Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

शिक्षक भरती 2019 पवित्र पोर्टल सुरू झाले

ads Code paste

pavitra portal
महत्वाचे -
पवित्र प्रणालीमध्ये खाजगी संस्था व जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदांची भरती करण्याकरिता बिंदुनामावली भरण्याची सुविधा दि. ०३/१०/२०१८ ते १९/१०/२०१८ या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मागासवर्गीय कक्षाकडून तपासलेली बिंदुनामावलीची प्रत पवित्र प्रणालीमध्ये upload करणे तसेच भरण्यात आलेली बिंदुनामावली Verify करण्याची सुविधा २-३ दिवसात उपलब्ध करण्यात येत आहे.


महत्वाची सूचना - ज्या उमेदवारांच्या अर्जामधील त्रुटी अद्यापि दूर झालेल्या नाहीत, अशा उमेदवारांसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचे स्तरावर सुविधा देण्यात आली आहे.

यासाठी दि. २६/९/२०१८ ते ३०/९/२०१८ या कालावधीत संबंधित उमेदवाराने त्यांचा बैठक क्रमांक शिक्षणाधिकाऱ्यांच्या ई मेल वर अथवा कोणत्याही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे जाऊन नोंदवावयाचा आहे.

दि. १/१०/२०१८ ते ५/१०/२०१८ या कालावधीत संबंधित उमेदवारांना त्यांची माहिती अद्यावत करून ती self certify करता येईल.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे ज्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकांची नोंद होईल, अशाच उमेदवारांना पवित्र प्रणालीतील त्याची माहिती अद्यावत करण्याची सुविधा उपलब्ध होईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

Post a Comment

0 Comments