loading...

सायना नेहवाल कांस्यपदक : आशियाई क्रिडा स्पर्धा 2018

भारताची फुलराणी सायना नेहवालला आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सायनावर २१-१७, २१-१४   अशा दोन सरळ सेट्समध्ये मात केली. ३६ वर्षांनी आशियाई स्पर्धांमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरलं आहे. यिंगवर मात करुन सायना स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल अशी अनेक भारतीय क्रीडा रसिकांना आशा होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात यिंगने पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवलं. पहिल्या सेटमध्ये यिंगने सायनाची अक्षरशः दमछाक करवली. मात्र सायनानेही लगेच हार न मानता यिंगला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला, मात्र यिंगच्या झंजावाती खेळासमोर तिची डाळ शिजू शकली नाही.

दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाही यिंगने चांगली आघाडी घेतली होती. मात्र सायनाने दमदार पुनरागमन करत बरोबरी साधली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मध्यांतरानंर यिंगने आपल्या खेळाची गती वाढवत सायनाला बॅकफूटला ढकलण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक स्मॅश आणि ड्रॉपचे फटके लगावत यिंगने सायनावर पुन्हा एकदा कुरघोडी केली. अखेर २१-१४  च्या फरकाने दुसरा सेट सहज जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

जकार्ता - इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सायनाचा चीन ताइपयेच्या ताई जु के हिने १७-२१,१४-२१ अशा सेटने पराभव केला आहे

उपांत्यफेरीच्या सामन्यात झालेल्या या पराभवामुळे सायना हिला वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. आता आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅथलेटिक्सआणि बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधू हिच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे.

भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आज उपांत्यफेरीचा सामना खेळणार आहे. यापूर्वी म्हणजे आठव्या दिवशी भारताने अॅथलेटिक्स मध्ये ३ आणि घोडेस्वारीमध्ये दोन रौप्यपदक जिंकले आहेत.