loading...

चालू घडामोडी 6 जून 2018

loading...
मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले :
पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन म्हणून ओळखले जाणार याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही याबाबत ट्विट केले आहे.
उत्तर प्रदेशाताली योगी सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले असून त्याऐवजी या स्टेशनचे नाव आता पंडित दीन दयाळ उपाध्याय जंक्शन असे असणार आहे. उत्तर प्रदेशाताली योगी सरकारने प्रसिद्ध मुगलसराय रेल्वे स्टेशनचे नाव बदलले असून त्याऐवजी या स्टेशनचे नाव आता पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे असणार आहे. याबाबत अधिसूचनाही सरकारने प्रसिद्ध केली आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनीही याबाबत ट्विट केले.

गोयल यांनी म्हटले की, जनतेच्या मागणीवरुन उत्तर प्रदेशातील मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय करण्यात आले आहे. योगी सरकारच्या मंत्रिमंडळाने गेल्याच वर्षी मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून दीनदयाल उपाध्याय करण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी (४ जून) त्याची अधिकृत अधिसुचना जारी करण्यात आली.
दरम्यान, योगी सरकारच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून विरोध व्हाऊ लागल्याने काही काळ त्यांनी हा निर्णय लांबणीवर टाकला होता. काही लोकांनी मुगलसराय जंक्शनला देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नाव देण्याची मागणी केली होती.

रा. स्व. संघाच्या विचारसरणीचे आणि भाजपाचे नेते असलेले दीनदयाल उपाध्याय आणि माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री या दोघांचाही मुगलसराय शहराशी जवळचा संबंध आहे. मुगरसराय हे शास्त्रींचे जन्मस्थळ आहे. तर १९६८ मध्ये दीनदयाल उपाध्याय यांचा मुगलसराय जंक्शन येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर बऱ्याच काळापासून भाजपा या रेल्वे स्टेशनला त्यांचे नाव देण्याची मागणी करीत होती.

स्थानिक स्वराज्य संस्थांत आता ‘ई-व्होटिंग’:
राज्यातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘ई-व्होटिंग’चा प्रकल्प राबवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे.

कोयना नदीच्या वीजनिर्मितीवर मर्यादा :
कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठी आरक्षित केलेला पाणीसाठा संपल्यामुळे कोयना प्रकल्पाच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आली आहे.

राज्यात उष्णतेची लाट पसरलेली असताना कोयनेच्या वीजनिर्मितीवर मर्यादा आल्यामुळे विजेच्या नियोजनाचे मोठे संकट वीजनिर्मिती कंपनीसमोर आहे.

1 जूनपासून पाणी वापराचे तांत्रिक वर्ष नव्याने सुरू होणार आहे. त्यानंतर कोयनेची वीजनिर्मिती सुरळीत सुरू होण्याची शक्‍यता आहे.

कोयना धरणात पाणी साठविण्याची क्षमता 105.25 टीएमसी आहे. धरणातील पाण्याचे वाटप कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निर्देशाप्रमाणे केले जाते. पश्‍चिमेकडील टप्पा 1 ते 4 मधून वीजनिर्मितीसाठी 67.50 टीएमसी पाणीसाठा आरक्षित आहे. 31 मेपर्यंत महानिर्मिती कंपनीकडून या पाण्याचे नियोजन केले जाते.

देशाकडून पाक सीमेजवळ 1400 बंकर उभारले जाणार :
पाकिस्तान सीमेनजीकच्या गावांमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षितेसाठी 1400 नवे बंकर बांधले जात असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली.

पाकिस्तानच्या सीमेनजीक राहणारे लोक हे सामान्य नसून धोरणात्मक दृष्टीने त्यांचे मोठे महत्त्व आहे, त्यामुळे त्यांची सुरक्षितता हे सरकारचे कर्तव्य असल्याचे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे.

तसेच काश्‍मिरी पंडितांचेही पुनर्वसन करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध होत आहे.

राज्यात शेततळे खोदाईत पुरंदर तालुका अव्वलस्थानी :
राज्य सरकारच्या कृषी विभागाने राबविलेल्या 'मागेल त्याला शेततळे' योजनेत पुरंदर तालुका पुणे जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

जिल्ह्यात 2 हजार 500 शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट होते, त्यापैकी 1 हजार 989 शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यात पुरंदर तालुक्‍यातील 567 शेततळ्यांचा समावेश आहे. उर्वरित 12 तालुक्‍यांत मिळून 1 हजार 422 तळी पूर्ण झाली आहेत.

तसेच ही योजना सुरू झालेल्या दोन वर्षांत पुरंदर तालुक्‍यातील 567 शेततळ्यासाठी सर्वाधिक 2 कोटी 44 लाख 2 हजार रुपये खर्च झाले आहेत. पुरंदरनंतर इंदापुरात 452, बारामतीत 305, शिरूरमध्ये 207 शेततळी पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात 2 हजार 500 शेततळी खोदण्याचे उद्दिष्ट होते, त्यातील 68 शेततळ्यांची कामे अजून सुरू आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

राळेगणसिद्धी येथे सौरऊर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वित :
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राळेगणसिद्धी येथे सरकारी जमीनीवर लवकरच सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. हा प्रकल्प येत्या एक महिन्यात कार्यान्वीत होणार आहे. तो सुरू झाल्यावर येथील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीजपुरवठा व तोही पूर्ण दाबाने मिळणार आहे.

जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील हा पहिलाच मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे. राळेगणसिद्धी येथे या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपुजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते.

येथील सरकारी गायरान जमीनीवर हा प्रकल्प उभारण्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे. सुमारे एक महिन्यात हा प्रकल्प ऊभा कार्यान्वीत होईल अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पाचे काम मुंबई येथील वारी एनर्जी ही कंपणी करत आहे. बांधा वापार आणि हस्तांतरीत करा या तत्वावर हे काम होत आहे. या प्रकल्प उभारणीचा सर्व खर्च कंपनीच स्वतः करणार आहे. त्या नंतर येथे तयार होणारी वीज सरकारला म्हणजेच वीजवितरण कंपणीला विकत देणार आहे. व त्यातून आपला खर्च ती वसुल कराणार आहे.

येथे तयार होणारी वीज येथेच वापरली जाणार असल्याने मोठ्या प्रमाणात वीजगळती थांबणार आहे. त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान थांबणार आहे. शिवाय येथील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी ही वीज सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळात 12 तास उपलब्ध होणार आहे. त्या मुळे शेतकऱ्यांना रात्री आंधारात किंवा थंडी-वाऱ्यात शेतात पिकास पाणी देण्यास जावे लागणार नाही. शेतकऱ्यांचे वन्यप्राणी व किटकांपासूनही संरक्षण होणार आहे. 


काही महत्वाच्या घटना:
१९९३ मंगोलियात प्रथमच राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट निवडणूका घेण्यात आल्या.
१९८२ इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
१९७४ स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
१९७० इंग्लंडमधे सी. हेन्केल या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला.
१९६९ वि. स. पागे समितीने केलेल्या शिफारशीवरुन रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली. १९७२ च्या भीषण दुष्काळात तिचे ’रोजगार हमी योजना’ असे नामकरण करण्यात आले. जानेवारी १९७३ पासून या योजनेतील मजुरांना देण्यात येणारा खाऊ ’सुकडी’ या नावाने प्रसिद्ध झाला.
१९३० गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना
१८८२ अरबी समुद्रात आलेल्या एका भीषण चक्रीवादळामुळे मुंबईत सुमारे १,००,००० लोक मृत्यूमुखी पडले.
१८३३ रेल्वेमधून प्रवास करणारे अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले.
१६७४ रायगड येथे छ्त्रपती शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक झाला.

जन्म :
१९५६ बियॉन बोर्ग – स्वीडीश लॉनटेनिस खेळाडू
१९२९ सुनील दत्त – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री (मृत्यू: २५ मे २००५)
१९१९ राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक (मृत्यू: ? ? १९८८)
१९०९ गणेश रंगो भिडे – मराठी ज्ञानकोशकार (मृत्यू: ? ? ????)
१९०१ सुकार्नो – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २१ जून १९७०)
१८५० कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

मृत्यू :
 २००२ शांता शेळके – शब्दांवर मनापासून प्रेम करणार्‍या आणि आपल्या विविध भावभावनांचा अविष्कार अचूकपणे व्यक्त करणार्‍या समर्थ कवयित्री आणि गीतलेखिका. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, चित्रपटगीते, भावगीते, नाट्यगीते, बालगीते, ललितलेखन व लघुनिबंध इत्यादि प्रकारांत विपुल लेखन केले. कालिदासाचे ’मेघदूत’ आणि अनेक जपानी हायकूंचा त्यांनी अनुवाद केला. ’वडीलधारी माणसे’ हे व्यक्तिचित्रण ’गोंदण’, ’वर्षा’, ’रुपसी’ इ. काव्यसंग्रह, ’रंगरेषा’, ’आनंदाचे झाड’ इ. ललित लेखसंग्रह, ’धूळपाटी’ हे आत्मचरित्र इ. त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांनी ७० ते ७५ चित्रपटांसाठी गीते लिहिली आहेत. (जन्म: १२ आक्टोबर १९२२)
१९७६ जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (जन्म: १५ डिसेंबर १८९२)
१९६१ कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ (जन्म: २६ जुलै १८७५)
१९५७ रामचंद्र दत्तात्रय तथा ’गुरूदेव’ रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक (जन्म: ३ जुलै १८८६)
१८९१ जॉन ए. मॅकडोनाल्ड – कॅनडाचे पहिले पंतप्रधान (जन्म: ११ जानेवारी १८१५)

Post a Comment

0 Comments