चालू घडामोडी 30 नोव्हेंबर 2018संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन ने 'मिशन रक्षा ज्ञान शक्ती' सुरू केले :

केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी 27 नोव्हेंबर 2018 रोजी औपचारिकपणे नवी दिल्ली येथे 'मिशन रक्षा ज्ञान शक्ती' सुरू केले.

या कार्यक्रम दरम्यान, संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO), संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रम (DPSUs) आणि ऑर्डनान्स फॅक्टरीज (OFs) यांनी यशस्वीरित्या बौद्धिक संपत्ती अधिकार (IPR) अर्ज मुळे प्राप्त झालेले मुख्य शोध आणि नवाचार दर्शविण्यात आले.
 
मिशन रक्षा ज्ञान शक्ती: ठळक वैशिष्ट्ये - 
 • संरक्षणक्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या पुढाकाराचा एक भाग म्हणून संरक्षण उत्पादन विभागाने मिशन रक्षा ज्ञान शक्तीची स्थापना केली आहे.
 • स्वदेशी संरक्षण उद्योगातील IPR संस्कृतीला प्रोत्साहन देणे हे उद्दीष्ट आहे.
 • गुणवत्ता आश्वासन महानिदेशालय (DGQA) यांना कार्यक्रम समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 • भारतीय संरक्षण निर्मिती पर्यावरणात IP संस्कृतीची निर्मिती करणे हा कार्यक्रमांचा शेवटचा उद्देश आहे.


अरविंद सक्सेना यांची UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती :

भारताचे राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी 28 नोव्हेंबर 2018 रोजी अरविंद सक्सेना यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.
 
त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ कार्यालयात प्रवेश करण्याच्या तारखेपासून 7 ऑगस्ट, 2020 पर्यंत जेव्हा ते वयाचे 65 वर्ष पूर्ण करतील किंवा पुढील आदेशपर्यंत जे आधी असेल तो पर्यंत असेल.
 
जून 2018 मध्ये सरकारने सक्सेना यांना UPSCचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी निवृत्त होत असलेल्या विनय मित्तल यांच्याकडून प्रभार आपल्या हातात घेतला.


अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र ठरणार पहिलेच राज्य :

होलटेक इंटरनॅशनल कंपनीने महाराष्ट्रामध्ये अणुऊर्जा साधनांचा उत्पादन प्रकल्प उभारण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे अणुऊर्जा साधनांचे उत्पादन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
 
कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार, हा प्रकल्प उभारण्यासाठी महाराष्ट्रामध्ये कंपनीकडून 4,900 कोटी रुपयांची (68 कोटी डॉलर) गुंतवणूक होणे अपेक्षित आहे.
 
ऊर्जा आणि प्रक्रिया, एरोस्पेस, पेट्रोकेमिकल आणि इतर क्षेत्रातील कंपन्यांना संयंत्रांची निर्मिती करताना लागणाऱ्या अवजड सुटय़ा भागांची निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.
 
राज्य शासनाकडून प्रकल्प उभारणीसाठी लागणारी मंजुरी-परवानगी एक खिडकी योजनेतून सुलभरीत्या देण्यात येणार आहे.
 
होलटेक इंटरनॅशनल ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील विशेषत: अणुऊर्जा क्षेत्राशी निगडित तज्ञ कंपनी आहे.
 
आजवर विविध 35 देशातील 200 हून अधिक अणुऊर्जा प्रकल्पांना या कंपनीने सुटे भाग पुरविले आहेत.


जगदीशचंद्र बोस जन्मदिन - ३० नोव्हेंबर १८५८ :

सर जगदीशचंद्र : (३० नोव्हेंबर १८५८- २३ नोव्हेंबर १९३७). भारतीय भौतिकीविज्ञ व वनस्पती शरीरक्रिया- वैज्ञानिक. वनस्पतींच्या वृद्धीचे व प्रकाश, विद्युत्, स्पर्श यांसारख्या बाह्य उद्दीपनांना मिळणाऱ्या वनस्पतींच्या प्रतिसादांचे मापन करण्याकरिता त्यांनी केलेल्या आद्य कार्याकरिता जगप्रसिद्ध.

बोस यांचा जन्म बंगालमधील (आता बांगला देशातील) मैमनसिंग येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण
सर जगदीशचंद्र बोससर जगदीशचंद्र बोस कलकत्ता येथील सेंट झेवियर कॉलेजमध्ये झाले. कलकत्ता विद्यापीठाची बी.ए. पदवी मिळविल्यानंतर ते वैद्यकाचा अभ्यास करण्यासाठी लंडन विद्यापीठात गेले.

तथापि शिष्यवृत्ती मिळाल्याने ते केंब्रिज विद्यापीठात निसर्गविज्ञानाचा अभ्यास करण्याकरिता गेले. तेथे लॉर्ड रॅली या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ मिळाला. १८८४ मध्ये त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पदवी संपादन केली. त्यानंतर १८८५ मध्ये कलकत्त्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.

१९१५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर कलकत्ता विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. 

१९१७ साली कलकत्ता येथे त्यांनी बोस रिसर्च इन्स्टिट्यूट ही संशोधन संस्था स्थापन केली आणि मृत्यूपावेतो तिचे संचालक म्हणून त्यांनी काम केले.


शाश्वत नील अर्थव्यवस्था परिषद (Sustainable Blue Economy Conference) :
 • ठिकाण :- नैरोबी (केनियाची राजधानी)
 • कालावधी :- 28 नोव्हेंबर 2018 
 • आवृत्ती :- पहिली 
 • आयोजक :- केनिया सरकार 
 • सह यजमान :- जपान आणि कॅनडा
 • थिम :- 'निळी अर्थव्यवस्था आणि 2030 शाश्वत विकासाचा अजेंडा ' 
 • भारताचे प्रतिनिधित्व :- नितिन गडकरी
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) ने आपल्या पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-४३ च्या मदतीने ८ देशांचे ३० उपग्रह अवकाशात सोडणार आहे.
 
या ३० पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत. सोबत भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटेलाइटदेखील अवकाशात झेपावणार आहे. हे पीएसएलव्हीचे ४५ वे प्रक्षेपण आहे.


गोव्याच्या 49व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ चा समारोप :

28 नोव्हेंबर 2018 रोजी गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक 49व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (International Film Festival of India -IFFI) या कार्यक्रमाचा समारोप झाला.

यावर्षीचा -
 • केंद्रीत देश (focus country) – इस्राएल
 • केंद्रीत राज्य (focus state) – झारखंड (यावर्षी प्रथमच) 
 • सिनेमा क्षेत्रात आयुष्यात दिलेल्या योगदानाबद्दल दिलेले पुरस्कार -IFFI 
 • विशेष पुरस्कार – सलीम खान (भारताचे चित्रपट लेखक)
 • जीवनगौरव पुरस्कार – डेन वोलमन (इस्राएलचे चित्रपट निर्माता)

नऊ दिवसांच्या या कार्यक्रमात 67 देशांमधून आलेल्या 220 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले गेलेत. जर्मनीच्या ‘सील्ड लिप्स’ या चित्रपटाने या महोत्सवाची सांगता झाली.
 
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) याची सन 1952 मध्ये स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम दरवर्षी गोव्यामध्ये आयोजित केला जातो. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.


हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मंजूर :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेत मांडलेले मराठा आरक्षण विधेयक कोणत्याही चर्चेविना एकमताने मंजूर. सर्व सदस्यांनी विधेयकास पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मानले आभार.
 
मराठा आरक्षण विधेयकाचे नाव : सन २०१८ चे विधानसभा विधेयक क्र. ७८ : महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे आरक्षण विधेयक, २०१८


डॅन वोलमॅन यांना इफ्फी 2018 मध्ये जीवनगौरव पुरस्कार

इस्रायलचे फिल्ममेकर डॅन वोलमॅन यांना भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
यावर्षी इफ्फी 2018 मध्ये इस्रायल ‘कंट्री ऑफ फोकस’ आहे. तर झारखंड यावर्षी ‘स्टेट ऑफ फोकस’ निवडले गेले आहे. यावर्षी प्रथमच इफ्फिमध्ये स्टेट ऑफ फोकसची निवड करण्यात आली आहे.
 
इफ्फीने यावेळी दृष्टिहीन मुलांसाठी विशेष पॅकेज तयार केले असून, या विभागात शोले आणि हिचकी हे चित्रपट दाखविले जाणार आहेत.


भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (IFFI) :

या चित्रपट महोत्सवाचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, चित्रपट महोत्सव संचालनालय आणि गोवा सरकारद्वारे केले जाते.
 
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची स्थापना 1952 हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे.
 
या चित्रपट महोत्सवाद्वारे चित्रपट क्षेत्राला जगभरात आपली चित्रपट कला प्रदर्शित करण्याची संधी प्राप्त होते.


राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ मर्यादित (NPCC) याला मिनीरत्न दर्जा मिळाला :
 राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ मर्यादित (National Projects Construction Corporation Limited 

NPCC) या कंपनीला भारत सरकारकडून ‘मिनीरत्न: श्रेणी-I’ हा दर्जा देण्यात आला आहे.

NPCCला मिनीरत्न दर्जा मिळाल्यामुळे कंपनीला संचालक मंडळाचे अधिकार विस्तारल्यामुळे जलद निर्णय घेण्यात मदत होणार.
 
राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ मर्यादित (NPCC) हा जलस्त्रोत मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणारा एक केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आहे. 1957 साली ही कंपनी कार्यरत झाली. ही एक प्रमुख बांधकाम कंपनी आहे, जी देशाच्या आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करते.

ISRO: भारताचा पहिला हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह अंतराळात रवाना :


● इस्त्रोने पीएसएलव्ही सी४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम साधला

● यातील ३० उपग्रह अमेरिका, ऑस्ट्रेलिया,कॅनेडा, स्पेन,कोलंबिया, फिनलँड ,मलेशिया आणि नेदरलँड्सचे आहेत तर भारताच्या पहिल्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.

● इस्रोच्या प्रक्षेपणाचे ठळक मुद्दे :
 • ११२ मिनिटांच्या प्रक्षेपणात अंतराळात ३१ उपग्रह रवाना झाले आहेत यातील भारताचा उपग्रह सूर्यमालेत ६३० किमीच्या उंचीवर सोडण्यात येईल तर इतर सर्व ५०४ किमी उंचीवर सोडण्यात येतील 
 • ३०पैकी २३ उपग्रह अमेरिकेचे आहेत 
 • ३० उपग्रहांचे एकूण वजन २६१किलो आहे तर भारताच्या हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रहाचे वजन ३८० किलो आहे. 
 • भारताचा हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग उपग्रह शेती , मृदा सर्व्हे, वनस्पतीशास्त्र,पर्यावरण,पाणी , किनारी प्रदेश ई. गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणार आहे. 
 • हा उपग्रह २०२३ पर्यंत पृथ्वीचे निरीक्षण करणार आहे. 
 • हे प्रक्षेपण ४ टप्प्यांमध्ये करण्यात आले आहे. 
 • हे पीएसएलव्हीने केलेले ४५वे यशस्वी प्रक्षेपण होते. 
 • इस्त्रोने आतापर्यंत ५२ भारतीय तर २३९ परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

Post a Comment

0 Comments