loading...

चालू घडामोडी २ जुलै २०१८

loading...
अग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात :
लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा समावेश आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. अग्नी 5 ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता अग्नी 5 मध्ये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेली अग्नी 5 ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्द करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी अग्नी 5 च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.

गेल्या महिन्यात ओडिशाच्या किनारपट्टीवरुन अग्नी 5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवण्याआधी अशा आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या चाचणी घेतल्या जातील. अग्नी 5 मुळे देशाच्या युद्धसज्जता कित्येक पटीनं वाढेल, असा विश्वास एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं व्यक्त केला. 'अग्नी 5 मधील नेव्हिगेशन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. याशिवाय याची क्षमतादेखील इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे.
भारतीय सैन्याच्या ताफ्यात सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा समावेश :
आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. अग्नी 5 ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता अग्नी 5 मध्ये आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेली अग्नी 5 ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्द करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी अग्नी 5 च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.

गेल्या महिन्यात ओडिशाच्या किनारपट्टीवरुन अग्नी 5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवण्याआधी अशा आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या चाचणी घेतल्या जातील. अग्नी 5 मुळे देशाच्या युद्धसज्जता कित्येक पटीनं वाढेल, असा विश्वास एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं व्यक्त केला. 'अग्नी 5 मधील नेव्हिगेशन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. याशिवाय याची क्षमतादेखील इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.

मुंबईतील व्हिक्टोरिया व आर्ट डेको एन्सम्बल्स :
१९ व्या शतकातील व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींना @UNESCO ने #जागतिकवारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले आहे. #बहरीन येथे सुरू असलेल्या #युनेस्को च्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. #WorldHeritag

कानपूरच्या मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले :
मुस्लीम समाजालाही रामायणातील चांगल्या गोष्टींबद्दल माहिती व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे या महिलेने म्हटले आहे. त्यामुळे सदर महिलेने सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण देशासमोर ठेवले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सदर महिलेचे नाव डॉ. माही तलत सिद्दिकी असे असून त्या कानपूरच्या प्रेमनगर येथे राहतात. कानपूर येथील बद्री नारायण तिवारी यांनी त्यांना दोन वर्षांपूर्वी रामायणाची प्रत भेट दिली होती. रामायण वाचल्यानंतर हे महाकाव्य उर्दू भाषेत लिहावे, असा त्यांनी निर्धार केला. रामायणामध्ये शांती आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला आहे आणि ते उर्दूत लिहिल्यानंतर आपण तणावमुक्त झालो असल्याचे डॉ. सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

उर्दू भाषेत रामायण लिहिण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. हिंदी भाषेतील रामायणाचा भावार्थ बदलू नये याकडे विशेष लक्ष द्यावे लागले. काही जण धार्मिक मुद्दय़ांवर चिथावणी देऊन हिंसा पसरविण्याचे काम करतात, मात्र कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही, असेही त्या म्हणाल्या. यापुढे लेखणीद्वारे सामाजिक ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

दिनविशेष

काही महत्वाच्या घटना:
२००१ बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
१९९४ चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड
१९८३ कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
१९७२ भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्‍या केल्या.
१९६२ रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ’वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.
१९४० सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
१८५० बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल
१८६५ ’साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना

जन्म :
१९३० कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
१९२५ पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
१९२३ जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी (मृत्यू: ? ? ????)
१९२२ पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर
१९०४ रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ’पोलो’ टी शर्टचे जनक (मृत्यू: १२ आक्टोबर १९९६)
१८८० गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)

मृत्यू :
२०११ चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: ७ एप्रिल १९२५)
२००७ दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
१९९९ मारिओ पुझो – अमेरिकन लेखक (जन्म: १५ आक्टोबर १९२०)
१९६१ नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली (जन्म: २१ जुलै १८९९)
१९५० युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
१८४३ डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक (जन्म: १० एप्रिल १७५५)
१७७८ रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (जन्म: २८ जून १७१२)
१५६६ नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (जन्म: १४ डिसेंबर १५०३)

चालू घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटर वर आणि जी प्लस फाॅलो करा...