बंगालची फाळणी का झाली?

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे स्वतंत्रपणे पाहिले किंवा त्यांची तुलना केली तर काय दिसते? कोणताही आथिर्क, सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर नव्वदीच्या दशकात येईपर्यंत ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हणून जग आपल्याला हिणवायचे. ‘हिंदू रेट’ म्हणजे दरवषीर्चा विकासदर अडीच ते साडेतीन टक्के! पण आता तो १० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. भारतात लोकशाही टिकणार नाही, भारताचे तुकडे पडतील अशा शंका घेणाऱ्या तर कितीतरी चोपड्या दाखवता येतील. इंदिरा गांधी यांची पंतप्रधान असताना हत्या झाली (३१ ऑक्टोबर, १९८४) तेव्हाही अनेकांना भारत आता एकसंध राहणे कठीण; अशी (सानंद) भीती वाटली. मिझोरम, नागालँड, आसाम, पंजाब, काश्मीर इत्यादी राज्यांमधल्या फुटीर चळवळी, ‘एलटीटीई’सारखे संकट,  नक्षलवाद्यांचा नऊ राज्यांमध्ये पडलेला विळखा या साऱ्यांना तोंड देऊनही भारत आज नुसता टिकला नाही, तर वेगाने विकसित होतो आहे. कोणी कितीही शिव्या दिल्या तरी लोकशाहीचे चार स्तंभ आणि पाचवा स्तंभ म्हटली जाणारी स्वयंसेवी चळवळ यांनी देश तोलून धरला आहेच. भारतातली लोकशाही परिपूर्ण नसेलही पण पंडित नेहरू म्हणत त्याप्रमाणे

‘लोकशाहीच्या दोषांवरचा उपाय म्हणजे आणखी लोकशाही’ हाच नाही का? 

paratition%2Bof%2Bindia%2BBengal

 

‘माहितीच्या अधिकारा’सारखे शस्त्र सामान्य नागरिकांच्या हातात आल्याने आमची लोकशाही आणखी भरीव होते आहे. साठ वर्षांच्या प्रवासात नवजात राष्ट्र म्हणून एकदाही आमची लोकशाहीवरची सामूहिक श्रद्धा डळमळीत झाली नाही. उलट आमचा मतदार मस्तवालांनाही धूळ चारून धडा शिकवतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. साहित्य, संगीत, योग, तत्त्वज्ञान, धर्मविचार, समाजसेवा, चित्रपट, उच्च शिक्षण, उद्योग, संशोधन, अण्वस्त्र व अंतराळविद्या, इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी या व अशा असंख्य क्षेत्रांमध्ये भारतीयांनी स्वदेशात व परदेशांत देदीप्यमान कामगिरी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातल्या गेल्या सहा दशकांमधल्या राजवटी, लष्करशाह्या, कत्तली, लोकशाहीचे खून, धर्मांधता, दहशतवादाचा भस्मासुर, दारिद्य, अल्पसंख्य हिंदू-ख्रिश्चन-बौद्धांचा होणारा छळ, आथिर्क विकासातली पराधीनता, खोलवर रुजलेला भारतद्वेष, बांडगुळी संस्कृती रुजवण्याची धडपड याकडे बघायला हवे. पाकिस्तान व बांगलादेश या दोन्हींना इथे एकाच मापाने मोजल्याचे आश्चर्य वाटेल. पण गेल्या दोन-अडीच दशकांत बांगलादेशातील राजवटी पाकिस्तानला मागे टाकतील इतक्या भारतद्वेष्ट्या व धर्मांध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानात जास्त की बांगलादेशात असा प्रश्न पडावा, अशी स्थिती आहे. बांगलादेश हा पाकिस्तानचा भाऊ शोभावा असाच ‘पूर्व पाकिस्तान’ झाला आहे! पाकिस्तानात भारतातून स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना ‘मुहाजिर’ म्हणून बरोबरीची वागणूक देत नाहीत, हे आपण ऐकत आलो. बांगलादेशात स्थिती निराळी नाही. तिथे बिहारमधून मोठ्या आशेने गेलेल्या लक्षावधी मुस्लिमांना मालकीचे घर नाही, हक्काचा रोजगार नाही, नागरिकत्वाचा टिळा नाही. त्यांची चौथी पिढी रस्त्यावर भणंग वाढते आहे. त्यांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. पाकिस्तान व बांगलादेश या आज एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्याने आपण १९७१मध्ये केलेली पाकिस्तानची फाळणी तरी योग्य होती का, असा प्रश्न उभा ठाकला आहे. नसती झाली फाळणी तर परस्परांची एकमेकांना डोकेदुखी तरी राहिली असती. आता दोघेही स्वतंत्रपणे हातात हात घालून भारताचा सूड घ्यायला सज्ज झाले आहेत!
जन्नतची स्वप्ने पाहात पाकिस्तान व बांगलादेशात गेलेल्या मुस्लिमांची व्यथा सांगून प्रख्यात पत्रकार एम. जे. अकबर अलीकडेच एकदा भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हणाले, ‘लक्षात ठेवा, तुम्ही र्फस्ट क्लास नेशनचे र्फस्ट क्लास सिटिझन्स आहात. ते आहेत थर्ड क्लास देशांचे सेकंड क्लास सिटिझन्स. भारत महासत्ता म्हणून ओळखला जाईल तेव्हा तुम्ही त्या महासत्तेचे अभिमानी नागरिक असाल.’
एम. जे. अकबर उल्लेख करत असलेले ‘महासत्तेचे स्वप्न’ आता जवळ आल्यासारखे वाटतेय. ‘माझ्याच हयातीत मला अर्धपोटी गरिबीचा अंत पाहायला मिळेल,’ अशी आशा अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना वाटते आहे. फाळणी न होता भारत आज ‘अखंड’ असता तर हे महासत्तेचे स्वप्न पडले असते का? ‘व्हिजन २०२०’ पाहता आली असती का? येत्या वीस वर्षांत एकाही भारतीयाला उपाशी झोपू देणार नाही, अशी जिद्द बाळगता आली असती का? या सर्व प्रश्नंची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत. आपला इथवर प्रवास तर झाला नसताच; पण आपल्या देशाचे तारू कुठे भरकटले असते, किती खडकांवर आदळून फुटले असते, किती रक्तबंबाळ झाले असते, कितीवेळा यादवी झाली असती याची कल्पनाही नकोशी वाटते.
जिना यांची मुस्लिम लीग व काँग्रेस यांची तडजोड होऊन साऱ्या सत्तास्थानांचे समसमान वाटप झाले असते असे गृहीत धरले तरी जिनांनाही धुडकावून लावणारे कडवे गट पाकिस्तानातच निपजले होते, हे विसरता येत नाही. जिनांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळण्यापूवीर् तीन दिवस केलेले ‘सेक्युलर’ भाषण कडव्या नेत्यांना मुळीच आवडले नव्हते. जिनांची धर्मांध मुस्लिम हत्या करतील की काय, अशी भीती निर्माण झाली. पुढे ‘पाकिस्तान मुस्लिम लीग’चे अधिवेशन झाले तेव्हा पक्षाच्या नावातला ‘मुस्लिम’ शब्द काढून टाका, अशी सूचना जिनांनी केली. तेव्हा त्यांना गप्प बसवण्यात आले.
असल्या धर्मवेड्या अनुयायांसह जिना भारतात राहिले असते तर रात्रंदिन युद्धाचाच प्रसंग उभा ठाकला असता. वल्लभभाई पटेल यांनी ज्या शिताफीने साडेपाचशे छोट्यामोठ्या संस्थानांचे विलिनीकरण करून टाकले तसे ते अखंड भारतात शक्य झाले असते का, याचा विचार करण्यासारखा आहे. जुनागढ, हैदराबाद यासारख्या हेकट संस्थानिकांच्या हट्टाला नक्कीच मग धामिर्क रंग चढला असता आणि हिंदू-मुस्लिम संघर्षाला निमंत्रणच मिळाले असते. आम्ही स्वतंत्र देशाची मागणी सोडली ना, मग आमच्या या मागण्या मान्य करा, अशा ‘ब्लॅकमेल’ धमक्या झेलणे, हा इथल्या राज्यर्कत्यांचा दिनक्रम होऊन बसला असता. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी भारतात किती खालच्या थराचा अनुनय होऊ शकतो, याचा अनुभव अनेकदा आला आहे. (आठवा: शाहबानोला पोटगी देण्याचा सवोर्च्च न्यायालयाचा निर्णय अर्थहीन होण्यासाठी राजीव गांधी सरकारने केलेली कायद्यातील दुरुस्ती) अशा अनुनयात मुस्लिम समाजाचे काहीच हित नसते. अखंड भारतातील मुस्लिमांची मतपेढी आजच्यापेक्षा कितीतरी मोठी असती. ती राखण्यासाठी राजकारण्यांनी भलत्या तडजोडी केल्या असत्या तर आपल्या लोकशाहीलाच एक दिवस नख लागल्याशिवाय राहिले नसते. स्वातंत्र्यानंतरही मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली बहुसंख्य मुस्लिम राहिले असते तर देशातील राजकीय ध्रुवीकरण चमत्कारिक पद्धतीने झाले असते. आक्रमक हिंदुत्वाला भरघोस प्रतिसाद मिळण्यासाठी १९८९पर्यंत वाट पाहावी लागली; तितकी अखंड भारतात पाहावीच लागली नसती. एकीकडे धर्मांध मुस्लिम लीग आणि दुसरीकडे आक्रमक हिंदुत्ववाद यांच्या संघर्षात सहिष्णू भारतीय परंपरेचा वारसा निकालात निघाला असता. १९९२च्या डिसेंबरात पाडलेल्या बाबरी मशिदीचे चिरे आजतागायत भारतमातेला वारंवार जखमी करत आहेत. अखंड भारतात अशा किती जखमा तिला सोसाव्या लागल्या असत्या कुणास ठाऊक! फाळणी झाली नसती तर भारताचा रोज रक्तबंबाळ होणारा लेबनॉन तरी झाला असता किंवा सोविएत युनियनची जशी कित्येक शकले उडाली तशी अवस्था भारताची झाली असती. अशा स्थितीत कसला आथिर्क विकास अन् कसला सामाजिक न्याय? कसली लोकशाही आणि कसली भारतीय संस्कृती?
फाळणी झाल्यामुळे ज्यांना वेगळे व्हायचे होते ते गेले. आता उरलेल्यांनी नीट एकत्र राहायचे आहे, हा संदेश न सांगताही सर्वांना समजला. ज्या मुस्लिमांनी पूर्व किंवा पश्चिम पाकिस्तानात न जाता भारतात राहण्याचा निर्णय घेतला त्यांना पाठोपाठच देशाची घटना, लोकशाही, निवडणुका, न्यायव्यवस्था हे आधुनिक राष्ट्रजीवनाचे घटक स्वीकारावे लागले. स्वातंत्र्यानंतर भारतात मुस्लिम लीगच्या जात्यंध राजकारणाला फार मोठे बळ मिळू शकले नाही; हे यासंदर्भात आवर्जून लक्षात ठेवायला हवे!
खरेतर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताने कितीतरी शतकांनी मोकळा श्वास घेतला! ब्रिटिशांच्या नव्हे तर कित्येक शतके चाललेल्या आक्रमणांचा शेवट झाला होता. ती सगळी आक्रमणे पचवून काही हजार वषेर् जिवंत राहिलेल्या भारतीय संस्कृतीला स्वातंत्र्याने नवसंजीवनी दिली. फाळणी न होता स्वातंत्र्य मिळाले असते तर ही नवसंजीवनी मिळालीच नसती. उलट धर्मांध मुस्लिम आणि धर्मांध हिंदू शक्तींनी परस्परांशी लढताना भारतीय संस्कृतीचा गळा घोटला असता! सुदैवाने तसे न झाल्याने भारतीय संस्कृतीला ‘नवा अवकाश’ मिळाला आहे. भारतात लोकशाही कशी टिकली? याचे अनेकांना कुुतूहल वाटते. पण भारताच्या मातीलाच सहिष्णुतेचा अत्तरगंध आहे. लोकशाहीला या प्राचीन सहिष्णुतेचा स्पर्श झाल्यानेच आधुनिक मूल्ये व व्यवस्था भारताला परकी वाटली नाहीत. पाकिस्तान, बांगलादेशात लोकशाहीचे जे धिंडवडे निघाले आहेत, ते पाहता फाळणी झाली नसती तर आपल्याला इतक्या निकोपपणे लोकशाही राबवता आली असती का, अशी शंका मनात घर करते.
स्वातंत्र्यानंतर आता साठ वर्षांनी ‘फाळणी चूक की बरोबर?’ ‘फाळणी टाळता आली नसती का?’ असल्या प्रश्नांची चर्चा बंद केली पाहिजे. फाळणीबद्दल ज्या नेत्यांना दोष दिला जातो त्या सर्वांचे खरेतर आपण ऋणी राहायला हवे. फाळणी हे भारताला लाभलेले स्वातंत्र्याइतकेच मोलाचे वरदान आहे; हे आपल्याला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी इतिहासाकडे पाहण्याची नवी निर्मळ दृष्टी लाभल्याशिवाय राहणार नाही. या नव्या दृष्टीतच भारताचेच नव्हे तर साऱ्या भारतीय उपखंडाचे भविष्य घडविण्याची ताकद सामावलेली असेल!
आज पत्करावी लागणारी फाळणी होय.
पंडित जवाहरलाल नेहरू, २९ एप्रिल, १९४७.
कृष्ण मेनन यांना लिहिलेले पत्र
भारत आज आपला काही भूभाग तात्पुरता गमावत आहे. पण अधिक परिपूर्ण राज्य मिळाल्याने आपला मोठाच फायदा झाला आहे. फाळणीचे तोटे खूप आहेत, यात शंकाच नाही. पण फाळणी न होण्याने याहून मोठे तोटे झाले असते.
सरदार वल्लभभाई पटेल, २३ जून, १९४७
द टाइम्स ऑफ इंडिया
न सुटलेली काही कोडी
  • आज बांगलादेशात असलेल्या चितगांव टेकड्यांचा भाग बौद्धबहुल होता. तिथल्या रहिवाशांना यायचे होते भारतात. प्रत्यक्षात फाळणी झाली तेव्हा जावे लागले पूर्व पाकिस्तानात. हा निर्णय नेमका का झाला?
  • फाळणी झाली तेव्हा पंजाबचा गुरुदासपूर हा जिल्हा मुस्लिमबहुल होता. पण तो भारतात टाकायचे ठरले. माऊंटबॅटनने भारताला झुकते माप दिले, असा पाकिस्तानचा समज.
  • भारताच्या फाळणीचा अंतिम आराखडा बनवणारे सर सिरिल रॅडक्लिफ यांनी देश सोडून जाताना सारी कागदपत्रे जाळून का टाकली?
हे आज लक्षात आहे का?
  • फाळणी होणार हे दिसू लागल्यावर मुस्लिम लीगचे बंगाली नेते एच. एस. सुऱ्हावदीर् आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते शरच्चंद बोस (नेताजी सुभाषचंद बोस यांचे बंधू) यांनी ‘एकसंध बंगाल’ची मोहीम सुरू केली.
  • ‘एकसंध बंगाल’ भारत किंवा पाकिस्तानात सामील होणार नव्हता. तो एक स्वतंत्र राष्ट्र असणार होता. या प्रस्तावावर महात्मा गांधी आणि महंमद अली जिना या दोन्ही नेत्यांशी चर्चाही झाल्या.
  • ऑगस्ट १९४७ मध्ये पंजाबातील अमृतसरमध्ये सर्वाधिक रहिवासी होते ते मुस्लिम.
  • पाकिस्तान जसा पूर्व आणि पश्चिम असा दोन भागांत देण्यात आला तसा पश्चिम पाकिस्तानला ओलांडून गेल्यावर असणारा वायव्य सरहद्द प्रांत हा ‘पश्चिम भारत’ करा, अशी मागणी खान अब्दुल गफारखान म्हणजेच सरहद्द गांधी यांनी केली होती.
  • पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान यांना जोडण्यासाठी भारताच्या भूभागातून एक कॉरिडॉर असावा, अशीही मागणी काही काळ जोर धरत होती.