चालू घडामोडी 21 नोव्हेंबर 2018


उत्तरप्रदेशाचे ‘नारी सशक्तीकरण संकल्प अभियान’

 • उत्तरप्रदेश राज्य सरकारने दिनांक 19 नोव्हेंबर 2018 रोजी ‘नारी सशक्तीकरण संकल्प अभियान’ (Women Empowerment campaign) सुरू केले आहे.
 • राज्यात महिलांच्या कल्याणासाठी आणि त्यांना सशक्त करण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण एक महिना विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. 
 • शिक्षण, स्वयंरोजगार, आरोग्य, स्वच्छता, पोषण यासारखे अनेक मुद्दे समाविष्ट केले गेले आहेत.


एचडीएफसी बँकेच्या प्रमुखपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती

 • एचडीएफसी बँक या देशातील आघाडीच्या खासगी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आदित्य पुरी यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.
 • १ नोव्हेंबर २०१८ पासून ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल. याबाबत बँकेने २२ ऑक्टोबरला मागितलेल्या परवानगीला रिझव्‍‌र्ह बँकेने होकार कळविला आहे. पुरी यांच्या पाच वर्षे नियुक्तीला बँकेच्या भागधारकांनी २०१५ मध्ये मंजुरी दिली होती.
 • मुख्याधिकारीपदाबरोबरच व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार पुरी यांच्याकडे २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत असेल. तेव्हा ते वयाची ७० वर्षे पूर्ण करतील.
 • अलिकडे दोन खासगी बँकांच्या प्रमुखांच्या कार्यकाल वाढवून देण्याबाबात रिझव्‍‌र्ह बँकेने कठोर भूमिका घेत, तशा प्रकारचे प्रस्ताव फेटाळून लावले आहेत, या
 • पार्श्वभूमीवर पुरी यांच्या फेरनियुक्तीला मिळालेली मंजुरी महत्त्वाची ठरते.
 • बँक अस्तित्वात आल्यापासून पुरी हे एचडीएफसी समूहाबरोबर आहेत. कोणत्याही खासगी बँकेच्या प्रमुखपदावर सर्वाधिक काळ राहिलेले ते अधिकारी ठरले आहेत.


साखरेचे जागतिक दर ठरविण्यात भारताची भूमिका

 • ब्राझील, युरोपीय महासंघ, युक्रेन व थायलंडमधील कमी उत्पादनामुळे यंदा जागतिक स्तरावर साखर उत्पादन अतिरिक्त होणार नसून, ते वाजवी पातळीवर स्थिरावलेले दिसेल.
 • या बदललेल्या स्थितीत साखरेचा तुटवडा भासणाऱ्या देशांना निर्यातीसाठी भारताला पुढे सरसावण्याची संधी असल्याचे प्रतिपादन साखर निर्यातीसंदर्भात सोमवारी आयोजित परिसंवादात सहभागी तज्ज्ञांनी केले.
 • जागतिक स्तरावर साखरेच्या मागणीची पूर्तता भारताला करता येईल आणि सुमारे ५ दशलक्ष टन अतिरिक्त साखरेच्या निर्यातीची पूर्तता भारत करू शकेल.
 • म्हणूनच यंदाच्या वर्षांत साखरेचे जागतिक दर ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका भारताकडून बजावली जाईल, असे प्रतिपादन श्री रेणुका शुगर्स लि.चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी केले.
 • ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) आणि महाराष्ट्र साखर संघाच्या संयुक्त विद्यमाने या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
 • लंडनमधील मॅरेक्स स्पेक्ट्रॉन या जागतिक कमोडिटी ट्रेडिंग कंपनीचे विश्लेषक देव गिल यांच्या मते, साखर वर्ष २०१८-१९ साठी साखरेचे जागतिक उत्पादन १८७ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे.
 • हे प्रमाण मागील वर्षांतील १८६ दशलक्ष टन साखरेच्या वापराएवढेच आहे. याचा गेल्या वर्षी उत्पादित १६ दशलक्ष टन साखर अतिरिक्त ठरली होती.
 • पेट्रोलचे वाढते भाव पाहता ब्राझीलने आपला बहुंताश ऊस इथेनॉल निर्मितीकडे वळवला आहे. ज्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत यंदा १० दशलक्ष टन साखरेचे उत्पादन अतिरिक्त ठरेल.
 • यामुळे साखरेच्या जागतिक किमतीत आताच मोठी वाढ झाली आहे.
 • सुरुवातीला एआयएसटीएचे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी उत्पादनात वाढीबरोबरच साखरेच्या निर्यातीसाठी कारखान्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.


'टाइम'च्या यादीवर भारतीय अमेरिकींचा ठसा

 • जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे.
 • अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे. दिव्या नाग, डॉ. राज पंजाबी आणि अतुल गावंडे अशी या तिघांची नावे आहेत. 
 • 'टाइम' या नियतकालिकाचे आरोग्य संपादक आणि वार्ताहरांनी तब्बल महिनाभर अभ्यास केल्यानंतर या तिघांच्या नावांची शिफारस केली होती, यासाठी या तिघांच्या आरोग्य क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन करण्यात आले होते.
 • आरोग्य क्षेत्रातील चार विविध श्रेणींमध्ये या तिघांनीही केलेल्या कामकाजाची दखल घेण्यात आली असून, यामध्ये जनआरोग्य, उपचार, किंमत आणि तंत्रज्ञान यांचा समावेश होतो.
 • या प्रभावशाली लोकांच्या यादीमध्ये भौतिकशास्त्रज्ञ, वैज्ञानिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश असून, या सर्वांचे आरोग्यक्षेत्रातील योगदान विचारात घेऊन त्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. 


नवे शिलेदार

 • दिव्या नाग (वय 30) या 'अॅपल'च्या आरोग्य सेवेसंदर्भातील विशेष प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखालील शोधपथकाने तयार केलेले 'रिसर्चकीट' हे ओपन सोर्स ऍप डेव्हलपर डॉक्‍टर आणि संशोधकांसाठी लाभदायी असून, या मध्यमातून रुग्ण, तसेच वैद्यकीय माहितीचे शेअरिंग सहज शक्‍य आहे.
 • याचा समावेश "ऍपल वॉच'मध्ये करण्यात आला आहे. अतुल गावंडे हे आरोग्य क्षेत्रातील मोठ्या भागिदारीचे नेतृत्व करतात, ना नफा-ना तोटा या तत्त्वावर ही सुरू असून, याचा लाभ अमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जे. पी. मॉर्गन या कंपन्यांमधील दहा लाख कर्मचाऱ्यांना होतो.
 • राज पंजाबी यांनी दुर्गम भागांत आरोग्य सुविधा पोचविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.


नॉर्मन बोरलॉग - हरितक्रांतीचे जनक

 • मार्च २५, इ.स. १९१४ - सप्टेंबर १२, इ.स. २००९) हे अमेरिकन कृषितज्ज्ञ होते. त्यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते.
 • बोरलॉग यांनी गव्हाच्या रोगनिरोधक, अधिक उत्पन्न देणार्‍या वाणांचा शोध लावला.
 • त्यांच्या शोधामुळे  मेक्सिको, भारत, पाकिस्तान  इत्यादी देशांतील धान्याच्या उत्पन्नात आमूलाग्र क्रांती झाली.
 • डॉ. बोरलॉग यांना भारत सरकारतर्फे पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांना इ.स. १९७० सालच्या नोबेल शांतता पुरस्कारानेही गौरवण्यात आले.


अतिरिक्त भांडवलाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी RBIची तज्ञ समिती
 • भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) मंडळाने केंद्रीय बँकेसह 9.69 लक्ष कोटी रुपयांच्या अतिरिक्त भांडवलाशी संबंधित समस्यांचे परीक्षण करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्रातील बुडीत मालमत्तेच्या पुनर्रचनेसाठी एक योजना तयार करण्यासाठी सल्ला देण्यासाठीच्या हेतूने ही समिती तयार करण्यात आली आहे. 
 • याशिवाय, RBIने दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी सरकारी समभागांच्या खरेदी प्रणालीमधून 8,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

Post a Comment

0 Comments