मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको इमारत जागतिक वारसा ठिकाण म्हणून घोषित :
मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको इमारत जागतिक वारसा ठिकाण म्हणून घोषित करण्यात आली आहे. या इमारतीचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईमधीलच एलिफंटा गुफा आणि व्हिक्टोरिया टर्मिनस (आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक) या ठिकाणांचा देखील अनुक्रमे 1987 साली आणि 2004 साली या यादीत समावेश करण्यात आला. आता देशात जागतिक वारसा स्थळांची संख्या 37 झाली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. या संघटनेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. UNESCO मध्ये 195 सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.
मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको इमारत जागतिक वारसा ठिकाण म्हणून घोषित करण्यात आली आहे. या इमारतीचा UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.
देशाची आर्थिक राजधानी असणार्या मुंबईमधीलच एलिफंटा गुफा आणि व्हिक्टोरिया टर्मिनस (आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानक) या ठिकाणांचा देखील अनुक्रमे 1987 साली आणि 2004 साली या यादीत समावेश करण्यात आला. आता देशात जागतिक वारसा स्थळांची संख्या 37 झाली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात स्थित संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. या संघटनेची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. UNESCO मध्ये 195 सदस्य राज्ये/राष्ट्रे आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

कॅनडाने अमेरिकेकडून येणार्या वस्तूंवर अब्जावधी कराची घोषणा :
कॅनडा सरकारने
अमेरिकेकडून येणार्या वस्तूंवर अब्जावधी कर आकारण्याची घोषणा केली आहे. 1
जुलै 2018 पासून निश्चित वस्तूंवर 10% किंवा 25% कर लादला जाईल. त्यानुसार
केचअप, लॉन मोवर आणि मोटर नौका अश्या वस्तूंवर $12.6 अब्ज इतका कर आकारला
गेला आहे.
अमेरिकेकडून पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादनांच्या आयात
शुल्कामध्ये एकतर्फी वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर, देशाचे नुकसान भरून
काढण्यासाठी कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला.
'रियुनाइट': हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मोबाईल अॅप :
हरवलेल्या
आणि सोडून दिलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी साहाय्यकारी
ठरणाऱ्या “रियुनाइट” या नव्या मोबाइल ॲप्लिकेशनचा शुभारंभ करण्यात आला आहे.
याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या
हस्ते करण्यात आले.
हे ॲप कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाव
आंदोलन’ या सामाजिक संस्थेनी कॅपजेमिनी कंपनीच्या मदतीने विकसित केले आहे.
बेपत्ता मुलांची छायाचित्रे, नाव-पत्ता यासह संपूर्ण माहिती, पोलीस
ठाण्यातली नोंद या ॲपवर पालक आणि नागरिक देऊ शकतात.
नवी दिल्लीत राष्ट्रीय वृद्धत्व केंद्र उभारले जाणार :
केंद्र
शासनाने नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)
येथे ‘राष्ट्रीय वृद्धत्व केंद्र’ (National Centre for Ageing) उभारण्याचा
निर्णय घेतला आहे. 29 जून 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
या केंद्राचे बांधकाम सुरू करण्यासाठी कोणशीला ठेवली गेली.
या केंद्रावर सुमारे 200 खाटा असणार, जेथे वयोवृद्ध लोकांसाठी बहू-तज्ञ आरोग्य सेवासुविधा प्रदान केल्या जाणार.
पंजाब, अंडमान-निकोबार बेटे मध्ये राष्ट्रीय व्यापक दस्तऐवज नोंदणी प्रणाली स्वीकारली :
29
जून 2018 रोजी केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायत राज आणि खाण मंत्री मंत्री
नरेंद्र सिंग तोमर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अंडमान आणि
निकोबार बेटांमधील सर्व उप-निबंधक कार्यालयांमधील राष्ट्रीय व्यापक दस्तऐवज
नोंदणी प्रणालीचे (NGDRS) उद्घाटन केले.
भाषा, प्रक्रिया, सूत्रे
आणि स्वरूपांच्या आधारावर राज्यांमधील प्रचलित विविधता आणि विविधता लक्षात
घेता, राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC) च्या सहकार्याने भूमि स्त्रोत
विभागाने सर्व राज्यांच्या आवश्यकता समाविष्ट करून राष्ट्रीय व्यापक
दस्तऐवज नोंदणी प्रणाली (National Generic Document Registration System
-NGDRS) विकसित केली आहे.
NGDRS प्रायोगिक तत्वावर पंजाब, राजस्थान,
महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. तर आणखी 6 राज्ये व
केंद्रशासित प्रदेश (गोवा, अंडमान व निकोबार बेटे, बिहार, झारखंड, मणिपूर,
मिझोराम) मध्ये ही प्रणाली टप्प्याटप्प्याने सुरू केली जात आहे. शिवाय,
अन्य 5 राज्यांनी यात रूची दाखवली आहे.
NITI आयोगाची 'महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांची पहिली डेल्टा मानांकन यादी :
NITI
आयोगाकडून 31 मार्च 2018 ते 31 मे 2018 या कालावधीत जिल्ह्यांकडून प्राप्त
माहितीच्या आधारावर ‘महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांसाठी पहिली डेल्टा मानांकन
यादी (प्रगती)’ प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुजरातच्या दाहोद
जिल्ह्याने 19.8 गुणांसह या यादीत प्रथम स्थान पटकावले आहे, जे बेसलाइन
मानांकन यादीत 17 व्या स्थानी होता. त्यानंतर सिक्कीम जिल्हा (सिक्कीम
राज्य) 18.9 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तेलंगणातला असिफाबाद जिल्हा
यावेळी 15 व्या स्थानी आहे, जो मार्च-18 मध्ये बेसलाइन मानांकन यादीत 100
व्या क्रमांकावर होता. या जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती दर्शवली.
ही
मानांकन यादी आरोग्य व पोषण, शिक्षण, कृषी व जलसंपदा, वित्तीय समावेशकता व
कौशल्य विकास आणि मुलभूत पायाभूत सुविधा या पाच विकासात्मक क्षेत्रांमध्ये
जिल्ह्यांनी साधलेल्या प्रगतीच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. 1 एप्रिल
2018 पासून जिल्हे चॅम्पियन ऑफ चेंज या डिजिटल व्यासपीठावर माहिती प्रविष्ट
करीत आहेत. या मानांकन यादीत एकूण 112 पैकी 108 जिल्हयांनी भाग
घेतला. उर्वरित चार जिल्हे माहिती मिळविण्याच्या प्रक्रियेत आहेत.
अवकाशयात्री पेगी व्हिटसन नासामधून निवृत्त :
अवकाशात
सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या अमेरिकेतील महिला अवकाशयात्री पेगी
व्हिटसन नासा या अवकाश संशोधन संस्थेतून 15 जून रोजी निवृत्त झाल्या.
पेगी
यांनी अवकाशात 665 दिवस 22 तास 22 मिनिटे वास्तव्य करण्याचा विक्रम केलेला
आहे. महिलांमध्ये सर्वाधिक स्पेस वॉक त्यांनी केले आहेत. 10 स्पेसवॉकमध्ये
त्यांनी 60 तास 21 मिनिटे एवढा मोठा काळ व्यतीत केला.
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात त्यांनी तीन मोहिमा पूर्ण केल्या. सन 2002 मध्ये त्यांचा पहिला अवकाश स्थानक प्रवास घडला.
अवकाश
स्थानकात नेमण्यात आलेल्या त्या पहिल्या वैज्ञानिक अधिकारी ठरल्या होत्या.
नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2017 दरम्यान त्या अवकाश स्थानकाचे सारथ्य
करणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
नासात त्या सन 1986 मध्ये आल्या,
तेथे अनेक भूमिका पार पाडत असताना त्या मीर अवकाश स्थानकातही प्रकल्प
वैज्ञानिक बनल्या. व्हिटसन यांचा जन्म आयोवात झाला.
तसेच राइस
विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केल्यानंतर जॉन्सन स्पेस सेंटर
येथे त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले. त्यानंतर कृग इंटरनॅशनल संशोधन गटात
त्या काम करीत होत्या.
सन 1996मध्ये त्यांची जॉन्सन स्पेस सेंटर
येथे अवकाशप्रवासासाठी उमेदवार म्हणून निवड झाली. त्याआधी त्यांनी
नासामध्ये जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते.
अमेरिका-रशिया
वैज्ञानिक कार्यकारी गटाच्या त्या सहअध्यक्षही होत्या. त्यांच्या सोळाव्या
मोहिमेत त्यांनी सुनीता विल्यम्सचा स्पेसवॉकचा विक्रम मोडला. एका
नियतकालिकाने अलीकडेच त्यांचा गौरव केला.