चालू घडामोडी 22 नोव्हेंबर 2018


झारखंडमधील वीज प्रणाली सुधारण्यासाठी जागतिक बँकेकडून $310 दशलक्षची मदत

  • झारखंड वीज व्यवस्था सुधारणा प्रकल्पासाठीभारत सरकारचा जागतिक बँकेशी $ 310 दशलक्ष इतक्या रकमेचा एक कर्ज करार झाला आहे.
  • झारखंड राज्यामधील नागरिकांना विश्वसनीय, दर्जेदार आणि परवडणारी चोवीस तास वीज पुरवण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार आहे. या मदतीने वीजेसंबंधी पायाभूत सुविधा तसेच अन्य घटकांच्या विकासास सहाय्य प्राप्त झाले आहे. हा प्रकल्प 2014 साली सुरू करण्यात आलेल्या भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी वीज’ कार्यक्रमाचा एक भाग आहे.
  • झारखंड राज्यात ताज्या आकडेवारीनुसार सर्व नागरिकांमध्ये 80% हून अधिक नागरिकांना वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्वांना चोवीस तास अखंड पुरवठा देण्याच्या उद्देशाने प्रयत्न चालवले जात आहेत.
  • जागतिक बँक (WB) ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.


डॉ. राजेश भट लिखित 'रेडियो काश्मीर – इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर' पुस्तक

  • 'रेडियो काश्मीर – इन टाइम्स ऑफ पीस अँड वॉर' हे शीर्ष असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. डॉ. राजेश भट हे या पुस्तकाचे लेखक आहेत.
  • या पुस्तकात या प्रदेशात ‘रेडियो कश्मीर’ने सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता वाढविण्यास वठविलेल्या भूमिकेबाबत माहिती देण्यात आली आहे.


आगरतळा येथे 7व्या ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट’ या वार्षिक प्रदर्शनीचे आयोजन

  • 22 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या काळात त्रिपुरा राज्याच्या आगरतळा शहरात 7वे ‘आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट’ या वार्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • भारत सरकारचे पर्यटन मंत्रालय, पर्यटन विभाग, त्रिपुरा सरकार आणि ईशान्य राज्ये यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. प्रदर्शनीत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताच्या ईशान्य राज्यांमधील पर्यटनाच्या संभाव्य संध्या प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
  • भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मणीपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्किम या राज्यांचा समावेश आहे.


FIG अॅक्रोबेटिक विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघांना कांस्यपदक मिळाले

  • अझरबैजान देशाची राजधानी बाकू येथे झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ (FIG) अॅक्रोबेटिक विश्वचषक 2018’ या क्रिडास्पर्धेत पुरूष आणि महिलांच्या सांघिक विभागात भारतीय जिम्नॅस्टिक खेळाडूंनी दोन कांस्यपदके पटकावली आहेत.
  • या स्पर्धेत बेलारूस, इस्राएल, कझाकस्तान, भारत, रशिया आणि युक्रेन हे देश सहभागी झाले होते.
  • भारताच्या पुरूष संघात प्रिन्स अॅरिस, सिद्धेश भोसले, ऋषीकेश मोरे आणि रेजिलेश सुरीबाबू यांचा समावेश होता. या गटात रशियाच्या संघांनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकाविले.
  • भारताच्या महिला संघात आयुषी घोडेश्वर, प्राची पारकी आणि मृण्मयी वालदे यांचा समावेश होता. या गटात जर्मनीने सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले.


लढाऊ जहाज तयार करण्यासाठी भारत आणि रशिया यांचा तांत्रिक करार

  • भारतात अॅडमिरल ग्रिगोरोव्हिच श्रेणीतले दोन लढाऊ जहाज तयार करण्यासाठी भारताने रशियासोबत एक तांत्रिक करार केला आहे. $ 500 दशलक्ष इतक्या रकमेचा हा करार भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) आणि रशियाच्या रोसोबोरोनेक्सपोर्ट यांच्यात झाला आहे.
  • या करारामधून रशियाकडून तांत्रिक हस्तांतरणासह अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जित दोन लढाऊ जहाजे भारतातच तयार करण्यात येणार

Post a Comment

0 Comments