वॉरन हेस्टिंग्ज बद्दल माहिती

वॉरन हेस्टिंग्ज
१७७२ वॉरन हेस्टिंग्ज बंगालचा गव्हर्नर म्हणून भारतात आला. त्या वेळी कंपनीची आर्थिक स्थिती खूप खालावली होती. खजिना रिकामा पडला होता. कंपनीच्या अधिकार्‍यात लाचलुचपत वाढली होती. बंगालमध्ये अराजकाता वाढली होती. शहा आलम बादशहाने मराठयांचा आश्रय घेतला होता. मराठे व हैदर यांच्या सत्ता या काळात प्रबळ होत्या. हेस्टिंग्जने अनेक महत्वाच्या सुधारण केल्या. त्यांने व अयोध्येच्या बेगमांचे प्रकरण यात भाषांतरांवरूनरष्ट मार्गाचा अवलंब करुन त्याने कंपनीस प्रचंड पैसा मिळवून दिला. पण त्यामुळे कंपनीची बदनामी झाली.

वॉरन हेस्टिग्जंच्या काळात पहिले इंग्रज मराठा युध्द (१७७८ ते १७८२) उदभवले. नारायणराव पेशवे यांच्या खुनानंतर राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास गेले.

इंग्रजांनी मराठयांच्या राजकारणात या निमित्ताने भाग घेलता त्यातून झालेल्या युध्दात इंग्रजांना अपयश आले. सालबाईच्या तहाने (१७८२) हे युध्द थांबले. दक्षिणेत म्हैसूरचे राज्य गिळंकृत करुन हैदरअलीने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. त्याच्या बरोबर (१७६६ ते १७६९) या काळात इंग्रजांचे पहिले युध्द झाले. पण इंग्रजांना त्यात यश मिळाले नाही. हैदरशी दुसरे युध्द १७८० मध्ये सुरु झाले. हैदरने इंग्रजांशी पराक्रमाने तोंड दिले. हैदरचा १७८२ मध्ये मृत्यू झाल्यावर त्याचा मुलगा टिपू याने हे युध्द सुरु ठेवले शेवटी १७८४ साली मंगलोरच्या तहाने इंग्रजांना फारसा फायदा न होता हे युध्द थांबले.

कॉर्नवॉलिसची कारकिर्द (१७८६-१७९३) 

हा अत्यंत कार्यक्षम असा गव्हर्नर जनरल होऊन गेला. त्यांने राज्याच्या अंतर्गत प्रश्नात हस्तक्षेप करण्याचे टाळले. पण त्यास टिपूशी युध्द करावे लागले.(१७९०-१७९२) या युध्दात मराठे व निजाम यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली. होती. १७९२ च्या श्रीरंगपटटमच्या तहाने हे युध्द संपले. या वेळी टिपूला अर्धे राज्य व साडेतीन कोटी रुपये द्यावे लागले. इंग्रजांना मलबार कुर्ग, बारा महाल इ. प्रदेश मिळाले. कॉर्नवालिसने कंपनीच्या राज्यकारभारात महत्वाच्या सुधारण केल्या त्याने कंपनीच्या अधिकार्‍याने पगार वाढवले, पण त्यांचा खासगी व्यापार बंद केला. भाषांतरांवरूनरष्टाचाराचे निर्मूलन केले, न्यायव्यस्थेत बदल करण्यासाठी कॉर्नवॅालिसने कोड ची निर्मिती केली. बंगाल सुभाषांतरांवरूनयात कायमधारा पध्दती लागू केली.

र्लॉड कॉर्नवॉलिसनंतर आलेल्या सर जॉन शोरने (१७९३-१७९८) तटस्थतेचे धोरण स्वीकारले. जेव्हा मराठयांनी निजामावर हल्ला केला व खडर्याच्या लढाईत त्याचा पराभव केला (१७९५) तेव्हा शोरने त्यास मदत करण्यास नकार दिला.

वॉरन हेस्टींग्ज थोडक्यात कारकीर्द १ एप्रिल १७७२ - कलकत्ता येथे कंपनीचा गव्हर्नर म्हणून सत्तासुत्रे हाती घेतली .

उद्दिष्टे -
 • ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल या नात्याने कंपनीला स्थैर्य प्राप्त करुन देणे .
 • भारतात कंपनीची सत्ता दृढ करणे .
 • क्लाईव्हने सुरू केलेल्या व्दिदल शासन पद्धतीचा अंत करून कंपनीकडे प्रशासन व महसुल वसुलीची जबाबदारी घेतली .
 • बंगालची तिजोरी मुर्शिदाबादहून कोलकाता येथे आणली .कोलकाता हे कंपनीच्या राजकीय व्यवहाराचे केंद्र .
 • महसुल गोळा करण्यासाठी तसेच शासकीय कामकाजाकरिता ' कलेक्टर ' या अधिकाऱ्याची नेमणूक व त्याच्या मदतीला भारतीय कर्मचारी .
 • सर्व कामकाजावर देखरेख व नियंत्रणन ठेवण्यासाठी कोलकाता येथे ' बोर्ड आँफ रेव्हेन्यू ' (महसुल मंडळ) स्थापन .

न्यायदान पद्धतीचे पुनरुज्जीवन
 • प्रत्येक जिल्ह्यात एक मुलकी व एक फौजदारी न्यायालय प्रस्थापित केले .
 • या न्यायालयाच्या निकालाविरूद्ध कोलकाता येथे सद्र - दिवाणी - अदालत वासद्र - निजामत - अदालत यात अपील करता येत असे .
 • खटल्यांचा निकाल देण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली .

व्यापार विषयक धोरण
 • जकात मुक्तीचे परवाने देणे बंद केले .
 • कोलकाता , हुबळी , ढाका , मुर्शिदाबाद , पाटणा येथे जकात वसुली केंद्रे प्रस्थापित केली .
 • व्यापाराला चालना देण्यासाठी सुपारी , मीठ , तंबाखू वगळता सर्व मालावरिल जकातीत कपात करुन ती २५% वर आणली .

मराठे , म्हैसूर , अवधशी संबंध
 • १७७२ - शहाआलम मराठ्यांच्या मदतीने दिल्लीच्या सिंहासनावर बसवला .
 • १७६१ - १७७२ - पहिले मराठा - इंग्रज युद्ध .
 • १७७६ - पुरंदरचा तह इंग्रज व मराठे
 • १७७९ - वडगावचा तह इंग्रज व मराठे
 • १६ फेब्रुवारी १७८१ - सिप्री येथे इंग्रजांनी महादजी शिंदे यांचा पराभव केला .
 • मे १७८२- सालबाईचा तह मराठे व इंग्रज
 • १७८५ - वॉरन हेस्टींग्जची निवृत्ती...