loading...

चालू घडामोडी 16 जून 2018

loading...
✓Fifa World Cup 2018: फुटबॉल वर्ल्डकपला दिमाखात सुरुवात :
वर्ल्डकप २०१८चा शुभारंभ झाला. यंदाच्या वर्ल्डकपसाठी बनवण्यात आलेले 'लिव्ह इट अप' हे गाणे सगळ्यात सुरुवातीला वाजले आणि नंतर अर्धा तास रंगारंग सोहळ्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

ब्रिटनचा रॉकस्टार रॉबी विल्यम्स तसेच रशियन गायिका एडा गरिफुलिना यांच्या सादरीकरणानंतर मॉडेल व्हिक्टोरिया लोपरेया ही फुटबॉल घेऊन मैदानात उतरली. त्यानंतर ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डोने फुटबॉलला किक मारली आणि वर्ल्डकपच्या महाकुंभाला सुरुवात झाली.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फांटिनो यांनी वर्ल्डकपचे उद्घाटन झाल्याची अधिकृत घोषणा केली.

FIFA विश्वचषक 2018 :
FIFA विश्वचषक 2018 रशियात होत आहे. 14 जून ते 15 जुलै 2018 या काळात चालू असलेली ही वर्षातील सर्वात मोठी फुटबॉल स्पर्धा आहे. यावर्षीचा FIFA विश्वचषक मालिकेमधील 21 वे संस्करण आहे. ही स्पर्धा FIFA च्या सदस्य संघांच्या राष्ट्रीय पुरुष संघांमध्ये खेळली जात आहे.

ठळक वैशिष्ट्ये :
रशियात 11 शहरातील 12 ठिकाणी एकूण 64 सामने खेळले जातील. स्पर्धेत 32 राष्ट्रीय संघ खेळणार आहेत. त्यापैकी 20 संघ 2014 सालापासून दरवर्षी खेळताना दिसून आलेले आहेत. आइसलँड आणि पनामा या देशांमधून दोन संघ या स्पर्धेत प्रथमच सामने खेळतील.

ब्राझीलमध्ये झालेल्या 2014 FIFA विश्वचषक स्पर्धेच्या खर्चाला मागे टाकत यावर्षीची स्पर्धा $ 11.8-14 अब्ज एवढ्या खर्चासह इतिहासातली सर्वात महाग फुटबॉल स्पर्धा ठरण्याची अपेक्षा आहे.

 FIFA बाबत :
आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (International Federation of Football Association -FIFA) हा एक खाजगी महासंघ आहे, जो स्वतःस असोसिएशन फुटबॉल, फुटसल आणि बीच सॉकर या क्रीडाप्रकारांची एक आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था म्हणून संबोधतो. FIFA फुटबॉलच्या प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या संघटनासाठी, विशेषत: विश्वचषक (1930 सालापासून) आणि महिला विश्वचषक (1991 सालापासून) यांसाठी जबाबदार आहे. 1904 साली FIFA याची स्थापना करण्यात आली. याचे झुरिच (स्वित्झर्लंड) येथे मुख्यालय आहे आणि त्याच्या सदस्यत्वामध्ये आता 211 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे.

युरोपमध्ये जर्मनीत 2006 साली पहिल्यांदा विश्वचषक आयोजित केला गेला होता. तेव्हापासून युरोपमध्ये अकरा वेळ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

✓मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी ICJ कडे कतारने UAE विरुद्ध खटला दाखल केला :
कतार सरकारने संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्ध मानवी हक्कांच्या उल्लंघन झाल्या प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे (ICJ) खटला दाखल केला आहे.

वर्षभरापूर्वी कतार "दहशतवाद"ला समर्थन देत असल्याचा आरोप केला गेला होता. हा आरोप करत संयुक्त अरब अमिरात (UAE), सौदी अरेबिया, बहरीन आणि इजिप्त यांनी आपले राजकीय व व्यापारी संबंध निलंबित केले होते. त्यावेळी प्रभावित झालेल्या कतारने न्याय मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली.

आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ही 1945 साली स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची प्रधान न्यायिक संस्था आहे आणि हेग (नेदरलँड) शहरात याचे खंडपीठ आहे. ICJ मध्ये 15 न्यायाधीश असतात आणि या पदाचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो. ICJ निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा (UNGA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या दोघांकडूनही बहुमत असणे आवश्यक असते. ICJ च्या 15 सदस्यीय खंडपीठाचा एक तृतियांश भाग 9 वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक तीन वर्षात निवडण्यात येतो.

✓अरविंद सक्सेना: UPSC चे प्रभारी अध्यक्ष :
अरविंद सक्सेना यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) प्रभारी अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे.

सक्सेना 20 जून 2018 रोजी वर्तमान अध्यक्ष विनय मित्तल यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारतील.

भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. आयोगामध्ये एक चेअरमन आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातील कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

✓PMAY (शहरी) अंतर्गत व्याज अनुदानासाठी पात्र असलेल्या घरात वापरायच्या क्षेत्राफळाचे नवे निकष :
गृहबांधणी व शहरी कल्याण मंत्रालयाकडून प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मध्यम-आय गटासाठी (MIG) क्रेडिट लिंक्ड सब्सिडी योजना (CLSS) अंतर्गत व्याज अनुदानासाठी पात्र असलेल्या घरांच्या वापरात येणार्‍या क्षेत्रफळामधील (carpet area) नवे सुधारित निकष मंजूर करण्यात आले आहे.

नव्या निकषानुसार, MIG-I गटासाठी हे क्षेत्रफळ ‘120 चौरस मीटर पर्यंत’ पासून वाढवत ‘160 चौरस मीटर’ पर्यंत आणि MIG-II गटासाठी हे क्षेत्रफळ ‘150 चौरस मीटर पर्यंत’ पासून वाढवत ‘200 चौरस मीटर’ पर्यंत करण्यात आले आहे.

✓ शासनांच्या स्वच्छ आदर्श स्थळांच्या यादीत तिसऱ्या टप्प्यात 10 स्थळे जोडण्यात आली:
देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र शासनांकडून स्वच्छ आदर्श स्थळांचे निर्माण केले जात आहे. त्यासंदर्भात चाललेल्या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात या स्थळांच्या यादीत 10 स्थळे जोडण्यात आली आहेत. SIP चा तिसरा टप्पा 12 जून 2018 रोजी माना गावात सुरु करण्यात आला

जोडण्यात आलेल्या स्वच्छ आदर्श स्थळांची (Swachh Iconic Places -SIP) नावे पुढीलप्रमाणे आहेत –

राघवेंद्रस्वामी मंदिर (कुर्नूल, आंध्रप्रदेश); हजरद्वारी पॅलेस (मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल); ब्रह्मा सरोवर मंदिर (कुरुक्षेत्र, हरियाणा); विदूरकुट्टी (बिजनोर, उत्तर प्रदेश); माना गाव (चमोली, उत्तराखंड); पँगोंग तलाव (लेह-लदाख, जम्मू-काश्मीर); नागवासुकी मंदिर (अलाहाबाद, उत्तर प्रदेश); इमाकिथल/मार्केट (इम्फाळ, मणिपूर); सबरीमाला मंदिर (केरळ); आणि कणवाश्रम (उत्तराखंड).

2016 साली सुरू करण्यात आलेला स्वच्छ आदर्श स्थळांचा प्रमुख प्रकल्प राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या पाठिंब्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाच्या समन्वयाने चालवला जात आहे. SIP पुढाकारामधून पर्यटकांच्या अनुकूल व्यवस्था सुधारून त्यांना आर्द्श ठिकाणे बनविण्यासाठी कार्य केले जात आहे. या प्रकल्पाच्या प्रथम व द्वितीय टप्प्यात एकूण 20 स्थळांचा समावेश आहे. SIP हा एक सहयोगी प्रकल्प आहे ज्यामध्ये तीन केंद्रीय मंत्रालये एकत्र काम करीत आहेत - गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालय, संस्कृती मंत्रालय आणि पर्यटन मंत्रालय.

✓ईशान्य परिषदेच्या (NEC) पुनर्स्थापनेला मंजुरी :
सर्व आठ ईशान्य राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह एक वैधानिक संस्था असलेल्या ईशान्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांना नियुक्त करण्याच्या ईशान्य विकास विभागाच्या मंत्रालयाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालायच्या राज्यमंत्र्यांना (स्वतंत्र प्रभार) या परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करायला देखील मंजुरी देण्यात आली आहे. NEC च्या पुनर्स्थापानेमुळे ही परिषद आता ईशान्य क्षेत्रासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करेल.

✓ भारतातून ‘हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासाठीची प्रवेगक योजना 2018’ जाहीर :
भारतामधून हत्तीरोग आणि त्याचा प्रसार यांच्या उच्चाटनासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘हत्तीरोगाचे उच्चाटन करण्यासाठीची प्रवेगक योजना 2018’ जाहीर केली आहे.

हत्तीरोगाच्या (Lymphatic Filariasis) उच्चाटनामध्ये भारताने लक्षणीय प्रगती केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे आणि विकास भागीदारांच्या एकत्रित प्रयत्नातून हत्तीरोगाचे सर्वाधिक प्राबल्य असणाऱ्या 256 जिल्ह्यांपैकी 100 जिल्ह्यांनी रोगमुक्तीचे उद्दीष्ट साध्य केलेले आहे.

✓ 50 समुहांसह ‘सौर चरखा अभियाना’ला सुरूवात केली जाणार :
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) याचे ‘सौर चरखा अभियान’ राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 27 जून 2018 रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू केले जाणार आहे.

या अभियानामध्ये 50 समूह (clusters) समाविष्ट केले जातील आणि प्रत्येक समूह 400 ते 2000 कारागिरांना रोजगार प्रदान करणार. याअंतर्गत कारागिरांना 550 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाईल.

✓NITI आयोग समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक प्रसिद्ध करणार :
जलस्त्रोतांच्या प्रभावी व्यवस्थापन क्षेत्रातली कामगिरी सुधारण्यासाठी आणि त्याचे मूल्यमापन करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून NITI आयोग ‘समग्र जल व्यवस्थापन निर्देशांक’ (Composite Water Management Index) प्रसिद्ध करणार आहे.

यामधून पाण्याचा सुयोग्य वापर आणि त्याचा पुनर्वापर याबाबत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रोत्साहन मिळण्यासाठीचा उद्देश ठेवण्यात आला आहे. जल संसाधनाच्या उत्तम व्यवस्थापनासाठी सुयोग्य उपाय आखण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्देशांक, राज्यांना आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि खात्यांना उपयुक्त माहिती पुरवेल.

✓पंतप्रधानांच्या हस्ते अद्ययावत भिलई पोलाद प्रकल्पाचे राष्ट्रार्पण :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 14 जून 2018 रोजी छत्तीसगडमधील विस्तारित आणि अद्ययावत भिलई पोलाद प्रकल्पाचे राष्ट्रार्पण करण्यात आले आहे.

भिलई हे भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादित (SAIL) याचा सर्वात मोठा प्रकल्प आणि प्रमुख उत्पादक आहे तसेच भारतीय रेल्वेसाठी रेल्वेरूळ पुरवठादार आहे. आधुनिकीकरणानंतर भिलई प्रकल्पाची निर्मिती क्षमता 0.8 MTPA पासून 2 MTPA पर्यंत पोहोचली आहे.

✓जम्मू-काश्मीर पोलीसांसाठी महिलांच्या दोन तुकड्यांना मंजुरी :
केंद्र शासनाने जम्मू आणि काश्मीर पोलीस दलात महिलांच्या दोन तुकड्यांची स्थापना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

गृह मंत्रालयाच्या या निर्णयानुसार यातील एक तुकडी जम्मू विभागात तर दुसरी काश्मीरमध्ये कार्य करणार.

काही महत्वाच्या घटना:
१९९० मुंबई व उपनगरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली. गेल्या १०४ वर्षातील जूनमधे एका दिवसात पडलेल्या पावसाचा (६००.४२ मि.मि.) उच्‍चांक गाठला गेला.
१९६३ व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने ‘वोस्तोक-६‘ या यानातून अंतराळप्रवास केला. अंतराळप्रवास करणारी ही पहिली महिला अंतराळयात्री बनली.
१९४७ नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने म. स. तथा ‘बाबुराव‘ पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
१९१४ सहा वर्षाच्या तुरुंगवासातून लोकमान्य टिळक यांची सुटका
१९११ एन्डिकोट, न्यूयॉर्क येथे द कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग कंपनीची स्थापना झाली. याच कंपनीचे पुढे आय. बी. एम. या बलाढ्य कंपनीत रुपांतर झाले.
१९०३ फोर्ड मोटर कंपनीची स्थापना

जन्म :
१९९४ आर्या आंबेकर – गायिका
१९६८ अरविंद केजरीवाल – ’आम आदमी पार्टी’चे संस्थापक, समाजसेवक व सनदी अधिकारी
१९३६ अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (मृत्यू: १३ फेब्रुवारी २०१२)
१९२० हेमंतकुमार – गायक, संगीतकार आणि निर्माता (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८९)
१७२३ अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (मृत्यू: १७ जुलै १७९०)

मृत्यू :
१९९५ शुद्धमती तथा ’माई’ मंगेशकर – मंगेशकरांच्या मातोश्री
१९७७ श्रीपाद गोविंद नेवरेकर – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट (जन्म: ३ जुलै १९१२)
१९४४ आचार्य प्रफुल्लचंद्र रे – भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते, त्यांनी ’बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी काढली. १८९६ मधे त्यांनी पारा आणि नायट्रोजन यांच्या संयोग करुन मर्क्युरस नायट्रेटची निर्मिती केली. त्यांना ’मास्टर ऑफ नायट्रेटस’ म्हणत असत. (जन्म: २ ऑगस्ट १८६१)
१९२५ देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले. (जन्म: ५ नोव्हेंबर १८७०)

Post a Comment

0 Comments