loading...

चालू घडामोडी 11 जून 2018

loading...
✓IIFA जीवनगौरव पुरस्कार 2018 जाहीर :
• जेष्ठ अनुभवी अभिनेता अनुपम खेर यांना प्रतिष्ठित ‘IIFA जीवनगौरव पुरस्कार 2018’ जाहीर झाला आहे.

• 24 जून 2018 रोजी बँकॉकमध्ये (थायलंड) आयोजित 19 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) पुरस्कार समारंभात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

• 63 वर्षीय अनुपम खेर यांना आतापर्यंत दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि आठ फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते वर्तमानात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ आणि भारतामधील राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष आहेत.  तीन दशकांहून अधिकच्या त्यांच्या कारकि‍र्दीत त्यांनी देशात आणि परदेशात 500 हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.

✓सर्वात मोठय़ा अग्निबाणाच्या निर्मितीची योजना:
फॉल्कन हेवीच्या यशाने उत्साहित स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍलन मस्क अंतराळ मोहीम क्षेत्राचा कायापालट घडवून आणू शकणाऱया योजनेवर आता काम करत आहेत. मस्क लवकरच नासाच्या महाकाय सॅटर्न 5 हून देखील मोठय़ा अग्निबाणाला अंतराळात पाठविण्याच्या तयारीत आहेत. बीएफआर नावाच्या या अग्निबाणाची पहिली उड्डाण चाचणी 2019 मध्ये होणार असून अंतराळ कक्षेत पाठविण्याची चाचणी 2020 मध्ये पार पडेल. मंगळासाठीचे पहिले कार्गो उड्डाण 2022 मध्ये होणार आहे. मंगळ तसेच चंद्रावर वस्ती निर्माण करण्यात याची मोठी भूमिका असेल.

60 मिनिटांत पृथ्वीवर कोठेही या अग्निबाणाचा वापर पृथ्वीवर एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी पोहोचण्यास देखील करता येईल. पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱयात हा अग्निबाण एका तासात पोहोचवू शकेल, असे मस्क यांचे मानणे आहे.

बीहा अग्निबाण स्पेसएक्सच्या फॉल्कन 9 आणि फॉल्कन हेवीसोबत ड्रगन कॅप्सूलची जागा घेईल. आतापर्यंतच्या या सर्वात मोठय़ा अग्निबाणातून कक्षेत उपग्रहांना स्थापित केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात याद्वारे संशोधक आणि उपकरणे पाठविणे सुलभ होऊ शकेल. चंद्रासाठीच्या मानवी मोहिमेला मूर्त रुप देण्यास याची मोठी मदत होणार असून या अग्निबाणावर 40 केबिन्स असणार आहेत. प्रत्येक केबिनमध्ये 5-6 जण सहजपणे सामावू शकतील. चंद्र आणि मंगळावर स्थानक निर्माण करण्यात याची महत्त्वाची भूमिका ठरण्याचा कयास वर्तविला जातोय.

महत्त्वाच्या मोहिमा :
2022 मध्ये बीएफआरला पहिल्यांदा मंगळावर पाठविले जाईल. ते केवळ कार्गो फ्लाइट असणार असून 2024 मध्ये मानवी मोहिमेला मूर्त रुप दिले जाणार आहे. या अग्निबाणाच्या काही भागांचा पुनर्वापर केला जाऊ शकेल. हा अग्निबाण पृथ्वीवरून थेट मंगळापर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल.

मंगळासाठीची मानवी मोहीम :
खासगी अंतराळ संस्था स्पेसएक्सचा फॉल्कन हेवी सध्या जगातील सर्वात मोठा आणि शक्तिशाली अग्निबाण आहे. याचे उड्डाण बळ बोइंग 747 च्या 18 विमानांच्या एकूण सामर्थ्याइतके आहे. भविष्यात या अग्निबाणाचा वापर चंद आणि मंगळावर मानवाला पाठविण्यासाठी केला जाऊ शकतो. आतापर्यंतचा सर्वात मोठा अग्निबाण सॅटर्न 5 राहिला असून ज्याच्या माध्यमातून अपोलो मोहिमेच्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्यात आले होते. याच अग्निबाणातून 1973 मध्ये स्कायलॅब अंतराळ केंद्र देखील पाठविण्यात आले. काही अन्य अग्निबाण प्रस्तावित असून ते आकार तसेच सामर्थ्यात फॉल्कन हेवीशी स्पर्धा करू शकतात.

महत्त्वाकांक्षी प्रकल्प :
फॉल्कन हेवी पृथ्वीच्या कक्षेतून मंगळाच्या कक्षेपर्यंत परिक्रमा करणार आहे. स्वतःच्या कक्षेत पोहोचल्यावर फॉल्कन हेवीचा वेग 11 किलोमीटर प्रतिसेकंद असेल. या अग्निबाणाद्वारे स्पेस सूट परिधान केलेला एक पुतळा पाठविण्यात आला आहे. स्पेसएक्सचा हा आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तज्ञांची याचे कौतुक करत याला ‘गेमचेंजर’ ठरविले आहे.

✓ पंजाब राज्य शासनाने ‘बिजनेस फर्स्ट’ ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले :
पंजाब राज्य शासनाने राज्यात व्यवसाय सुलभ करण्यासाठी ‘बिजनेस फर्स्ट’ ऑनलाइन व्यासपीठ सुरू केले आहे.

नवीन व्यासपीठ उद्योजकांसाठी एकल खिडकी सुविधा म्हणून काम करणार. इतर सर्व विभागांकडून घ्याव्या लागणार्‍या परवानग्या या एकाच व्यासपीठाच्या माध्यमातून मिळणार आहे.

✓ "राणी अननस" – त्रिपुराचे राज्याचे राज्य फळ :
त्रिपुरा राज्य शासनाकडून अननसाचे "राणी" हे वाण राज्याचे राज्य फळ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ही अधिकृत घोषणा राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केली. त्रिपुरा राज्याचे अननस फळाचे "राणी" हे वाण जगप्रसिद्ध आहे.

✓ आंध्रप्रदेशाचा राज्य पक्षी ‘रामाचिलका’ आणि राज्य फूल ‘अदावी उथातीत्ती’ :
गुलाबी रंगाचा मानेवर पट्टा असलेला पोपट, ज्याला रोज-रिंग पॅराकीट (किंवा सित्ताकुला क्रामेरी किंवा तेलुगूमध्ये ‘रामाचिलका’) म्हणून ओळखतात, याला आंध्रप्रदेशाचा राज्य पक्षीम्हणून घोषित करण्यात आले आहे.

शिवाय, स्थानिक पातळीवर 'अदावी उथातीत्ती' म्हणून ओळखल्या जाणार्‍या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या फुलाला राज्य फूल म्हणून घोषित करण्यात आले आहे.

✓ बर्न करारामध्ये परिशिष्टच्या परिच्छेद 2 आणि 3 संबंधित भारताचे घोषणापत्र :
9 सप्टेंबर 1886 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या साहित्यिक आणि कलात्मक लिखाण संदर्भात ‘बर्न करार’ यांच्या मंजुरीचे साधन समजले जाणारे भारताचे घोषणापत्र 28 मार्च 2018 रोजी जागतिक बौद्धिक संपदा संघटनाकडून अधिसूचित करण्यात आले होते. त्या करारामधील परिशिष्टचे परिच्छेद 2 आणि 3 हे भारतासंदर्भात लिहिले गेले आहेत.

त्यानुसार भारत सरकार 10 ऑक्टोबर 2024 रोजी संपणार्‍या 10 वर्षांच्या मुदतीपर्यंत निर्दिष्ट विशेषाधिकाराचा उपभोग घेऊ शकणार. ही घोषणा भारत प्रजासत्ताकाच्या क्षेत्राच्या संबंधात 28 मार्च 2018 रोजी लागू केली गेली.

परिशिष्टच्या परिच्छेद 2 मधून भारत प्रजासत्ताकाला अश्या ग्रंथांच्या भाषांतराचा विशेषाधिकार, ज्याचे प्रकाशन पुन: छपाई किंवा समरूप स्वरुपात पुनर्लेखनाच्या रूपात झाले आहे, सक्षम प्राधिकरणाद्वारे केवळ शिक्षण, शिष्यवृत्ती किंवा संशोधनाच्या उद्देशाने प्रदान केले गेले आहे.

परिशिष्टच्या परिच्छेद 3 मधून भारत प्रजासत्ताकाला असे ग्रंथ, ज्यांचे प्रकाशन पुन: छपाई वा समरूप स्वरुपात पुनर्लेखनाच्या रूपात झाले आहे किंवा कायद्यान्वये तयार केल्या गेलेल्या श्रव्य-दृश्य स्थिरीकरणाच्या श्रव्य-दृश्य रूपात झाले आहे, यांची पुनः प्रस्तुतीचे विशेषाधिकारांच्या बदल्यात अशा आवृत्त्या प्रकाशित करण्याची परवानगी असेल ज्याचे 6 महीन्यांमध्ये वितरण/विक्री झालेली नाही.

भारत 28 एप्रिल 1928 पासून बर्न कराराचा सदस्य आहे आणि वेळोवेळी परिशिष्टच्या परिच्छेद 2 व 3 अन्वये घोषणांची प्रस्तुती करीत आहे. प्रस्तुती वा उपस्थित अधिसूचना भारताच्या पूर्वस्थितीच्या क्रममध्येच आहे.

✓स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत देशभरातल्या ग्रामीण स्वच्छतेने 85% चे प्रमाण गाठले :
भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेंतर्गत देशभरातल्या ग्रामीण स्वच्छतेने 85% चे प्रमाणगाठले.

मोहिमेंतर्गत ग्रामीण भारतात 7.4 कोटी शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले. 3.8 लक्ष गावे आणि 391 जिल्ह्यांना हागणदारी मुक्त (ODF) घोषित करण्यात आले आहे. वर्तमानात ग्रामीण भारतात शौचालये वापराचे प्रमाण 93.4% इतके आहे.

सन 2014 पासून स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात झाली. याअंतर्गत सर्वेक्षण क्वालिटी काउंसिल ऑफ इंडिया (QCI) कडून केले जाते.

✓ रामगढ विवर उल्काच्या आघाताने निर्माण झाले: तज्ञांचा दावा :

19 व्या शतकापासून रामगढ विवरभूगर्भशास्त्रज्ञांच्या शोधाचा विषय बनलेला आहे. त्याच्या उत्क्रांतीविषयी चालवल्या गेलेल्या अभ्यासामधून तज्ञांनी असा दावा केला आहे की, रामगढ विवर पृथ्वीवर धडक दिलेल्या उल्काच्या आघाताने निर्माण झाले आहे. दाव्यानुसार, 75,000 कोटी वर्षांपूर्वी सुमारे 3 किलोमीटर व्यास असलेली प्रचंड उल्का पृथ्वीवर पडल्याने सुमारे 4 किलोमीटर व्यासाचा एक खड्डा तयार झाला होता.

रामगढ विवर राजस्थानात बारन जिल्ह्याच्या रामगढ गावामध्ये आहे. 3.2 किलोमीटर व्यास आणि सुमारे 200 मीटरपेक्षा जास्त उंचीचा उठलेला सभोवतालचा भाग पहिल्यांदा 1869 साली भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षण (GSI) कडून शोधला गेला. त्यानंतर 1960 साली लंडन भूगर्भशास्त्र सर्वेक्षण कडून याला 'विवर (Crater)' म्हणून मान्यता दिली गेली.

काही महत्वाच्या घटना:
तरुण वयातच जग जिंकणारा सिकंदर ऊर्फ अलेक्झांडर द ग्रेट हा खरोखरीच एक उमदा सम्राट होता. शरण आलेल्या अनेक राजांना त्याने सन्मानाने वागवले. कट्टर शत्रू असलेल्या इराणचा सम्राट डरायस याच्या निधनाची वार्ता कळताच आपल्याला प्रबळ विरोधक राहिला नाही म्हणून अलेक्झांडर ओक्साबोक्शी रडला!

 २००७ बांगलादेशातील चितगावमधे भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
१९९७ पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत 'सुखोई-३० के' ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल झाली.
१९७२ दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.
१९७० अ‍ॅना मे हेस आणि एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९३७ जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.
१९०१ न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१८६६ अलाहाबाद उच्‍च न्यायालयाची स्थापना
१६६५ मिर्झा राजे जयसिंग व शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.

जन्म :
१९४७ लालूप्रसाद यादव – केंद्रीय मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री
१८९७ राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१८९४ काइचिरो टोयोडा – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक (मृत्यू: २७ मार्च १९५२)

मृत्यू :
२००० राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)
१९९७ मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)
१९८३ घनश्यामदास बिर्ला – व्यापारी पार्श्वभूमीतून पुढे येऊन पुढे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभारलेले उद्योगपती (जन्म: १० एप्रिल १८९४)
१९५० पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)
१९२४ वासुदेव वामन तथा ’वासुदेवशास्त्री’ खरे – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)
१७२७ जॉर्ज (पहिला) – इंग्लंडचा राजा. याला इंग्लिश आजिबात येत नसे व तो दुभाषांमार्फत दरबार्‍याशी संपर्क साधत असे किंवा लॅटिनमध्ये त्याचे म्हणणे मांडत असे. (जन्म: २८ मे १६६०)
ख्रिस्त पूर्व ३२३ अलेक्झांडर द ग्रेट – मॅसेडोनियाचा राजा (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)

Post a Comment

0 Comments