मा. सागर ढवळे सर यांची मुलाखत

अधिकारी सागर अरूण ढवळे यांनी आपल्या जिद्दीवर मिळवीलेले पदे.

  • राज्यकर निरिक्षक 2016
  • PST 2016
  • उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक 2017
  • तहसिलदार 2017
PST%2BSagar%2BDhavle

नाव- सागर अरुण ढवळे
तालुका-शिरुर जिल्हा-पुणे
निवड- Psi २०१६
एकूण गुण- 243
मुख्य परीक्षा गुण-137/200
मैदानी चाचणी गुण- 75/100
मुलाखत गुण – 31/40
शिक्षण- B. Sc agri.(76%) कृषी महाविद्यालय,पुणे. जून 2016 passout year,,
१२वी- चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरुर (75%)
10 वी – न्यू इंग्लिश स्कूल, शिरुर. (74%) Panel-१) श्री. ओक सर २) Addl. SP…srimati….सातपुते मॅडम

मुलाखत दिनांक _13 ऑक्टोबर _ २०१७ वेळ.. 4 .
ठिकाण – पोलिस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे.
त्यादिवशी दुपारच्या सत्रात खूप पाऊस सुरू झाला.. आम्ही 6-8 जण राहिलो होतो. पाऊस इतका होता की आमचे सर्वांचे ड्रेस ओले झाले होते…आम्हाला आम्ही होतो त्या ठिकाणावरून आम्हाला पोलिसांनी त्यांच्या गाडीतून आम्हाला Interview रूम च्या समोर आणून सोडले.. (छत्री डोक्यावर घेऊन).. पाऊस होता आणि उमेदवार थोडे राहिल्यामुळे जरा घाईतच झाले Interview.

माझ्या आधीचा उमेदवार बाहेर आल्यानंतर शिपायाने मला आत जायला सांगितले

मी: आत येऊ सर?
ओक सर: – हो. या बसा.

मी आत जाऊन दोघांनाही wish केले.(प्रथम मॅडम ना wish केले.) मला बसायला सांगितले.

मी:  thank you sir. आनि बसलो मग.
सर: कुठून आलात..?

मी: सर. मी मुक्काम पोस्ट chinchani. तालुका – शिरुर. जिल्हा- पुणे इथून आलो आहे.

सर: degree कशा मधे झाली?

मी – sir. माझे bsc agriculture झाले.. (यानंतर डायरेक्ट टेक्निकल गोष्टी चालू झाल्या)

सर:  पोलिसांचे महत्वाचे कायदे सांगा?

मी: IPC, CRPC, EVIDENCE act. Mumbai police act… Ase सांगितले..
सर: long फॉर्म सांगा.
(मी पूर्ण long-form सांगितले.)

सर: पोलिसांच्या वेगवेगळ्या wings सांगा.?

मी:.. CID. गुन्हे शाखा., .Anti.terrosist squad, खंडणी विरोधी पथक., आर्थिक गुन्हेगारी विरोधी पथक.,बॉम्ब पथक. श्वान पथक. (अश्या 8-10 wings सांगितल्या..)..

सर: SID माहीत आहे का?

मी: …………(मला माहीत होत पण ऐन वेळी मला आठवलं नाही).. Sorry sir.. मला याबद्दल माहीत नाही..

सर: सदोष मनुष्यवधा आणि खून यामधील फरक सांग?

मी:…… सर सदोष मनुष्यवधा मध्ये मृत्यू होईल असा हेतू नसतो.. उदाहरणार्थ अपघात किंवा नजरचुकीने झालेली घटना.. खुनामागे व्यक्तिला जीव मारण्याचा हेतू असतो.

सर: उदाहरण देऊन सांगा..

मी: पुस्तकामधील पाठ केलेले अ, ब. हे उदाहरण. Detail सांगितले.. (पण सांगताना थोडासा गडबडलो, तेव्हा sirani स्वतःहून मला एक्सप्लेन केले… मी thank you म्हटले.

मॅडम ना विचारायला सांगितले..

सर: passout कधी झाला?

मी: mam, जुन 2016

Madam – यावर्षीची Civil चि mains दिली का?

मी: हो,, मॅडम

मॅडम: first preference कोणता देणार?

मी: DYSP (मी लगेचच उत्तर दिले म्हणून मॅडम हसल्या.)
मॅडम – (अचानक डिग्री वर question).. Totipotency म्हणजे काय?

मी: mam. Totipotency म्हणजे regeneration capacity of plant from any parts of it.. (मला एवढ माहीत होत फक्त).. मी एवढ सांगून stop घेतला

मॅडम: callus culture mhnje काय)

मी:mam. Callus cम्हणजे undifferentiated mass of plant body… And it’s culture is called as callus culture… (हे degree मधे पाठ केलेली definition होती. But मी या answer वर confident नव्हतो.. पण मी तोंडावर तस काही दाखवले नाही…

सर – तुमची hobby क्रिकेट आहे, तुम्ही football mdhe gold medalist आहेत, athletics मधे silver medal आहे… बरोब्बर का?

मी: येस सर… बरोब्बर

सर – भारतात क्रिकेट एवढ का फेमस आहे?..

मी: सर. क्रिकेट हे ब्रिटिश काळापासून भारतात खेळले जाते.. आणि खूप सोपा खेळ असून कुठेही खेळता येतो.. तसेच नियम ही सर्वसामान्यांना कळतात .. No infrastructure is needed for that..emotional attachment पण खूप आहे… भारत पाकिस्तान सामने ही यामधे भर घालतात… आनि अजून. एक फळी and एक बॉल असल की बस्स मग.(मी एवढ सांगून थांबलो.. सर अणि मॅडम दोघेही माझ्याकडे बघत होते..)

सर – आता जो फुटबॉल चा एक event झाला इंडिया मधे काही माहीत आहे का?..

मी: सर under 17 चा वर्ल्ड कप झाला..

सर – आपल्या पंतप्रधानांनी एक कार्यक्रम केला hotat त्यासाठी… तो सांगा..

मी: (मला आठवले नाही. मी ट्राय करत होतो). सर mission one million as काहीतर नाव आहे but मला पूर्ण आठवत नाहिये.. सॉरी..

सर – police का hoychay?..म्हणजे. काही चुलता. भाऊ. पोलिस आहे का?.. की एखादा police officer लहानपणी शाळेत आला होता का?.. अस काही आहे का?..

मी:(या प्रश्नाचे उत्तर मी तयार केले नव्हते कारण मी PSI ची मुलाखत अशीच देणार होतो.. माझा राज्यसेवा चा स्कोर चांगला होता म्हणून मी या मुलाखती कडे जास्त लक्ष नव्हते दिले.. मला जे वाटल ते मी सांगितल.)  .. सर.. तस काहीच नाहिये. मला पोलिस सेवेबद्दल आवड आहे.. तसेच माझे college ही या मुख्यालयाच्या समोर असल्यामुळे मी बर्‍यापैकी या मुख्यालय मधे टाइम घालवण्यासाठी यायचो. तेव्हा पोलिस च्या वर्दी बद्दल खूप आकर्षण वाटले….. (या प्रश्नामुळे मला one of the highest marks मिळाले. .. Interview rank – 3rd in maharashtra.)

सर. – ठीके तुम्ही येऊ शकता…
मी – (उठलो.. आनि दोघानाही thank you. म्हटलं.. आनि जाता जाता काय माहीत अचानक थांबलो अणि पुन्हा……………. अचानक बोललो..
मी – सर,, मॅडम.. तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना दिवाळीच्या माझ्याकडुन हार्दिक हार्दिक शुभेच्छा..
(दोघेही थोडे हसले… आनि सर म्हटले तुम्हाला पण शुभेछा..)

Note-
माझे मुलाखतीचे मार्क्स 40 पैकी  31 आहेत ते जास्त येण्याची कारणे
मी थोड घाबरलो होतो पण लगेच स्वतः la सावरले.. आनि सर्वात महत्वाचे म्हणजे खर बोललो….

माझी राज्यसेवा चि मुलाखत खूप चांगली होती… As compared to PSI..त्यातही मला 66 गुण मिळाले..one of the highest… त्यात खूप interesting गोष्टी घडल्या…. . .. ती ही मी लवकरच शेअर करेल…

सागर अरुण ढवळे
Wish you all the best…..