loading...

चालू घडामोडी 24 नोव्हेंबर 2018

loading...

दैनंदिन आजच्या चालू घडामोडी परिक्षाभिमुख माहिती
‘आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार-2018’चा विजेता भारत :

 • आशिया खंडात सीमेलगत पर्यावरण-विषयक गुन्ह्यांविरुद्ध लढा देण्यामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी भारत सरकारच्या वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) याला संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) कडून ‘आशिया पर्यावरण अंमलबजावणी पुरस्कार-2018’ (Asia Environment Enforcement Award) याने सन्मानित करण्यात आले आहे.
 • वन्यजीवन गुन्हे नियंत्रण विभाग (WCCB) हे भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. विभागाला हा पुरस्कार ‘नवकल्पना’ गटात मिळाला आहे. विभागाने गुन्हेगारीचा कल ओळखण्यासाठी आणि गुन्ह्यांना रोखण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना शोधण्यासाठी वास्तविक वेळेत माहिती मिळविण्यासाठी ऑनलाइन ‘वन्यजीवन गुन्हे माहिती व्यवस्थापन प्रणाली’ विकसित केली आहे.
 • संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा दिनांक 5 जून 1972 रोजी स्थापना करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणी मध्ये मदत करते. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.


मंगल प्रभात लोढा - रीयल इस्टेट क्षेत्रातले भारतातले सर्वाधिक श्रीमंत उद्योजक :

 • ‘हुरुन रिच-लिस्ट 2018’ यामध्ये प्रसिद्ध यादीनुसार, लोढा समुहाचे संस्थापक मंगल प्रभात लोढा हे रीयल इस्टेट (जमीन-जुमला) क्षेत्रातले भारतातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याकडे 271.50 अब्ज रुपयांची संपत्ती आहे.
 • या यादीत लोढा यांच्या पाठोपाठ एम्बसी समूहाचे जितेंद्र विरवानी (231.60 अब्ज रुपये), DLF समूहाचे राजीव सिंग (176.90 अब्ज रुपये) यांचा द्वितीय आणि तृतीय क्रमांक लागतो आहे.


राष्ट्रीय हवाई संशोधन सुविधा केंद्र (NFAR)’ उघडण्यास मंजुरी :

 • आर्थिक कल्याणासंबंधी मंत्रिमंडळ समितीने ‘राष्ट्रीय हवाई संशोधन सुविधा केंद्र’ (National Facility for Airborne Research -NFAR) स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे.
 • हे सुविधा केंद्र उघडण्यासाठी सन 2020-21 आणि त्यानंतरच्या कालावधीत येणार्या खर्चासाठी 130 कोटी रुपयांचा निधी देखील मंजुर करण्यात आला आहे.


कर्तारपूर साहिब मार्गिका तयार करण्यासाठी मंजुरी

 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्तारपूर साहिब मार्गिका तयार करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक पासून ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत या मार्गिकेचा विकास केला जाणार आहे.
 • मार्गिकेमुळे भारतामधील शीख भाविकांना पाकिस्तानात रावी नदीकिनारी असलेल्या साहिब कर्तारपूर यांच्या गुरुद्वारा दरबारला भेट देता येणार. केंद्र  सरकारच्या निधीमधून हा प्रकल्प चालवला जाणार.
 • सोबतच, शीख धर्मगुरू गुरु नानक यांच्या 550व्या जयंती उत्सवाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढच्या वर्षी येणाऱ्या या जयंतीनिमित्त देशभरात आणि जगातही  उत्सव तसेच विविध समारंभ साजरे केले जाणार आहेत.


९९ व्या नाट्यसंमेलनाध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी :

 • 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत नाट्यसंमेलनाध्यक्षपदी गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
 • यंदाच्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी परिषदेच्या विविध शाखांकडून प्रेमानंद गज्वी यांच्यासह ज्येष्ठ नाटककार अशोक समेळ, श्रीनिवास भणगे, सुनील साकोळकर यांची नावे सुचविण्यात आली होती. परिषदेच्या बैठकीत 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या  अध्यक्षपदी गज्वी यांच्या नावाची एकमताने निवड करण्यात आली. 
 • गज्वी हे  98व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार ह्यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. 
 • 99 व्या नाट्यसंमेलनासाठी नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून परिषदेकडे प्रस्ताव आले आहेत. त्यावर अद्याप निर्णय बाकी आहे.


अंतराळ स्थानकाने पूर्ण केली वीस वर्षे :

 • अंतराळाला जवळून समजून घेण्यासाठी तसेच विविध प्रयोग करण्यासाठी 20 नोव्हेंबर 1998 या दिवशी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची स्थापना करण्यात आली होती. पृथ्वीभोवती ताशी 17,500 मैल वेगाने प्रदक्षिणा घालत असलेल्या या स्थानकाने आता अंतराळात वीस वर्षे पूर्ण केली आहेत. 
 • पृथ्वीवरून अंतराळात सोडलेली ही सर्वात मोठी वस्तू आहे. या स्थानकाचा आकार एखाद्या फुटबॉल मैदानाइतका मोठा असून, पृथ्वीवरून बहुतांश ठिकाणाहून हे स्थानक दिसू शकते.
 • 20 नोव्हेंबर 1998 या दिवशी अंतराळ स्थानकाचा पहिला भाग पाठवण्यात आला होता. हा भाग ‘नासा’ने बनवला होता. त्यानंतर रशियाने बनवलेला भाग पाठवण्यात आला. हे भाग अंतराळातच जोडून स्थानक विकसित करण्यात आले. हे स्थानक म्हणजे एक अंतराळ प्रयोगशाळा व एक मोठे अंतराळयानही आहे. 
 • वैज्ञानिक भाषेत त्याला ‘मोड्यूल’ म्हटले जाते. त्याचे भाग रोबोटिक तंत्राने एकमेकांशी जोडून राहतात. यामधील कोणत्याही भागात आलेली खराबी आपोआप दुरुस्त होऊ शकते. हे विशाल अंतराळ यान एका दिवसात पृथ्वीभोवती 16 वेळा प्रदक्षिणा घालते. त्यामुळे इथे राहणारे अंतराळवीर दिवसातून 16 वेळा
 • सूर्योदय पाहू शकतात! या स्थानकाच्या संचालनाचे काम प्रामुख्याने अमेरिका (नासा)  आणि रशियाकडे (रॉसकॉसमॉस) आहे. जपान, कॅनडा आणि युरोपियन संघाचे त्यांना सहकार्य मिळते. भविष्यातील चांद्र किंवा मंगळ मोहिमांसाठीही हे स्थानक उपयुक्त ठरू शकते. या स्थानकावर अंतराळवीरांचे एक पथक नेहमी वास्तव्यास असते. स्थानकावर आतापर्यंत 1500 पेक्षाही अधिक शोध लावण्यात आले आहेत.


संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिक विधेयक 2018’ मंजुर

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांकडून दिल्या जाणाऱ्या शिक्षण आणि सेवांच्या नियमन आणि प्रमाणीकरणासाठी ‘संलग्न आणि आरोग्यसेवा व्यवसाय विधेयक-2018’ याला मंजुरी दिली आहे.
 • ‘भारतीय संलग्न आणि आरोग्यसेवा परिषद’ आणि ‘राज्य संलग्न आणि आरोग्यसेवा परिषद’ स्थापन करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. संलग्न आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी ते मानदंड ठरवतील तसेच सुविधा उपलब्ध करून देणार.
 • केंद्रीय आणि संबंधित राज्य संलग्न आणि आरोग्यसेवा परिषदांची स्थापना करण्यात येणार. यात संलग्न आणि आरोग्यसेवा शाखेतील 53 व्यावसायिकांच्या समावेशासह 15 प्रमुख व्यावसायिक श्रेणींना विचारात घेतले जाणार. केंद्रीय परिषदेत 47 सदस्य आणि राज्य परिषदेत 29 सदस्य असतील.

Post a Comment

0 Comments