loading...

चालू घडामोडी २९ जून २०१८

loading...
डॉलरच्या तुलनेत रुपयाची सर्वात नीचांकी पातळी :
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. भारतीय चलन रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. रुपया 28 पैशांच्या घसरणीसह डॉलरच्या तुलनेत 68.89 रुपयांवर खुला झाला. त्यानंतर रुपयाने 69.09 ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली.
 
त्यानंतर रुपयामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली. आता रुपया 68.82 वर स्थिर आहे. 24 नोव्हेंबर 2016 रोजी रुपया 68.86 वर पोहोचला होता. या नीचांकी पातळीचा विक्रम रुपयाने मोडीत काढला.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे तसेच महागाई आणि वित्तीय तूट यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली. रुपया 68.61 वर बंद झाला होता.

बँका आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी वाढत आहे. तेलांच्या वाढत्या किंमतींमुळे खासकरुन तेल कंपन्यांकडून डॉलरची जास्त मागणी आहे. त्यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांना इराणकडून तेल खरेदी नोव्हेंबरपर्यंत संपवायला सांगितली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्या किंमती वाढत आहेत.

तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाची घसरण या दोघांचा भारतीय अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसत आहे. रुपयाची घसरण रोखण्याचे आरबीआय समोरील आव्हान दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. यामध्ये वित्तीय तूटही वाढत चालली आहे.
‘उद्यम संगम-2018’ :
27 जून 2018 रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद  यांच्या हस्ते ‘उद्यम संगम-2018’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाने संयुक्त राष्ट्रसंघ सूक्ष्म, लघु व मध्यम आकाराचे उद्योग (UN MSME) दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी 'संपर्क पोर्टल' देखील सुरुवात केली गेली, जे कौशल्य विकसित करण्यामध्ये आणि प्रशिक्षित युवकांना विविध रोजगाराच्या संधींबद्दल जाणून घेण्यास उपयुक्त आहे.
रत्नागिरी तेल शुद्धीकरण प्रकल्पात सौदीच्या ADNOC कंपनीची भागीदारी :
अबू धाबी राष्ट्रीय तेल कंपनी (ADNOC) याने भारतातल्या रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे जगातला सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना उभा करण्यासाठी USD 44 अब्जच्या प्रकल्पातील भागभांडवल खरेदी करण्यासाठी करार केला आहे.

यामुळे सौदी अरेबियाची ARAMCO आणि संयुक्त अरब अमिरातची ADNOC या कंपन्यांचे रत्नागिरी प्रकल्पातील हरितक्षेत्रामध्ये एकत्रितपणे 50% भागभांडवल असणार. 
देशभरात 3,000 वन धन केंद्रे स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव :
भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाने देशभरात आदिवासी जिल्ह्यांमध्ये 30,000 बचत गटांचा समावेश असलेल्या 3000 ‘वन धन विकास’ केंद्रांची स्थापना करण्याचा प्रस्‍ताव मांडला आहे.

14 एप्रिल 2018 रोजी बिजापूर (छत्तिसगड) मध्ये ‘वन धन विकास’ केंद्राचा शुभारंभ करण्यात आला होता. देशभरात अशी सुमारे 3000 केंद्रे दोन वर्षांत स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. सुरूवातीस हा उपक्रम 50% पेक्षा जास्त आदिवासींना अंतर्भूत करणार्‍या 39 जिल्ह्यांमध्ये राबवविला जाणार आहे.

योजनेनुसार, ट्रायफेड (TRIFED) आदिवासी भागात MFPच्या नेतृत्वाखाली बहुउद्देशीय वन धन विकास केंद्रांची स्थापना करण्यास मदत करणार. वन धन विकास केंद्र म्हणजे प्रत्येकी 30 आदिवासी MFP लोक असलेल्या 10 बचतगटांचा एक समूह आहे. या उपक्रमाद्वारे लाकूड वगळता अन्य वनोत्पादनांच्या मूल्य शृंखलेत आदिवासींचा वाटा वर्तमानातल्या 20% वरून 60% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे
जय हिंद 1-एस: जगातील सर्वांत लहान उपग्रह :
चन्नईतील चार विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत स्वस्त आणि सर्वात हलका उपग्रह तयार केला आहे जो फक्त 33.39 ग्रॅम वजनाचा आहे.
 उपग्रहाचे नाव 'जय हिंद 1-एस' आहे आणि ऑगस्ट 2018 मध्ये प्रक्षेपित होईल. हा उपग्रह तापमान, UV घनता आणि वाफ दाब सारख्या डेटाचे विश्लेषण करते.
यामुळे बाह्य जागेत संशोधनास आणि पर्यावरणास अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. 

शहरी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापन मंडळ असावे RBI :
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या ठेवी असलेल्या सर्व शहरी सहकारी बँकांमध्ये (UCB) व्यावसायिक व्यवस्थापनास प्रोत्साहन देण्यासाठी एक वर्षाच्या आत व्यवस्थापन मंडळ (BoM) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

या प्रस्तावानुसार, बँकांचे व्यवस्थापन मंडळ (BoM) हे संचालक मंडळाच्या (BoD) वेगळे असेल. बँकांचे व्यवस्थापन मंडळ त्या बँकांच्या संचालक मंडळाद्वारे स्थापन करण्यात येईल. प्रथमताः 100 कोटी रुपयांखालील ठेवीसह असलेल्या UCBच्या व्यवस्थापन मंडळ किमान तीन सदस्य तर त्यावरील बँकांमध्ये किमान पाच सदस्य तरी असावेत. व्यवस्थापन मंडळामधील सदस्यांची कमाल संख्या 12 पेक्षा जास्त नसावी.

2010 साली वाय. एच. मालेगाम यांच्या अध्यक्षतेखाली गठीत तज्ज्ञ समितीने शहरी सहकारी बँकांमध्ये (UCB) व्यवस्थापन मंडळ (BoM) असावे याबाबत शिफारस केली होती, ज्याला 2015 साली आर. गांधी समितीने देखील समर्थन दिले होते.

क्रेडिट रेटिंग मॉडेल: 
भारत सरकार बिग डेटा प्रणाली तपासत आहे भारत सरकार ‘क्रेडिट रेटिंग मॉडेल’ नामक एक नवीन बिग डेटा प्रणाली तपासत आहे, जी त्या महितीच्या विश्लेषणाचा वापर करून पत (क्रेडिट) संदर्भात जोखीम आणि फसवणुकीच्या संभाव्यतेचे मूल्यांकन करण्यामध्ये बँकांना मदत करणार.

हा प्रकल्प RBI, बेंगळुरूमधील प्रोसेवेयर सिस्टीम आणि दोन सहकारी बँका यांच्या भागीदारीने चालवला जात आहे. वाढत्या अकार्यक्षम मालमत्तेसंबंधी (NPA) अडचणी सोडविण्यासाठी ही प्रणाली कर्जदाता, विशेषतः ग्रामीण आणि सहकारी बँकांना या प्रणालीची मदत होणे अपेक्षित आहे.
'इपीएफओ'व्दारे एक महत्वाचा निर्णय जाहीर :
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (इपीएफओ) एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. इपीएफओचा सदस्य एक महिन्यापर्यंत बेरोजगार राहिल्यास त्याला 75 टक्केपर्यंतची रक्कम काढण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. पैसे काढल्यानंतरही तो आपले खाते सुरू ठेऊ शकतो. श्रम मंत्री संतोष गंगवार यांनी 27 जून इपीएफओच्या विश्वस्तांच्या बैठकीनंतर ही माहिती दिली.

या योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे इपीएफओच्या मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष आणि श्रम मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी सांगितले. याअंतर्गत एक महिन्यापर्यंत बेरोजगार राहिल्यास इपीएफओचा कोणताही सदस्य 75 टक्केपर्यंतची रक्कम अग्रिम म्हणून काढू शकतो आणि आपले खातेही सुरू ठेऊ शकतो.

इपीएफओ योजना 1952 च्या तरतुदीनुसार दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यास खातेधारक आपली उर्वरित 25 टक्के रक्कम काढून खाते बंद करू शकतो. सध्याच्या स्थितीत कोणताही खातेधारक दोन महिन्यांपर्यंत बेरोजगार राहिल्यानंतरच ही रक्कम काढू शकतो.

दिनविशेष

काही महत्वाच्या घटना:
२००१ ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर
२००१ पण्डित हृदयनाथ मंगेशकर यांना ’नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार’ जाहीर
१९९५ दक्षिण कोरियातील सेऊल येथे ’सँपूंग डिपार्टमेंटल स्टोअर’ची इमारत कोसळून ५०२ जण ठार तर ९३७ जखमी झाले.
१९७६ सेशेल्सला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१८७१ ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला. यापूर्वी कामगार संघटना स्थापन करणार्‍यांना व अशा संघटनांच्या सदस्यांना ब्रिटनमधून तडीपार करुन ऑस्ट्रेलियात पाठवले जात असे.

जन्म :
१९४५ चंद्रिका कुमारतुंगा – श्रीलंकेच्या ५ व्या राष्ट्राध्यक्षा
१९३४ कमलाकर सारंग – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक व लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर १९९८)
१९०८ प्रतापसिंग गायकवाड – बडोद्याचे महाराज (मृत्यू: १९ जुलै १९६८)
१८९३ प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (मृत्यू: २८ जून १९७२)
१८९१ डॉ. प. ल. वैद्य – प्राच्यविद्यासंशोधक (मृत्यू: २५ फेब्रुवारी १९७८)
१८७१ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक (मृत्यू: १ जून १९३४)

मृत्यू :
२०१० प्रा. शिवाजीराव भोसले – विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जुलै १९२७)
२००३ कॅथरिन हेपबर्न – हॉलिवूड अभिनेत्री (जन्म: १२ मे १९०७)
२००० कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (जन्म: १८ फेब्रुवारी १९११)
१९९३ विष्णुपंत जोग – ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक अभिनेते (जन्म: ? ? ????)
१९९२ शिवाजीराव भावे – सर्वोदयी कार्यकर्ते (जन्म: ? ? ????)
१९८१ दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी – साहित्यिक (जन्म: २७ नोव्हेंबर १९१५)
१९६६ दामोदर धर्मानंद कोसंबी – प्राच्यविद्या पंडित, गणितज्ञ, विचारवंत व इतिहासकार (जन्म: ३१ जुलै १९०७)
१८९५ थॉमस हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक आणि डार्विनच्या उत्क्रांतिवादाचा खरा समर्थक (जन्म: ४ मे १८२५)

चालू घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटर वर आणि जी प्लस फाॅलो करा...

Post a Comment

0 Comments