मिळणार आहे. रेल्वेने आपले इंजिन इस्त्रोच्या उपग्रहाशी जोडले आहेत. त्यामुळे उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानांची माहिती नोंदवणे सोपे जाणार आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल.
 
रेल्वेच्या आगमन, प्रस्थानाची माहिती मिळणे आणि कंट्रोल चार्ट नोंदवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) उपग्रहावर आधारित रिअल टाइम ट्रेन इन्फर्मेशन सिस्टिमचा (आरटीआयएस) वापर सुरू करण्यात आला आहे.
 
ही प्रणाली 8 जानेवारीला माता वैष्णोदेवी-कटरा वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली- पाटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-जम्मू मार्गावरील काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत अंमलात आली आहे.
 
नव्या प्रणालीमुळे रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या संचालनासाठी नियंत्रण तसेच रेल्वे नेटवर्कला आधुनिक करण्यासाठी मदत मिळेल.
 
इंजिनमध्ये आरटीआयएसयुक्त इस्त्रो व्दारा विकसित गगन जियो पोजिशनिंग सिस्टिमचा वापर केला जात आहे. यामुळे रेल्वेचा वेग आणि स्थितीबाबत माहिती मिळू शकते.

Post a Comment

0 Comments