loading...

चालू घडामोडी 18 जून 2018

loading...
✓तामिळनाडूत ई-सिगारेटवर बंदी लवकरच :
तामिळनाडू इलेक्ट्रॉनिक सिगारेट्सवर बंदी घालण्याचा विचार करीत आहे, बॅटरीवर चालविले जाणारे इनहेलर्स ज्यात vaporised निकोटिनचे डोस टाकतात, असे राज्य आरोग्य मंत्री विजया बस्कर यांनी विधानसभेत सांगितले.

इलेक्ट्रॉनिक सिगारेट किंवा ई-सिगारेट हातात हाताळलेला इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जो तंबाखूच्या धूम्रपानाची भावना उत्तेजित करतो.
तो एक द्रव तयार करून एक एरोसॉल निर्माण करतो जो सामान्यतः "वाफ" म्हटला जातो, ज्यायोगे उपयोगकर्ता आत घेतो/ इनहेल करतो

✓तेलंगणामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंचे वापरावर कार्यालयात बंदी :
तेलंगणा सरकारने कार्यालयांमध्ये एकल-उपयोगाच्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यासाठी सर्व शहरी स्थानिक संस्था व नागरी महापालिका संस्था यांना निर्देश दिले.
घनकचरा व्यवस्थापन नियम, 2016 नुसार 50 मायक्रॉन जाडीच्या खाली प्लास्टिकचा वापर आधीच बंदी आहे.
2022 पर्यंत हैदराबादने एकवेळ-वापराच्या प्लॅस्टिकमुक्त शहराची निर्मिती करण्याची सरकारची योजना आहे

✓सुवर्ण महोत्सवी वर्षांत निर्लेपची मालकी बजाजकडे :
'नॉनस्टिक' तवे आणि भांडय़ांसाठी प्रसिद्ध 'निर्लेप'ला दोन वर्षांपूर्वीची नोटाबंदी आणि वर्षपूर्ती करीत असलेल्या 'जीएसटी'मुळे बसलेल्या कथित आर्थिक फटक्यापासून मात्र निर्लिप्त होता आले नाही! त्यामुळेच ही कंपनी 80 कोटी रुपयांना 'बजाज इलेक्ट्रिकल्स'ला विकण्यात आली आहे.

विशेष म्हणजे 'निर्लेप'च्या विक्रीचा कटू निर्णय नेमका कंपनीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांतच प्रवर्तकांना घ्यावा लागला आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे उत्पादन प्रकल्प असलेली 'निर्लेप अल्पायन्सेस' ही कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्सने 80 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

सन 1968 मध्ये कंपनीची स्थापना व 100 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या निर्लेपमध्ये सध्या 500 कर्मचारी आहेत. कंपनीवरील 30 कोटी रुपये कर्ज, काही थकीत रक्कम व कंपनीचे 42.50 कोटी रुपयांचे मूल्य असे मिळून 80 कोटी रुपयांच्या घरातील हा व्यवहार बजाज इलेक्ट्रिकल्स येत्या सहा महिन्यांत पूर्ण करणार आहे.

'निर्लेप अप्लायन्सेस' गुंतवणूकदारांच्या शोधार्थ गेल्या दशकभरापासून होती. या दरम्यान कंपनीकडे काही विदेशी गुंतवणूकदारही आकृष्ट झाले. मात्र शक्यतो भारतीय व्यावसायिकाला प्राधान्य देण्याच्या इच्छेने हा निर्णय आम्ही लांबणीवर टाकत होतो. मात्र गेल्या दोन वर्षांत नोटाबंदी आणि 'जीएसटी' (वस्तू व सेवा कर) यामुळे इच्छा असूनही व्यवसाय करणे कठीण बनत गेले,' असे 'निर्लेप अप्लायसन्सेस'चे संचालक राम भोगले यांनी सांगितले.

✓वॉटर प्रॉडक्टीव्हिटी मॅपिंग ऑफ मेजर इंडियन क्रॉप्स’ या पुस्तकाचे प्रकाशन :
नवी दिल्लीत एका कार्यक्रमात राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) कडून प्रकाशित करण्यात आलेल्या ‘वॉटर प्रॉडक्टीव्हिटी मॅपिंग ऑफ मेजर इंडियन क्रॉप्स’ हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे केंद्रीय जलस्त्रोत मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे.

कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. अशोक गुलाटी यांच्या नेतृत्वाखाली एका चमूने 10 प्रमुख पिकांच्या अभ्यासावर हे पुस्तक लिहिले गेले आहे. ही पिके आहेत - तांदूळ, गहू, मका, डाळी, तेलबिया, ऊस, कापूस आणि बटाटे इत्यादी.

भारतात कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या विकासासाठी ‘NABARD अधिनियम-1981’ अन्वये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) याची स्थापना करण्यात आली. NABARD कडे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासासाठी कर्ज यासारख्या सुविधा प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या नियमनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सध्या NABARD मध्ये 99.6% भागीदारी केंद्र शासनाची तर उर्वरित भारतीय रिझर्व्ह बँकेची आहे.

✓भारतातील 115 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये ‘स्वजल’ योजनेचा शुभारंभ :
पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या ‘स्वजल’ योजनेचा शुभारंभ देशातील 115 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे.

या योजनेत ‘राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासंदर्भात राष्ट्रीय सल्लामसलत'(NRDWP) च्या सध्याच्या अर्थसंकल्पात परिवर्तनशील अश्या निधीतून 700 कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. या योजनांचा उद्देश म्हणजे खेड्यांना सौर ऊर्जेच्या जोरावर नळीद्वारे पेयजलाच्या पुरवठा करणे. शिवाय स्वजल एकाकांच्या कार्यासाठी आणि देखभालीसाठी शेकडो ग्रामीण तंत्रज्ञांना प्रशिक्षण दिले जाईल.

‘स्‍वजल’ योजना शाश्वत पेयजल पुरवठ्यासाठी समाजाच्या मालकीचा एक उपक्रम आहे. या योजनेंतर्गत प्रकल्पासाठी लागणार्‍या खर्चाचा 90% हिस्सा केंद्र शासन आणि उर्वरित 10% खर्च लोकसहभागातून आलेल्या योगदानाचा असणार आहे. प्रकल्पांची संपूर्ण जबाबदारी स्थानिक ग्रामीण लोकांची असणार. योजनेनुसार गावात 4 तळ्यांची निर्मिती केली जाणार आणि सुमारे 300 घरांना नळाची जोडणी उपलब्‍ध करून दिली जाणार.


✓20 राज्यांनी आयुषमान भारत उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सामंजस्य करार केला :
आयुषमान भारत - राष्ट्रीय आरोग्य संरक्षण अभियान (AB-NHPM) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी 20 राज्य शासनांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

‘आयुषमान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ या योजनेचे दोन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे 10.74 लक्ष कुटुंबांना मोफत 5 लक्ष रूपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे आणि दुसरा म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना करणे. देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना (PHC) अद्ययावत करून त्यांना हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. देशभरात 150000 उपकेंद्रांना हेल्थ अँड वेलनेस सेंटरमध्ये रूपांतरित केले जात आहेत. या केंद्रांवर 12 प्रकारच्या आजारांवर उपचार दिले जात आहेत आणि मोफत तपासणी सुविधा आणि औषधी मिळते.

✓दिल्लीमध्ये ‘राष्ट्रीय आदिवासी संग्रहालय’ स्थापन करण्याचा प्रस्ताव :
आदिवासी कल्याण मंत्रालयाने दिल्लीमध्ये‘राष्ट्रीय आदिवासी संग्रहालय’ आणि ‘राष्ट्रीय पातळी आदिवासी संशोधन संस्था’ (National Level Tribal Research Institute -TRI) स्थापन करण्याचा प्रस्ताव NITI आयोगापुढे विचारार्थ मांडला आहे.

यावर्षी मोठ्या स्वरुपात 40 ‘आदी महोत्सव’चे आयोजन करण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे, ज्यामध्ये जवळपास 25000 आदिवासींचा सहभाग पाहू शकता येईल. TRIFED ने 2017-18 साली 20 कोटी रुपयांची विक्रमी विक्री केली आहे, जी 2016-17 साली 11.37 कोटी रुपये इतकी होती.

काही महत्वाच्या घटना:
१९८१ जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.
१९५६ रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
१९४६ डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले. या घटनेच्या स्मरणार्थ पणजींतील एका रस्त्याला ’१८ जून रस्ता’ असे नाव देण्यात आले आहे.
१९०८ फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.
१९३० चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
१८३० फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.
१८१५ वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव

जन्म :
१९६५ उदय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा (मृत्यू: २२ जुलै २००३)
१९४२ थाबो म्बेकी – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष
१९४२ पॉल मॅकार्टनी – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, ’बीटल्स’चा सदस्य
१९३१ के. एस. सुदर्शन – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ५ वे सरसंघचालक (मृत्यू: १५ सप्टेंबर २०१२)
१९११ कमला सोहोनी – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९७)
१८९९ शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक (मृत्यू: १ डिसेंबर १९८५)

मृत्यू :
२००९ उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण (१९६९), मॅकआर्थर फेलोशिप, संगीत नाटक अकादमी फेलोशिप, नॅशनल हेरिटेज फेलोशिप (जन्म: १४ एप्रिल १९२२ - शिबपूर, कोमिल्ला, बांगला देश)
२००३ जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते (जन्म: ? ? १९१०)
१९९९ श्रीपाद रामकृष्ण काळे – ५२ कादंबर्‍या आणि ११०० हुन अधिक कथा लिहिणारे साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार (जन्म: ? ? ????)
१९७४ सेठ गोविंद दास – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक (जन्म: १६ आक्टोबर १८९६)
१९६२ जे. आर. तथा नानासाहेब घारपुरे – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य, नामवंत विद्वान (जन्म: ? ? ????)
१९५८ डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २३ आक्टोबर १९००)
१९३६ मॅक्झिम गॉर्की – रशियन लेखक (जन्म: २८ मार्च १८६८)
१९०२ सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (जन्म: ४ डिसेंबर १८३५)
१९०१ रामचंद्र भिकाजी गुंजीकर – ’मोचनगड’ या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि ’विविध ज्ञानविस्तार’ मासिकाचे संपादक (जन्म: १० एप्रिल १८४३)
१८५८ मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी - इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या (जन्म: १९ नोव्हेंबर १८२८)

Post a Comment

0 Comments