loading...

चालू घडामोडी 3 जून 2018

loading...
✓‘एनएसडीएल’च्या सुधा बालकृष्णन ‘आरबीआय’च्या पहिल्या ‘सीएफओ’
‘एनएसडीएल’च्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


महिला नेतृत्वाच्या रुपात रिझव्‍‌र्ह बँकेला पहिल्यांदाच मुख्य वित्तीय अधिकारीपदावरील व्यक्ती मिळाली आहे. ‘एनएसडीएल’च्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझव्‍‌र्ह बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तत्कालिन डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल हे रिझव्‍‌र्ह बँकेत सप्टेंबर २०१६ मध्ये मध्यवर्ती गव्हर्नर झाल्यानंतर मुख्य वित्तीय अधिकारी पदनिर्मिती हा मोठा फेरबदल आहे. आक्टोबर २०१७ मध्ये बँकेत हे पद भरण्याबाबतचे सुतोवाच प्रथम करण्यात आले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या वित्तीय कामगिरीचे नेतृत्व या पदाकडे असेल. त्याचबरोबर बँकेचा ताळेबंदाची जबाबदारीही सुधा यांच्याकडे असेल. सुधा बालकृष्ण या ‘एनएसडीएल’ या देशातील पहिल्या मोठय़ा डिपॉझिटरी सेवा कंपनीच्या पहिल्या ज्येष्ठ महिला अधिकारी राहिल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या संचालक मंडळातील सुधा या आता १२ व्या संचालक असतील. पुढील तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.

रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी डॉ. गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यवर्ती बँकेत मुख्य परिचलन अधिकारी भरण्याविषयीची सुचना तत्कालिन केंद्र सरकारला केली होती. मात्र अंमलबजावणी होऊ शकली नाही.

निपाह विषाणू बाबत :
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळाफुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरतो.

1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणुबाबतची प्रकरणे समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता.
2004 साली बांग्लादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. त्यानंतर तो माणसांपर्यंत पोहोचला.

सीबेड प्रोजेक्ट :
2030: महासागरांच्या संपूर्ण तळाचा नकाशा तयार करण्याचा प्रकल्प पाण्याखाली ड्रोन, व्यापारी जहाजे, मासेमारी करणार्या नौका तसेच संशोधकांनी ​गोळा केलेली माहिती यांच्याकडून प्राप्त होणार्या सर्व माहितीला गोळा करून एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे.
‘सीबेड प्रोजेक्ट 2030’ च्या योजनेनुसार 2030 सालापर्यंत जगभरात पसरलेल्या समुद्रतळाचा एक विस्तृत नकाशा तयार करण्यात येणार आहे.

भारतात तंबाखूयुक्त धुम्रपानामध्ये तीव्र घट:
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या अहवालानुसार, भारतात तंबाखूयुक्त धुम्रपानामध्ये तीव्र घट झाली आहे. भारतात धुम्रपानाचे प्रमाण 2000 साली 19.4% इतके होते, तर 2005 मध्ये ते 11.5% पर्यंत घसरले आहे.
WHO च्या अंदाजानुसार, ही घट अशीच राहिल्यास धुम्रपानाचे प्रमाण सन 2020 पर्यंत 9.8% असेल आणि ते 2025 सालापर्यंत 8.5% राहील.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संबंधित संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संघटना आहे.
7 एप्रिल 1948 रोजी WHO ची स्थापना झाली आहे.जागतिक आरोग्य संघटना (WHO)चे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड)या ठिकाणी आहे.
 WHO ही संयुक्त राष्ट्रसंघ विकास गटाचा सदस्य आहे. ही आरोग्य संघटना पूर्वी ‘एजन्सी ऑफ द लीग ऑफ नेशन्स’ म्हणून ओळखली जात होती

✓ पंकज सरन: डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) :
पंकज सरन यांची डेप्युटी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदावर नेमणूक करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी आहे.

1982 सालचे भारतीय विदेश सेवा अधिकारी पंकज सरन वर्तमानात रशियामधील भारतीय राजदूत आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) हे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुरक्षिततेबाबत भारताच्या पंतप्रधानांचे प्राथमिक सल्लागार आहेत.

✓न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल: NCDRCचे पुढील अध्यक्ष :
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. के. अग्रवाल यांची राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोग (NCDRC) यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय ग्राहक तंटा निवारण आयोग (NCDRC)हा ग्राहक संरक्षण कायदा-1986 अंतर्गत 1988 साली स्थापित एक अर्ध-न्यायिक आयोग आहे, जे ग्राहकांचे अधिकार आणि तक्रार निवारण संबंधात कार्य करते. याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

✓ अॅलिसिया पुचेता: पराग्वेच्या प्रथम महिला राष्ट्रपती :
पराग्वेच्या उपराष्ट्रपती अॅलिसिया पुचेता (68 वर्षीय) यांच्याकडे पराग्वेच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी तात्पुरती सोपविण्यात येणार आहे. वर्तमान होरॅसियो कार्टेस यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुचेता पद सांभाळणार आहेत.

या नियुक्तीसोबतच, पराग्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.

पराग्वे हा अर्जेंटिना, ब्राझील आणि बोलिव्हिया या देशांच्या सीमा लाभलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये असलेल्या या देशाची राजधानी असोनिजन हे शहर आहे. देशाचे राष्ट्रीय चलन गुएरॅनी हे आहे.

 ✓UAE ने केरळमधून फळे, भाजीपाला आयात करणे बंद केले :

संयुक्त अरब अमिरात (UAE) ने केरळमधून ताज्या भाज्या आणि फळे आयात करण्यावर बंदी घातली आहे. केरळमध्ये निपाह विषाणूच्या उद्रेकामुळे झालेल्या मृत्यू घटनानंतर UAE ने हा निर्णय घेतला.

संयुक्त अरब अमिरात (UAE) हा एक अरबी द्वीपकल्प देश आहे जो प्रामुख्याने पारशी (अरब) आखाती प्रदेश आहे. हा देश 7 अमिरातीचा महासंघ आहे. अबू धाबी ही या देशाची राजधानी आहे आणि संयुक्त अरब अमिरात दिरहॅम हे चलन आहे.

✓युरोपीय संघाने परदेशी तात्पुरत्या कामगारांसंबंधी कायदा कडक केला :
युरोपीय संघाने परदेशी तात्पुरत्या कामगारांसंबंधी कायदा आणखी कडक केला आहे. नव्या कायद्यानुसार, कंपन्या जेव्हा कामगारांना दुसर्‍या एखाद्या युरोपीय देशामध्ये तात्पुरते नियुक्त करतात ,तेव्हा त्यांना स्थानिक मानदंडांचे पालन करणे अनिवार्य आहे.

नव्या संशोधित नियमाद्वारे, एखाद्या पदावर नियुक्त कंत्राटी कामगाराला त्याच्याच पातळीवर काम करणार्‍या कायम कामगारांच्या इतकेच समान पातळीवर वेतन देऊ केले जाईल.

युरोपीय संघ (EU) हा मुख्यतः युरोपमध्ये स्थित 28 सदस्य देशांचा एक राजकीय आणि आर्थिक समूह आहे. हा समूह 1 नोव्हेंबर 1993 साली स्थापित करण्यात आला. सकल स्थानिक उत्पादन (GDP) याने युरोपीय संघ ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्रिटन EU मधून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत आहे.

✓2003 च्या युद्धबंदी कराराच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी भारत आणि पाकिस्तान सहमत :
भारत आणि पाकिस्तान या दोघांच्याही लष्करी कारवाया महासंचालकांनी (DGMO) जम्मू-काश्मीरमध्ये 2003 साली झालेल्या युद्धबंदीकराराची "परिपूर्ण अंमलबजावणी" करण्यास सहमती दर्शवली आहे.

पाकिस्तान हा दक्षिण आशियामधील एक देश आहे. पाकिस्तान हे केंद्रीय घटनात्मक प्रजासत्ताक असून देशात चार सुभे (परगणा) आणि चार केंद्रशासित प्रदेश आहेत. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. पाकिस्तानी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.

मौलाना आझाद शिष्यवृत्तीत महाराष्ट्र तिसरा :
अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने देशातील अल्पसंख्याक समाजाच्या गुणवंत मुला-मुलींसाठी ‘एमफील व पीएचडी’ या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी वर्ष २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षात ३ हजार २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती मिळविली असून राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे. 

काही महत्वाच्या घटना :
१९९८ जमिनीवरील व हवेतील लक्ष्यावर मारा करणार्‍या ’त्रिशूल’ या क्षेपणास्त्राची ’द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरुन कोचीजवळ यशस्वी चाचणी
१९८४ ’ऑपरेशन ब्लू स्टार’ – भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपुन बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
१९५० मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी ’अन्‍नपूर्णा’ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
१९४० दुसरे महायुद्ध – जर्मन वायूदलाने पॅरिसवर बॉम्बवर्षाव केला.
१९१६ महर्षि कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
१८१८ [वैशाख व. ३०, शके १७४०] मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.

जन्म :
१९६६ वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान व जलदगती गोलंदाज
१९४७ हिन्दूस्तानच्या फाळणीची ’मांउंटबॅटन योजना’ जाहीर झाली.
१९२४ म. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
१८९५ सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (मृत्यू: १० डिसेंबर १९६३)
१८९२ आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८६)
१८९० बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी’ (मृत्यू: १६ जानेवारी १९५४)
१८९० खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (मृत्यू: २० जानेवारी १९८८)
१८६५ जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २० जानेवारी १९३६)

मृत्यू :
२०१० अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष (जन्म: १६ आक्टोबर १९५९)
१९९७ रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री, ब्रम्हचारी चित्रपटातील ’यमुनाजळी खेळू ...’ या गाण्यासाठी प्रसिद्ध (जन्म: ११ आक्टोबर १९१६)
१९५६ वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक व नाटककार, त्यांची रणदुंदुंभी व राक्षसी महत्त्वाकांक्षा ही नाटके प्रसिद्ध आहेत. (जन्म: १८ मार्च १८८१)
१९३२ सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी (जन्म: २७ ऑगस्ट १८५९)
१६५७ विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ (जन्म: १ एप्रिल १५७८)