तलाठी भरती बद्दल माहिती Talathi Bharti Mahiti Marathi

तलाठी भरती बद्दल माहिती

महाराष्ट्रात तलाठी भरती जिल्हा निवड समिती अंतर्गत महसूल विभाग व वन विभागा मार्फत तलाठी या पदासाठी 200 गुणांची लेखी परिक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी पात्रता, वयोमर्यादा, परिक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, तलाठी भरती बद्दल माहिती व नेहमी पडणारे प्रश्नांची माहित Talathi Bharti Mahiti Marathi खाली दिलेली आहे.

तलाठी भरती परिक्षा कशी असते?

जिल्हा निवड समिती : प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. दर वर्षी या पदासाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.

तलाठी भरती शैक्षणिक पात्रता?

तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.

संगणक/माहिती तंत्रज्ञानविषयक MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील.

माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती असते?

तलाठी पदाची जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा 38 वर्षे अशी राहील.( याबाबत ऍड मध्ये अधिक माहिती स्पष्ट होईल )

Talathi Bharti Mahiti Marathi

तलाठी भरती पदभरतीचा कार्यक्रम :

  • जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 50 ते 60 दिवसांचा असतो.
  • जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो.
  • तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
  • तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

तलाठी भरती परीक्षेचा दर्जा :

शासनाच्या तरतुदीनुसार ज्या पदाकरिता पदवी ही कमीत कमी अर्हता आहे, अशा पदांकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील; परंतु, मराठी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) दर्जाच्या समान राहील.

तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप :

तलाठी पदासाठीची लेखी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. त्यासाठी 100 प्रश्नांना प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे एकूण 200 गुण असतील. परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी असेल.

तलाठी भरती परीक्षेची तयारी :

या परीक्षेची तयारी करताना सर्वात महत्वाचे पाठीमागील प्रश्न पत्रीकांचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरतोय. विद्यार्थ्यांना बौद्धिक चाचणी व इंग्रजी हे घटक अवघड वाटतात; परंतु या घटकातील प्रश्नांचा रोज सराव केल्यास पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात. गुणवत्ता यादीत स्थान पटकावयाचे असेल, तर चारही अभ्यास घटक महत्त्वाचे आहेत, हे लक्षात असू द्या. सामान्यज्ञान या अभ्यासघटकाची व्याप्ती देखील भरपूर आहे, याची जाणीव सतत असू द्या. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रविषयक सामान्यज्ञान, आधुनिक भारताचा इतिहास, समाजसुधारक, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, महाराष्ट्रातील जिल्हे अशा अनेक विषयांचा समावेश यात आहे. म्हणूनच या परीक्षेची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे.

Talathi Bharti Information In Marathi

विद्यार्थ्यांना नेहमी पडणारे प्रश्न:

✔ तलाठी साठी किती शिक्षण पाहिजे?
पदवी उत्तीर्ण असावे
✔ तलाठी भरती किती वर्षांनी होते?
दरवर्षी होते.(जिल्हा निवड समिती वर अवलंबून)
✔ महाराष्ट्रात तलाठी परिक्षा कोण घेते?
जिल्हा निवड समिती
✔ तलाठी भरती परिक्षेत किती गुण घ्यावे?
185+(प्रवर्गानुसार)
✔ तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल?
वर दिलेली माहिती वाचा.
तलाठी भरती कधी होते?
रिक्त पदांवर अवलंबूण
✔ तलाठ्याचे काम काय असते?
गावांचा महसूल बघणे
✔ तलाठी नियुक्ती कोण करतो?
तहसिलदार
✔ तलाठी भरतीचा आ‍ॅनलाईन फॉर्म कोठे भरावा?
महसूल विभागाच्या वेबसाईटवर भरावा. (वेबसाईट पहा)
तलाठ्याला पगार किती असतो?
25500-81000
✔ तलाठी भरतीसाठी वय किती असावे?
18 वर्षे ते 33वर्षे