loading...

चालू घडामोडी 26 जून 2018

loading...
तय्यिप एर्दोगान यांनी टर्कीची राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली :
15 वर्षापासून सत्तेत राष्ट्रपती पदावर असलेले टर्कीचे रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणुकीत विजय प्राप्त केला आहे.
टर्कीच्या मतदारांनी स्नॅप निवडणुकीत प्रथमच एकाचवेळी राष्ट्रपती आणि संसदेसाठी मतदान केले आहे. एप्रिल 2017 मध्ये अंगिकारलेल्या नवीन संविधानाच्या अंतर्गत राष्ट्रपती पदावर निवडणून येणारे ते पहिले व्यक्ती ठरले आहे.

टर्की हा एक युरोपीय देश आहे. देशाची राजधानी शहर अंकारा आणि चलन तुर्की लिरा हे आहे.

भारताचा आर. प्रगनानंधा :
जगातला वयाने दुसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर वयवर्षे 12 वर्ष आणि 10 महिन्यांचा आर. प्रगनानंधा हा जगातला वयाने दुसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर ठरला आहे.

इटलीमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रेडाईन ओपन हे त्याचे तिसरे ग्रॅंडमास्टर पात्र विजेतेपद जिंकून तो सर्वात लहान भारतीय ग्रँडमास्टर ठरला आहे. पूर्वी प्रगनानंधाने जागतिक ज्युनियर स्पर्धा (नोव्हेंबर 2017 मध्ये) आणि हेरकॅलायन फिशर मेमोरियल ग्रँडमास्टर (एप्रिल 2018) या दोन्ही पात्रटा स्पर्धा जिंकलेल्या आहेत.

12 वर्ष आणि 7 महिन्यांचा युक्रेनचा सेर्जी कारजकिन हा जगातला सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे.
  
भारत: आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचा सर्वात मोठा कर्जदार :
भारताने आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) कडून आतापर्यंत एकूण $ 4.4 अब्जपर्यंतचे कर्ज घेतलेले आहे आणि बँकेचा सर्वात मोठा कर्जदार ठरला आहे.

आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे आणि जानेवारी 2016 पासून ही सेवेत आहे. याचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंग येथे आहे. वर्तमानात जगभरात याचे 86 सदस्य आहेत. ही बँक आशियामधील पायाभूत सुविधांसंबंधी विकास प्रकल्पांसाठी आर्थिक मदत प्रदान करते.

सौदी अरबमध्ये वाहनचालनासाठी महिलांवरील बंदी उठविण्यात आली :
24 जून 2018 पासून सौदी अरबमध्ये महिलांना रस्त्यांवर वाहने चालविण्यास परवानगी दिली गेली आहे. यापूर्वी महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार नसलेला जगातील एकमेव असा सौदी अरब हा देश होता.

सप्टेंबर-17 मध्ये सौदीचे किंग सलमान यांनी देशात महिलांना वाहन चालविण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे हा निर्णय महिलांसाठी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरला होता.

सौदी अरब हा एक आखाती देशा आहे, ज्याने अरब खंडाचा 80% भाग व्यापलेला आहे. रियाध ही देशाची राजधानी आहे आणि सौदी रियाल हे चलन आहे.

जम्मू-काश्मीरच्या लद्दाख भागात वार्षिक सिंधू दर्शन महोत्सव :
जम्मू-काश्मीरच्या लद्दाख भागात 24 जून 2018 पासून सिंधू नदीच्या तीरावर तीन दिवसीय 22 व्या वार्षिक सिंधू दर्शन महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे.

सिंधू दर्शन यात्रा समिती आणि लेहच्या लद्दाख फांडे त्सोग्स्पा संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन RSS सरचिटणीस भैयाजी यांच्या हस्ते केले गेले.

सिंधू दर्शन महोत्सवाचे आयोजन पहिल्यांदा 1997 साली माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या अध्यक्षतेत केले गेले होते. हा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सामंजस्यता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा यावर केंद्रित असतो. देशाच्या विविध भागाची सांस्कृतिक कार्यक्रमे प्रदर्शित केली जातात.

ज्येष्ठ गायक अरुण दाते कालवश :
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे 6 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.

हळुवार आणि सुरेल गीतांनी भावगीतांना नवा आयाम देत त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.

अरुण दाते यांचे वडील रामूभैय्या दाते इंदूरमधील प्रतिष्ठित गायक होते. वडिलांच्या इच्छेनुसार अरुण दाते यांनी गायन क्षेत्रात पाऊल ठेवले.

इंदूरजवळच्या धारमध्ये कुमार गंधर्वांकडे त्यांनी गायनाला सुरुवात केली. पुढील शिक्षण त्यांनी के. महावीर यांच्याकडे घेतले. सन 1955 पासून त्यांनी आकाशवाणीवर गायला सुरुवात केली. मंगेश पाडगावकर यांची रचना आणि श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेल्या 'शुक्रतारा मंदवारा' या गाण्याने दाते यांना लौकीक मिळवून दिला.

तसेच त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. 1962 मध्ये त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. अरुण दाते यांनी 2010 पर्यंत शुक्रतारा या मराठी भावगीत कार्यक्रमाचे अडीच हजाराहून अधिक कार्यक्रम केले. केवळ मराठीतच नाही तर उर्दूतही त्यांनी आपला ठसा उमटविला. मराठी-उर्दू गीतांचे त्यांचे पंधराहून अधिक अल्बम प्रसिद्ध होते.

शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ भावगीतगायक अरुण दाते यांना 'राम कदम कलागौरव' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्याशिवाय त्यांना 2010चा पहिला गजाननराव वाटवे पुरस्कारही प्राप्त झाला होता.

केंद्र शासनाने ‘दिल्ली मास्टर प्लान 2021’ मधील बदल मान्य केले :
दिल्लीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मास्टर प्लान 2021’ मध्ये करण्यात आलेल्या बदलास गृहनिर्माण व नागरी कल्याण मंत्रालयाकडून मान्यता दिली गेली आहे.

सुधारित योजनेनुसार, आता सर्व दुकान-नि-निवासासाठीच्या भूखंड आणि संकुलासाठी एकसमान ‘चटई क्षेत्र गुणोत्तर (floor area ratio -FAR)’ म्हणजेच 100 चौ. मीटर क्षेत्रफळासाठी 350; दुकान-नि-निवासासाठीच्या भूखंड/संकुलामध्ये व्यावसायिक कार्यांसाठी तळमजला वापरला जाऊ शकणार; संबंधित स्थानिक संचालकांना पार्किंग, पाणी, गटार आदींची व्यवस्था करावी लागणार आणि अन्य सुधारणा यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहे.

दिनविशेष

  • मादागास्करचा स्वातंत्र्य दिन
  • सोमालियाचा स्वातंत्र्य दिन
काही महत्वाच्या घटना:
२००० पी. बंदोपाध्याय या भारतीय हवाईदलातील पहिल्या महिला एअर कमोडोर बनल्या.
१९९९ पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांच्या हस्ते शिवाजीराजांची मुद्रा असलेले २ रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा समारंभ पुणे येथे झाला.
१९९९ नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचे विभाजन करुन माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला.
१९७५ पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीचा वटहुकूम जारी केला.
१९७४ नागपुरजवळील कोराडी येथील (त्याकाळच्या) सर्वात मोठया वीजनिर्मितीकेंद्रातून वीजनिर्मितीला प्रारंभ
१९७४ ओहायो (अमेरिका) येथील एका सुपर मार्केटमधे वस्तुंवर बार कोड लावण्यास सुरूवात झाली.
१९६८ पुणे महापालिकेने उभारलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचे उद्‍घाटन झाले.
१९६० मादागास्करला (फ्रान्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९६० सोमालियाला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१७२३ रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकू जिंकली.

जन्म :
१९५१ गॅरी गिल्मोर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९१४ शापूर बख्तियार – ईराणचे ७४ वे पंतप्रधान (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९१)
१८९२ पर्ल एस. बक – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३८) अमेरिकन लेखिका (मृत्यू: ६ मार्च १९७३)
१८८८ नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्व' – गायक व अभिनेते (मृत्यू: १५ जुलै १९६७)
१८७४ छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (मृत्यू: ६ मे १९२२)
१८७३ अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (मृत्यू: १७ जानेवारी १९३०)
१८२४ लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (मृत्यू: १७ डिसेंबर १९०७)
१७३० चार्ल्स मेसिअर – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १२ एप्रिल १८१७)

मृत्यू :
२००५ एकनाथ सोलकर – अष्टपैलू क्रिकेटपटू (जन्म: १८ मार्च १९४८)
२००४ यश जोहर – हिन्दी चित्रपट निर्माता (जन्म: ६ सप्टेंबर १९२९)
२००१ वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार (जन्म: २५ मार्च १९३२)
१९४३ कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिकविजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (जन्म: १४ जून १८६८)
  ३६३ रोमन सम्राट ज्यूलियनची हत्या (जन्म: ? ? ३३२)

चालू घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटर वर आणि जी प्लस फाॅलो करा...