चालू घडामोडी - (18 नोव्हेंबर)

MPSC Daily Current Affiars in Marathi


'‘धम्म चक्का’' - आंध्रप्रदेश राज्याचे राज्य चिन्ह :

◆ आंध्रप्रदेश राज्य सरकारने 2014 साली राज्य विभाजीत झाल्यानंतर पाच वर्षांनी अधिकृत वापरासाठी ‘धम्म चक्का’ किंवा ‘द व्हील ऑफ लॉं’ चित्रित असलेले बोधचिन्ह राज्याचे राज्य चिन्ह म्हणून निश्चित केले आहे.

◆ हे बोधचिन्ह अमरावती स्कूल ऑफ आर्ट या संस्थेनी तयार केले आहे.

◆ चिन्हात ‘धम्म चक्का’ (पाली भाषेत) म्हणजेच ‘धर्म चक्र’ (संस्कृत भाषेत) याने सर्वाधिक जागा व्यापलेली आहे.

◆ सोबतच त्यात ‘त्रिरत्नाचे वलय’, देठाच्या दोन्ही बाजूंना पाने असणारे चित्र आणि मौल्यवान रत्ने चित्रित आहेत.

◆ सजावटीसाठी चढत्या क्रमाने आतले 48, मध्यभागी 118 आणि बाह्य वर्तुळ 148 मि.मी.चे तीन वर्तुळे काढलेली आहेत आहेत.


अशोक कुमार गुप्ता भारतीय प्रतिस्पर्धी आयोगाचे (CCI) नवे अध्यक्ष :

◆ अशोक कुमार गुप्ता यांची भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे (CCI) नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

◆ गुप्ता यांची सुधीर मितल यांच्या जागी नेमणूक करण्यात आली आहे.

◆ स्पर्धा अधिनियम-2002 अंतर्गत स्थापित भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ही भारताची एक विनियामक संस्था आहे, ज्याचा उद्देश भारतीय औद्योगिक व व्यापार क्षेत्रात भ्रष्टाचार विरहित स्पर्धेला प्रोत्साहन देणे हा आहे. याची 14 ऑक्टोबर 2003 रोजी स्थापना करण्यात आली.

◆ गेल्या 9 वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने वृद्धी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धा कायदा मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


औरंगाबादमध्ये महाराष्ट्र राज्यातले दुसरे मेगा फूड पार्क :

◆ महाराष्ट्रातले दुसरे मेगा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात वाहेगाव आणि धनगांव या गावांमध्ये उभारण्यात आले आहे.

◆ ‘पैठण मेगा फूड पार्क’साठी 124.52 कोटी रुपये खर्च आला असून ते 102 एकर भूखंडावर उभारण्यात आले आहे. यामध्ये ड्राय वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, प्रि-कुलिंग, रायपनिंग चेंबर्स, फ्रीझर रुम, अन्न तपासणी प्रयोगशाळा, दुधाचे टँकर्स आदी सुविधा उपलब्ध आहेत.

◆ राज्यातल्या तिसऱ्या मेगा फूड पार्कलाही मंत्रालयाने मंजुरी दिली असून ते वर्धा जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.

◆ राज्यातले पहिले मेगा फूड पार्क सातारा जिल्ह्यात आहे.


आनंदवन'तर्फे पुण्यात राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र’ :

◆ राज्यातील २५ टक्के लोकसंख्या इंटरनेटच्या आहारी!

◆ राज्यातील २५ टक्के लोकसंख्या इंटरनेट व्यसनाच्या आहारी गेली असून त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.

◆ समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन रात्रभर जागरण केल्यामुळे पुरेशी झोप न होणे, शारीरिक आणि मानसिक नुकसान, चिडचिडेपणा, एकटेपणा आणि संशयी वृत्ती या गोष्टी बावताना दिसून येत आहेत.
ही बाब ध्यानात घेऊन व्यसनमुक्ती क्षेत्रात गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रातर्फे राज्यातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments