loading...

चालू घडामोडी 21 जून 2018

loading...

आंतरराष्ट्रीय योगा दिवस २१ जून (Click)


विशाखापट्टणममध्ये ‘ICGS राणी रश्मोनी' जहाजाची नियुक्ती :
‘ICGS राणी रश्मोनी’ हे जहाज भारतीय तटरक्षक दलामध्ये विशाखापट्टणम येथे नियुक्त करण्यात आले आहे. हे जहाज नवदीप सफाया यांच्या आदेशाखाली आहे.

‘ICGS राणी रश्मोनी’ हे 51 मीटर लांबीचे जहाज आहे. हे जहाज पाण्यावर 34 नॉट्स या गती धावू शकते. याची चार अधिकारी आणि 34 व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता आहे. यामध्ये अत्याधुनिक ग्लोबल मेरीटाइम डिस्ट्रेस अँड सेफ्टी सिस्टम (GMDSS) बसविण्यात आलेली आहे.

वेगवान गस्त जहाज (Fast Patrol Vessel -FPV) प्रकल्पामधील पाचपैकी हे शेवटचे जहाज आहे. यापूर्वी ‘ICGS राणी अब्बाक्का’, ‘ICGS राणी अवंती बाई’, ‘ICGS राणी दुर्गावती’ आणि ‘ICGS राणी गैदिनलिऊ’ ही चार जहाजे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर विविध ठिकाणी सेवेमध्ये आहेत.
चीनकडे भारतीय औषधांची निर्यात यासंदर्भात एक अहवाल :
बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने भारत सरकारच्या वाणिज्य विभागाने चीनमधील बाजारातली संधि बघण्यासाठी ‘एनहानसिंग इंडियन एक्सपोर्ट्स ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स टू चायना’ या विषयावर या विषयावर एक अध्ययन चालू केला आहे. हा अभ्यास IMS हेल्थ चमुकडून केला आहे.

हा अभ्यास मार्केट अॅक्सेस इनिशिएटिव्ह स्कीम (MAI) अंतर्गत चालवला जात आहे, ज्यामधून चीनी बाजारपेठांविषयी समजून घेता येईल आणि भारतीय उद्योगांना भारतीय जेनेरिक औषधे बाजारपेठांमध्ये आणण्यासाठी योग्य आणि केंद्रित धोरणाची उभारणी करण्यासाठी मदत होईल.

चीनमधील वैद्यकीय क्षेत्र वेगाने वाढत आहे. ही वृद्धी 2011 सालच्या $357 अब्जवरुन वाढून 2020 साली ती $1 लक्ष कोटींवर पोहचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जगातला सर्वात शक्तिशाली महासंगणक अमेरिकेत :
अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी जगातला सर्वात शक्तिशाली आणि स्मार्ट वैज्ञानिक महासंगणक(supercomputer) तयार केला आहे.

अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या ‘ओक रिज नॅशनल लेबोरेटरी’च्या या महासंगणकाला 'समिट' हे नाव देण्यात आले आहे. हा यापूर्वीच्या ‘टाइटन’ च्या क्षमतेच्या आठ पट अधिक शक्तिशाली असेल. हा महासंगणक प्रति सेकंदात 200,000 लक्ष कोटी गणिते सोडवू शकते. ही प्रणाली ऊर्जा, प्रगत साहित्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन करण्यासाठी अभूतपूर्व संगणन शक्ती प्रदान करेल.

अमेरिका अंतराळ सैन्यदल तयार करणार आहे :
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला "US स्पेस फोर्स" म्हणजेच ‘अंतराळ सैन्यदल’ तयार करण्याचे आदेश दिले आहे. ही अमेरिकेच्या सैन्यदलाची सहावी शाखा म्हणून काम करणार.

अमेरिका (संयुक्त राज्य अमेरिका/USA) हा अमेरिका खंडातला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर (USD) हे चलन आहे.

पूराविषयी पूर्वानुमानासाठी भारत गूगल सह कार्य करणार :
भारतात पूर परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने (CWC) गूगल या तंत्रज्ञान कंपनीबरोबर एक करार केला आहे.

केंद्रीय जल आयोग (CWC) जलस्त्रोत प्रभावीपणे हाताळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि भू-स्थानिक नकाशा क्षेत्रात गूगलने तयार केलेल्या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करणार. संबंधित माहितीचा व्यापक प्रसार करण्यासाठी गूगलद्वारे विकसित प्रसार व्यासपीठ वापरले जाणार.

केंद्र शासन BPO जाहिरात योजना विस्तारित करणार :
केंद्र शासनाने ‘BPO जाहिरात योजना’ विस्तारित करण्याची योजना आखत आहे, ज्यामधून एक लाख जागा निर्माण होतील.

‘भारत BPO जाहिरात योजना’ आणि ‘ईशान्य BPO जाहिरात योजना’ या योजनांच्या अंतर्गत केंद्र शासन आपली बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (BPO) क्षमता सध्याच्या 48,000 जागांवरून 1 लक्ष जागा पर्यंत वाढविणार आहे.

सध्या भारतात 27 राज्यांतील सर्व 91 शहरांमध्ये BPO सुरु आहेत आणि लवकरच गया आणि गाझीपूरसारख्या छोट्या शहरांमध्ये देखील BPO लवकरच सुरू होणार आहेत. लहान गावांमध्ये चालवलेल्या BPO साठी 31,732 जागांची निर्मिती झाली आहे.

भोपाळमध्ये देशातील पाचव्या राष्ट्रीय डेटा सेंटरची स्थापना केली जाणार :
भोपाळमध्ये देशातले पाचवे आणि सर्वात मोठे ‘राष्ट्रीय डेटा सेंटर’ उभारण्याची योजना भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केली आहे.

हे राष्ट्रीय डेटा सेंटर पाच लाख व्हर्च्युअल सर्व्हरांना व्यवस्थापित करू शकणार. याच्या उभारणीसाठी दोन वर्ष लागतील आणि ते राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC) कडून स्थापित केले जाईल. सध्या भारतात भुवनेश्वर, दिल्ली, हैद्राबाद आणि पुणे येथे राष्ट्रीय डेटा सेंटर कार्यरत आहेत.

काही महत्वाच्या घटना:
२००६ नवीनच शोध लागलेल्या प्लूटोच्या उपग्रहांचे ’निक्स’ व ’हायड्रा’ असे नामकरण करण्यात आले.
१९९९ विश्वकरंडक स्पर्धेत १००० धावा पूर्ण करणारा मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) हा चौथा खेळाडू ठरला.
१९९८ फ्रॅंकफर्ट बुद्धीबळ महोत्सवात विश्वनाथन आनंदने ’फ्रिट्झ-५’ या संगणकाचा सहज पराभव केला.
१९९५ पर्यावरणक्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल पर्यावरणतज्ञ रश्मी मयूर यांना अमेरिकेतील ’द युनिटी इन योग इंटरनॅशनल’ या संस्थेने विशेष सन्मान जाहीर केला.
१९९२ विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजविज्ञानाच्या क्षेत्रात विशेष कार्य करणार्‍या डॉ. रघुनाथ माशेलकर यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे जवाहरलाल नेहरु राष्ट्रीय पारितोषिक जाहीर
१९९१ भारताचे ९ वे पंतप्रधान म्हणून पी. व्ही. नरसिंह राव यांनी सूत्रे हाती घेतली.
१९६१ अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी समुद्राच्या खार्‍या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करणारे यंत्र विकसित केले.
१९४९ राजस्थान उच्‍च न्यायालयाची स्थापना
१९४८ पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्याकडे सूत्रे
१८९८ अमेरिकेने स्पेनकडून ’ग्वाम’ हा प्रांत ताब्यात घेतला.
१७८८ न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे ९ वे राज्य बनले.

जन्म :
१९५३ बेनझीर भूट्टो – पाकिस्तानच्या पंतप्रधान (मृत्यू: २७ डिसेंबर २००७)
१९५२ जेरमी कोनी – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९२३ सदानंद रेगे – मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक (मृत्यू: २१ सप्टेंबर १९८२)
१९१६ सुरेन्द्रनाथ कोहली – भारताचे ९ वे नौदल प्रमुख (मृत्यू: २१ जानेवारी १९९८)
१९०५ जेआँ-पॉल सार्त्र – फ्रेन्च लेखक, कवी, तत्त्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: १५ एप्रिल १९८०)

मृत्यू :
२०१२ भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (जन्म: १२ जून १९१७)
२००३ लिऑन युरिस – अमेरिकन कादंबरीकार (जन्म: ३ ऑगस्ट १९२४)
१९८४ मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचे पत्‍नी व मुलासह कोल्हापुरजवळ मोटार अपघातात निधन. ते तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादकही होते. (जन्म: ४ आक्टोबर १९३५)
१९७० सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ जून १९०१)
१९४० डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष (जन्म: १ एप्रिल १८८९)
१९२८ द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार. त्यांच्या ’वीरधवल’, ’रायक्लब’ अथवा सोनेरी टोळी’ या कादंबर्‍यांनी वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. (जन्म: ३ एप्रिल १८८२)

Post a Comment

0 Comments