loading...

चालू घडामोडी 23 नोव्हेंबर 2018

loading...

आजच्या महत्वाच्या चालू घडामोडी प्रत्येक विषयाचे सविस्तर विश्लेषण.

MPSC Current Affiars

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC)
 • हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार असते.
 • 1945 साली स्थापित UNSC मध्ये 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स स्थायी सदस्य आहेत. या स्थायी सदस्यांकडे ‘व्हीटो’ (नकाराचा) अधिकार आहे. उर्वरित 10 अस्थायी सदस्यांची निवड दो वर्षांसाठी केली जाते.


नेपाळमध्ये भारताने ‘कॉनमॅक 2018’ प्रदर्शनी भरविली :
 • 22 नोव्हेंबर 2018 रोजी नेपाळमध्ये काठमांडूजवळ भक्तपूर या शहरात ‘कॉनमॅक 2018’ या शीर्षकाखाली बांधकाम उपकरणे आणि तंत्रज्ञानांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
 • नेपाळमधील भारतीय दूतावास आणि भारतीय उद्योग संघटना (CII) यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 • तीन दिवस चालणार्या या प्रदर्शनीत भारतामधील 150 हून अधिक व्यावसायिक आणि कंपन्यांनी भाग घेतला आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शिक्षण आणि गुंतवणूक क्षेत्रात पाच सहकार्य करार :
 • 21 नोव्हेंबर 2018 रोजी भारतानेऑस्ट्रेलियाशी पाच करार केले आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यादरम्यान हे करार केले गेले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
 • दिव्यांग व्यक्तींना सेवा प्रदान करण्यासाठी दिव्यांगतेच्या क्षेत्रामध्ये सहकार्यासाठी करार.
 • द्वैपक्षीय गुंतवणूक वाढविण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑसट्रेड यांच्यात करार.
 • केंद्रीय खणीकर्म नियोजन आणि संरचना संस्था (रांची, भारत) आणि कॅनबेराचे CSIRO यांच्यात वैज्ञानिक आणि नवकल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्यासाठी करार.
 • आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ (गुंटूर) आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात कृषी संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात सहकार्यासाठी करार.
 • इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (नवी दिल्ली) आणि क्वीन्सलँड विद्यापीठ यांच्यात संयुक्त पीएचडी कार्यक्रमासंबंधी करार.


थॉमस कुरियन - गुगल क्लाउडचे नवे CEO
 • मूळ भारतीय असलेले अमेरिकेचे थॉमस कुरियन हे सन 2019 मध्ये ‘गुगल क्लाउड’ या तंत्रज्ञान कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
 • ओरॅकल कंपनीचे माजी अध्यक्ष थॉमस कुरियन हे वर्तमान CEO डियान ग्रीने यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत.


लढाऊ जहाज तयार करण्यासाठी भारत आणि रशिया यांचा तांत्रिक करार
 • भारतात अॅडमिरल ग्रिगोरोव्हिच श्रेणीतले दोन लढाऊ जहाज तयार करण्यासाठी भारताने रशियासोबत एक तांत्रिक करार केला आहे.
 • $ 500 दशलक्ष इतक्या रकमेचा हा करार भारताच्या गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) आणि रशियाच्या रोसोबोरोनेक्सपोर्ट यांच्यात झाला आहे.
 • या करारामधून रशियाकडून तांत्रिक हस्तांतरणासह अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्जित दोन लढाऊ जहाजे भारतातच तयार करण्यात येणार आहे.


मालदीव ‘राष्ट्रकुल’मध्ये पुन्हा समाविष्ट होणार
 • मालदीवच्या मंत्रिमंडळाने 53 राष्ट्रांच्या राष्ट्रकुल (Commonwealth) यामध्ये पुन्हा समाविष्ट होण्यास मान्यता दिली आहे.
 • मालदिवने ऑक्टोबर 2016 मध्ये राष्ट्रकुलमधून बाहेर पडले. त्यावेळी माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन सत्तेत होते. देशावर भ्रष्टाचार तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन याबाबत दबाव टाकल्यानंतर देश राष्ट्रकुलमधून बाहेर पडले होते.
 • राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स) ही 53 सदस्य राष्ट्रांची आंतरसरकारी संघटना आहे, जे भूतकाळात ब्रिटीश साम्राज्याखाली होते. याची स्थापना दिनांक 11 डिसेंबर 1931 रोजी करण्यात आली. याचे मुख्यालय लंडन (ब्रिटन) येथे आहे. ब्रिटनची संसद ही संघटनेची संस्थापक आहे.

Post a Comment

0 Comments