loading...

49व्या IFFI महोत्सवाचे 'ओलू' चित्रपटाने उद्घाटन

loading...
Olu Munsami Movie IFFI 2018

49व्या IFFI महोत्सवाचे 'ओलू' चित्रपटाने उद्घाटन :

● दिनांक 20 ते 28 नोव्हेंबर 2018 या काळात गोवा येथे आयोजित 49 व्या ‘भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (IFFI) या कार्यक्रमाचे उद्घाटन खालील चित्रपटाने केली जाणार आहे.

● फीचर फिल्म -‘ओलू’ (मल्याळम चित्रपट)
नॉन-फीचर फिल्म – ‘खरवस’ (मराठी चित्रपट)

● भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) ची सन 1952 मध्ये स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम गोवामध्ये आयोजित केला जातो. एंटरटेंमेंट सोसायटी ऑफ गोवा हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत.


चार मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयावर नेमण्यासाठी कॉलेजिएमकडून शिफारस :

● सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजिएमकडून केंद्र सरकारला चार उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायालयाच्या पीठावर न्यायमूर्ती म्हणून पदोन्नती देण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. ते पुढीलप्रमाणे आहेत –
  • न्या. हेमंत गुप्ता (मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश)
  • न्या. आर. सुभाष रेड्डी (गुजरात उच्च न्यायालय)
  • न्या. एम. आर. शाह (पटना उच्च न्यायालय)
  • न्या. अजय रस्तोगी (त्रिपुरा उच्च न्यायालय)


व्यक्ती विशेष - एस. एस. देसवाल :

● एस. एस. देसवाल यांची इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) याच्या महानिरीक्षक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
●भारतीय पोलीस सेवा अधिकारी देसवाल यांनी आर. के. पचानंदा (निवृत्त) यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.
● इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे. 1962 सालच्या चीन-भारत युद्धानंतर CRPF कायद्याच्या अंतर्गत दिनांक 24 ऑक्टोबर 1962 रोजी या दलाची स्थापना करण्यात आली. हे दल भारताच्या चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रदेशाच्या सीमेवर तैनात करण्यात आले आहे. “शौर्य - दृढता - कर्म निष्ठा” हे दलाचे आदर्श वाक्य आहे.


अनुपम खेर :

● चित्रपट अभिनेता अनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII, पुणे, महाराष्ट्र) याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
●त्यांचा राजीनामा माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्वीकारला आहे.
●खेर हे कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी FTIIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे पहिले व्यक्ती ठरले आहेत.
● भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था (FTII) ही चित्रपट निर्मिती क्षेत्रातली एक स्वायत्त संस्था आहे. ही संस्था माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
●संस्थेची स्थापना 1960 साली झाली


जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता निर्देशांकामध्ये भारत 77व्या स्थानी :

● जागतिक बँकेनी आपला वार्षिक 'डूइंग बिझनेस 2019' अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘व्यवसाय सुलभता’ (ease of doing business) निर्देशांकामध्ये भारताला जगभरातल्या 190 देशांमध्ये 77 हा क्रमांक मिळाला आहे.


अन्य बाबी -

● व्यवसाय सुलभता’ निर्देशांकामध्ये न्यूझीलँड शीर्ष स्थानी आहे.
● सोमालिया हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात अयोग्य जागा ठरीत आहे.
● गेल्या वर्षी या निर्देशांकामध्ये भारताचा 100 वा क्रमांक होता. भारताने 10 पैकी आठ घटकांमध्ये सुधारणा दिसून आली.
●व्यवसाय सुरू करण्यात सुलभता, बांधकाम परवाना, वीज मिळविणे, आर्थिक पत मिळवणे, कर भरणे, सीमेवरील व्यापार करणे, कंत्राट अंमलात आणणे आणि तंटा सोडवणे अश्या घटकांचा अभ्यास केला गेला आहे

Post a Comment

0 Comments