चालू घडामोडी 8 जून 2018

✓ मिशन शौर्य नंतर आता २०२४ च्या ऑलिंपिकसाठी मिशन 'शक्ती' :
• मिशन शौर्यच्या यशस्वी मोहिमेनंतर महाराष्ट्र शासन आता गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना २०२४ च्या ऑलिंपिकसाठी मिशन 'शक्ती'च्या माध्यमातून सज्ज करणार आहे

अमेरिकाने पॅलेस्टीनींना संरक्षण देणारा संयुक्त राष्ट्रसंघाचा ठराव नाकारला :
अमेरिकाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) एका ठरावाच्या विरोधात त्याचा व्हीटो कौल (निषेध/अमान्य करणे) दिला आहे. कुवैतने तयार केलेला हा प्रस्ताव पॅलेस्टीन नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी करतो आहे आणि हा एकतर्फी प्रस्ताव असल्याचे अमेरिकाचे म्हणणे आहे.

गाझा पट्टीसह कब्जा केलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टीन नागरिकांची सुरक्षितता आणि संरक्षणाची हमी देण्यासाठी उपाययोजना करण्याविषयी हा ठराव होता. तर हा ठराव तीन वेळा सुधारित करण्यात आला. यावेळी रशिया, फ्रान्स ब्रिटन, पोलंड, नेदरलँड्स आणि इथिओपिया यांनी ठरावाला मान्य केले.

संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार असते. या परिषदेला अनिवार्य निर्णयांना घोषित करण्याचा अधिकार देखील आहे. त्याला UNSC प्रस्ताव म्हणून ओळखले जाते. 1945 साली स्थापित UNSC मध्ये 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स स्थायी सदस्य आहेत. या स्थायी सदस्यांकडे ‘व्हीटो’चा अधिकार आहे. उर्वरित 10 अस्थायी सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. या 10 अस्थायी सदस्यांमध्ये आफ्रिका समुहातून 3 सदस्य; जंबूद्वीपीय समूह, पश्चिम यूरोपीय समूह आणि लॅटिन अमेरिका व कॅरेबियन समुहातून प्रत्येकी 2 सदस्य; पूर्व यूरोपीय समुहातून 1 सदस्य निवडण्यात येतात. यामध्ये एक सदस्य हा आखाती देश असणे आवश्यक आहे.

✓महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाकडून शाळेसाठी सुरक्षा नियम जाहीर :
• महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या हितार्थ आवश्यक सुरक्षितता बाळगण्यासाठी शालेय व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी मार्गदर्शके/नियम सूचित केले आहेत. हे नियम राज्य शाळा तसेच CBSE, ICSE आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांसाठी लागू आहेत.

नियमांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे –
• प्रत्येक शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयाने CCTV कॅमेरे बसवावेत. उपस्थिती दिवसातून तीनदा तपासून बघितली पाहिजे, जर विद्यार्थी गहाळ असल्याचे आढळल्यास पालकांना मजकूर संदेशाद्वारे त्वरित कळविणे.

• कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षा देताना त्यांना मानसिक किंवा शारीरिक दुखापत होणार नाही याची दक्षता घ्यावी. शाळेच्या परिसरात अनोळखी व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करणे.

• शिक्षक किंवा इतर कर्मचारी भरती करताना पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य असेल.

• मुला-मुलींसाठी वॉशरूम वेगळे आणि एकमेकांपासून योग्य अंतरावर असावेत आणि मुलींच्या शौचालय येथे एक स्त्री सेविका असावी. शाळेच्या बसमधील शेवटची मुलगी सोडल्याशिवाय सेविकानी बस सोडू नये.

✓आंध्रप्रदेशाची ‘शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना’ :
• आंध्रप्रदेश राज्य शासनाने ‘शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना’ सादर केली आहे. 2024 सालापर्यंत सहा कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.

• शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने कृषी उत्पन्न गुणवत्तापूर्ण करण्यासाठी ही पर्यावरण पूरक योजना आहे.

• राज्य शासनाच्या कृषी विभागाने या संदर्भात सस्टेनेबल इंडिया फायनान्स फॅसिलिटी (SIFF) सोबत एक सामंजस्य करार केला आहे. SIFF हा UNEP, वर्ल्ड अॅग्रोफॉरेस्ट्री सेंटर आणि BNP परिबास यांच्या भागीदारीने सुरु करण्यात आलेला एक पुढाकार आहे.

✓ओडिशा राज्य शासनाची ‘गोपालबंधू संबादिका स्वास्थ्य बिमा योजना’ :
• ओडिशा राज्य शासनाने राज्यातील कार्यरत पत्रकारांसाठी ‘गोपालबंधू संबादिका स्वास्थ्य बिमा योजना’ सुरू केली आहे.

• योजनेच्या पहिल्या टप्प्यात वर्तमानात कार्यरत असलेल्या 3,233 पत्रकारांना वार्षिक 2 लाख रुपयांसह आरोग्य विमा संरक्षण दिले जाणार आहे. पत्रकाराच्या कुटुंबातील किमान पाच सदस्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.


काही महत्वाच्या घटना:
२००४ आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण १८८२ या वर्षी झाले होते.
१९६९ लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव करुन बांगलादेश मुक्त केला. त्यानंतर त्यांना फील्ड मार्शल हे सर्वोच्‍च लष्करी पद देण्यात आले.
१९५३ कृष्णवर्णीयांना हॉटेलमधे सेवा नाकारण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली.
१९४९ जॉर्ज ऑर्वेलची ’१९८४’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली
१९४८ ’एअर इंडिया’ची मुंबई - लंडन विमानसेवा सुरू झाली.
१९४१ दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी सीरीया व लेबानॉन पादाक्रांत केले.
१९१८ नोव्हा अ‍ॅक्‍विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध
१९१५ लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ’गीतारहस्य’ या ग्रंथाचे गायकवाडवाड्यात प्रकाशन झाले.
१९१२ कार्ल लेम्ले यांनी ’यूनिव्हर्सल पिक्चर्स’ या कंपनीची स्थापना केली.
१७१३ मुघलांनी १६८९ मधे जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधी यांनी सिद्दीकडुन राजकारणाने जिंकुन घेतला.
१७०७ औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि आझमशाह या त्याच्या दोन मुलांमधे दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. यात मुअज्जमने आझमशाहला ठार करुन दिल्लीची गादी बळकावली.
१६७० पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत जिंकून घेतला.

जन्म :
१९५७ डिंपल कपाडिया – अभिनेत्री
१९३२ रे इलिंगवर्थ – इंग्लिश क्रिकेटपटू
१९२१ सुहार्तो – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २७ जानेवारी २००८)
१९१७ गजाननराव वाटवे – गायक व संगीतकार (मृत्यू: २ एप्रिल २००९)
१९१० दिनकर केशव तथा ’दि. के.’ बेडेकर – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक (मृत्यू: २ मे १९७३)

मृत्यू :
१९९५ राम नगरकर – विनोदी नट, 'रामनगरी‘ या त्यांच्या एकपात्री प्रयोगाचे ७०० हुन अधिक प्रयोग झाले. (जन्म: ? ? ????)
१८४५ अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १५ मार्च १७६७)
१८०९ थॉमस पेन – अमेरिकन विचारवंत, राजकारणी आणि क्रांतिकारक (जन्म: २९ जानेवारी १७३७)
१७९५ लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ मार्च १७८५)
  ६३२ मुहम्मद पैगंबर – इस्लाम धर्माचे संस्थापक (जन्म: ?? ५७०)

Post a Comment

0 Comments