loading...

चालू घडामोडी 2 जून 2018

loading...
बंगालच्या छौ मुखवट्याला GI टॅग मिळाले :
पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथील प्रसिद्ध छौ (Chhau) मुखवट्याला भौगोलिक संकेतक (GI) टॅग प्राप्त झाले आहे. GI नोंदणी आणि बौद्धिक संपदा भारत यांच्याकडून याबाबत प्रमाणपत्र मिळालेले आहे.

कुशमंडीचा लाकडी मुखवटा, पट्टचित्र, बंगालचे डोक्रास आणि मधुरकाठी (चटईचा प्रकारचा) या मुखवटा आणि त्यांच्या सजावटीशी संबंधित कलाकृतींना GI टॅग दिले गेले आहे. आता या कलाकृतींच्या सादरीकरणाचे अधिकार पश्चिम बंगालकडे आले आहे.

आतापर्यंत 25 उत्पादनांना GI टॅग प्राप्त झाले आहेत, त्यापैकी नऊ उत्पादने केवळ पश्चिम बंगालमधील आहेत. वस्तूंचे भौगोलिक संकेतक (नोंद व संरक्षण) अधिनियम-1999 च्या आधारावर GI टॅग दिले जातात. GI टॅगच्या यादीमध्ये समाविष्ट होणारे प्रथम उत्पादन म्हणजे - दार्जिलिंग चहा.

भारतीय थाळीफेकपटू विकास गौडा निवृत्त :
भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा याने 30 मे निवृत्तीची घोषणा केली. 15 वर्षाच्या कारकिर्दीनंतर वयाच्या 34व्या वर्षी विकासने निवृत्तीचा निर्णय घेतला. विकासने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. भारतातर्फे राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमध्ये पुरुष गटात सुवर्णपदक जिंकणारा विकास हा एकमेव खेळाडू आहे. विकासने चार वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

गेल्या वर्षी भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये विकासने कांस्य पदक पटकावले होते. त्यानंतर वर्षभरात विकासने कोणत्याही बड्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीचा निर्णय हा अपेक्षित होता.

विकासने अथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (AFI) यांना आपण निवृत्त स्वीकारत असल्याचे पत्र पाठवले. त्यानंतर AFIने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. 'भारताचा थाळीफेकपटू, ऑलिम्पियन, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा 2014 मध्ये सुवर्णपदक पटकावणारा विकास गौडा याने निवृत्ती स्वीकारली आहे.

भारतीय अॅथेलेटिक्समधील योगदानाबाबत आणि भारताला नव्या उंचीवर नेल्याबद्दल तुझे आभार. तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! असे ट्विट AFI ने केले आहे.

भारतीय रेल्वेसुरक्षा प्रचार मोहिमेत 'बिग'बी चा सहभाग :
रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्याच्या दृष्टीने रुळ न ओलांडण्याचा भाग महत्त्वाचा ठरतो. तसेच, रेल्वे परिसरातील स्वच्छतेचाही भाग लक्षात घेउन मध्य रेल्वेने जनजागृतीसाठी 'एक सफर रेल के साथ' मोहीम राबवली आहे.

रेल्वे रुळ न ओलांडणे आणि स्वच्छतेचा प्रसार करण्यासाठी मध्य रेल्वेने कलाकारांचं सहाय्य घेतले आहे. 'एक सफर रेल के साथ' या सुरक्षित रेल्वे प्रवासाचा संदेश देणाऱ्या मोहिमेचे दूत म्हणून अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय रेल्वेच्या सुरक्षा प्रचार मोहिमेत बिग बी सहभागी झाले आहेत. रूळ ओलांडणे जीवावर बेतू शकते, अशी सूचना रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येते. असे असतानाही पुलाचा किंवा सबवेचा वापर न करता रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून याआधीही बरेच मोहीम राबवले गेले.

वीज मंत्रालयाचे ‘प्राप्ती’ संकेतस्थळ व मोबाइल अॅप :
वीज मंत्रालयाकडून ‘प्राप्ती’ (पेमेंट रेक्टीफिकेशन अँड अनॅलिसिस इन पॉवर प्रोकुअरमेंट फॉर ब्रिंगींग ट्रान्सपीरंसी इन इनवॉइसींग ऑफ जनरेटर्स) या नावाने एक नवे संकेतस्थळ आधारित व्यासपीठ आणि मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे.

वीज निर्माते आणि वीज प्रेषण कंपन्यांमध्ये होणार्‍या वीज खरेदी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे.

UAE ने केरळमधून फळे, भाजीपाला आयात करणे बंद केले :
संयुक्त अरब अमिरात (UAE) ने केरळमधून ताज्या भाज्या आणि फळे आयात करण्यावर बंदी घातली आहे. केरळमध्ये निपाह विषाणूच्या उद्रेकामुळे झालेल्या मृत्यू घटनानंतर UAE ने हा निर्णय घेतला.

संयुक्त अरब अमिरात (UAE) हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने पारशी (अरब) आखाती प्रदेश आहे. हा देश 7 अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि संयुक्त अरब अमिरात दिरहॅम हे चलन आहे.

युरोपीय संघाने परदेशी तात्पुरत्या कामगारांसंबंधी कायदा कडक केला :
युरोपीय संघाने परदेशी तात्पुरत्या कामगारांसंबंधी कायदा आणखी कडक केला आहे. नव्या कायद्यानुसार, कंपन्या जेव्हा कामगारांना दुसर्‍या एखाद्या युरोपीय देशामध्ये तात्पुरते नियुक्त करतात ,तेव्हा त्यांना स्थानिक मानदंडांचे पालन करणे अनिवार्य आहे.

नव्या संशोधित नियमाद्वारे, एखाद्या पदावर नियुक्त कंत्राटी कामगाराला त्याच्याच पातळीवर काम करणार्‍या कायम कामगारांच्या इतकेच समान पातळीवर वेतन देऊ केले जाईल.

युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित 28 सदस्य देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे. हा समूह 1 नोव्हेंबर 1993 साली स्थापित करण्यात आला. सकल स्थानिक उत्पादन (GDP) याने युरोपीय संघ ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्रिटन EU मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहे.

2003 च्या युद्धबंदी कराराच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी भारत आणि पाकिस्तान सहमत :

भारत आणि पाकिस्तान या दोघांच्याही लष्करी कारवाया महासंचालकांनी (DGMO) जम्मू-काश्मीरमध्ये 2003 साली झालेल्या युद्धबंदीकराराची "परिपूर्ण अंमलबजावणी" करण्यास सहमती दर्शवली आहे.

पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

भारताचा GDP 7.5 नाही 7.3 टक्क्यांनी वाढणार – मूडीज रेटिंग :
2019 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जीडीपी मंदावला तर मोदी सरकारला याचा फटका बसेल अशी शक्यता आहे.
भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने बुधवारी म्हटले आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजनं वर्तवला आहे. यामुळे निवडणुकीच्या वर्षाआधी मोदी सरकारला याचा फटका बसेल अशी शक्यता आहे.

विशेष म्हणजे खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे. अर्थात 2019 मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे. समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चांगला राहील, मात्र इंधनाच्या महागाईमुळे अर्थव्यवस्थेची वाढ 7.5 टक्क्यांऐवजी 7.3 टक्क्यांनी घटेल असं मूडीजनं म्हटलं आहे

 काही महत्वाच्या घटना :
२००० लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर

 १९९९ पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.

१९५३ इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.

१९४९ दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.

१८९७ आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले - "माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे".

१८९६ गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ’रेडिओ’चे पेटंट घेतले.

 जन्म :
 • १७३१: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी मार्था वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८०२)
 • १८४०: इंग्लिश लेखक आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९२८)
 • १९०७: मराठी नाटककार आणि लेखक विष्णू विनायक बोकील यांचा जन्म.
 • १९३०: अमेरिकन अंतराळवीर पीट कॉनराड यांचा जन्म.
 • १९४३: भारतीय संगीतकार इलय्या राजा यांचा जन्म.
 • १९५५: इन्फोसिस चे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्म.
 • १९५५: चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा जन्म.
 • १९६३: अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर२०१२)
 • १९६५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू मार्क वॉ यांचा जन्म.
 • १९६५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू स्टीव्ह वॉ यांचा जन्म.
 • १९७४: अमेरिकन बुद्धीबळपटू गाटा काम्स्की यांचा जन्म.

 मृत्यू  :
 • १८८२: इटलीचा क्रांतिकारी ज्युसेप्पे गॅरिबाल्डी यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १८०७)
 • १९७५: वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक देवेन्द्र मोहन बोस यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)
 • १९८८: भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक राज कपूर यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९२४)
 • १९९०: ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते सर रेक्स हॅरिसन यांचे निधन. (जन्म: ५ मार्च१९०८)
 • १९९२: मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक डॉ. गुंथर सोन्थायमर यांचे निधन. (जन्म: २१ एप्रिल १९३४)
 • २०१४: भारतीय कार्डिनल दुर्यसामी सायमन लौरडुसामी यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १९२४)

Post a Comment

0 Comments