loading...

चालू घडामोडी २८ जून २०१८

loading...

सहकारी बँकांवर व्यवस्थापन मंडळाचे नियत्रण :

सहकारी बँकांसदर्भात रिझर्व्ह बँकेने वाय. एच. मालेगम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्या समितीने अशा व्यवस्थापन मंडळाची स्थापना करण्याची शिफारस केली आहे.

स्वागतार्ह निर्णय ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर वैशंपायन यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सहकारी बँकांमधील बहुतांश ठेवी या सर्वसामान्यांच्या असतात. त्यांचे हित यामुळे जोपासले जाईल. व्यवस्थापन मंडळातील सदस्यांची नेमणूक रिझर्व्ह बँकेकडूनच होईल. त्यामुळे सहकारी बँकांमध्ये व्यावसायिकता आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्हच आहे.

समितीने म्हटले आहे की, १०० कोटी रुपयांहून अधिक ठेवी असलेल्या सहकारी बँकांवर किमान पाच सदस्यांचे व्यवस्थापन मंडळ हवे. त्याहून कमी ठेवी असलेल्या बँकांमधील व्यवस्थापन मंडळांतील सदस्यांची संख्या तीन असावी. यापैकी १०० कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँकांवरील नेमणूक एका वर्षाच्या आत करावी, अशीही शिफारस समितीने केली आहे.

पंतप्रधान आवास योजनांचा प्रभाव :

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ९ हजार ४२१ जणांनी पंतप्रधान आवास योजनेतील घरे मिळावी याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोर्टलवर थेट अर्ज केले होते. मात्र स्थानिक प्रशासनाला डावलून थेट वर अर्ज केल्याने बिथरलेल्या अधिकाऱ्यांनी तत्कालीन आयुक्त पी. वेलारासू यांनी अर्जांच्या छाननीचे आदेश देऊनही या रहिवाशांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

पंतप्रधान आवास योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये केली. देशात २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्यात येतील, असे सांगण्यात आले. यापूर्वी यूपीए सरकारकडून राजीव गांधी आवास योजना राबविली जात होती. केंद्रात सत्तांतर झाल्यावर भाजपाने राजीव गांधी आवास योजना गुंडाळून तिला पंतप्रधान आवास योजनेचे नाव दिले. पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थीचे देशात कुठेही घर नसावे हा प्रमुख निकष ठेवला गेला. घरासाठी २ लाख ५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल, असे घोषित करण्यात आले.

चार प्रकारच्या अर्जांपैकी पहिल्या प्रकारात व्हर्टिकल-१ मध्ये ज्या ठिकाणी झोपडी आहे. त्याठिकाणी पक्के घर बांधले जावे. या प्रकारात एकही अर्ज प्राप्त झालेला नव्हता. मात्र व्हर्टीकल-२ या प्रकारात बँकेकडून कमी दरात कर्ज घेऊन घर बांधण्यासाठी १२३ जणांनी अर्ज केले. व्हर्टीकल-३ प्रकारात खाजगी विकासकाकडून प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशीप तत्त्वावर घरे बांधण्याकरिता ८ हजार ६२१ जणांनी अर्ज केले. व्हर्टीकल-४ या प्रकारात ज्या ठिकाणी तुमचे घर आहे त्याठिकाणी वाढीव बांधकाम करुन अथवा एक मजला चढवता येईल. या प्रकारात ६७७ अर्ज करण्यात आले. घराकरिता थेट अर्ज करणारी मंडळी खरोखरच पात्र आहेत किंवा कसे याच्या छाननीसाठी आयुक्त वेलरासू यांनी १६ आॅगस्ट २०१७ रोजी समिती गठीत केली होती. त्यात झोपडपट्टी विभागाच्या उपायुक्तांसह मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त, संबंधित प्रभाग अधिकारी यांचा समावेश होता. 

काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग :

पाकिस्तानने कितीही आदळआपट केली आणि कितीही खोटे युक्तिवाद केले तरी जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे सत्य नाकारता येत नाही, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला सुनावले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला गेला होता. या मुद्‌द्‌याचा संदर्भ घेत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत जगातील हत्याकांड, युद्ध, जातीय दंगल, मानवाधिकाराची पायमल्ली यासारख्या गुन्ह्यांना रोखणे आणि संरक्षणाची जबाबदारी या विषयावर सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तानचे प्रतिनिधी राजदूत मलीहा लोदी यांनी काश्‍मीरमध्ये हत्याकांडासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे म्हटले होते.

पाकिस्तानने काश्‍मीरचे चुकीचे चित्र मांडल्याने आणि भारताच्या घटक राज्यात हस्तक्षेप केल्याने भारताने तीव्र विरोध केला.

भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी अभियानाचे वरिष्ठ सचिव संदीप कुमार बाय्यपू म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या गंभीर विषयावर चर्चा होत असताना एका प्रतिनिधीने भारताचे राज्य असलेल्या जम्मू-काश्‍मीरचा चुकीचा संदर्भ देत या व्यासपीठाचा दुरपयोग केला. यापूर्वीही पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर काश्‍मीरचा मुद्दा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नांना कोणीही पाठिंबा दिला नाही.

शिक्षण, रोजगारासाठी 'सारथी'ची स्थापना :

मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून, त्यानुसार मागासवर्गीय आयोगाची स्थापनादेखील केली आहे. तरीही आरक्षणाशिवाय मराठा समाजाला शिक्षण व रोजगार उपलब्ध करून कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था' अर्थात 'सारथी'ची स्थापना केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बालचित्रवाणी येथे 'छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थे'च्या दुमजली इमारतीच्या उद्‌घाटनानंतर ते बोलत होते.

तसेच या वेळी खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे, महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, मंत्री महोदय चंद्रकांत पाटील, राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, 'सारथी'चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'राज्यभरात मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी मूक मोर्चे निघाले. मोर्चा मूक असला तरी मराठा समाजाचा आक्रोश हजारपटीने मोठा होता. त्याची दखल घेऊन मागण्यांवर सरकारकडून आम्ही सकारात्मकतेने प्रयत्न करीत होतो. आरक्षणासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले.'

उल्हासनगरचे नवे एसीपी मारुती जगताप :

गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात एसीपी पदी एमपीएससीचे अधिकारी मारुती जगताप यांनी पदभार स्विकारला आहे.

मारुती जगताप यांनी 2010 मध्ये एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची थेट सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. दोन वर्ष ट्रेनिंग पूर्ण केल्यावर जगताप यांच्याकडे 2012 मध्ये नक्षलवादी गडचिरोलीचा पदभार सोपवण्यात आला. याठिकाणी तीन वर्ष कामाचा ठसा उमटवल्यावर जगताप यांची रत्नागिरी येथे बदली झाली. रत्नागिरी मध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यावर मारुती जगताप यांची उल्हासनगरच्या एसीपी पदी नियुक्ती झाली आहे.

या शहराचा प्रथम संपूर्ण राजकीय गुन्हेगारी असा अभ्यास केला जाणार आहे. असामाजीकत्त्व, अशांतता पसरवण्यात पुढाकार घेणारे, रेकोर्ड वरील प्रमुख गुन्हेगार, व्यापारी, नागरिकांना नाहक त्रास देणारे बोगस तक्रारधारक यांची माहिती घेण्यात येत आहे.

दिनविशेष

काही महत्वाच्या घटना:
१९९८ संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्‍कविषय्क सार्वत्रिक जाहीरनाम्याला पन्‍नास वर्षे पूर्ण झाली.
१९९७ मुष्टियुद्धात इव्हान्डर होलिफिल्डच्या कानाचा चावून तुकडा तोडल्यामुळे माईक टायसनला निलंबित करुन होलिफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.
१९९४ विश्वकरंडक फूटबॉल स्पर्धेत रशियाच्या ओलेम सेलेन्को याने कॅमेरुनविरुद्ध पाच गोल करुन ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी एकाच सामन्यात चार गोल करण्याची कामगिरी नऊ खेळाडूंनी केली होती.
१९७८ अमेरिकेतील सर्वोच्‍व न्यायालयाने महाविद्यालयातील प्रवेशात आरक्षण बेकायदा ठरवले.
१९७२ दुसर्‍या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषदेस प्रारंभ
१८४६ अ‍ॅडॉल्फ सॅक्स याने पॅरिस, फ्रान्समधे ’सॅक्सोफोन’ या वाद्याचे पेटंट घेतले.
१८३८ इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.

जन्म :
१९७० मुश्ताक अहमद – पाकिस्तानी क्रिकेटपटू व प्रशिक्षक
१९३७ डॉ. गंगाधर पानतावणे – साहित्यिक व समीक्षक
१९३४ रॉय गिलख्रिस्ट – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज म्हणून कारकीर्द गाजवलेले वेस्ट इंडीजचे वादग्रस्त कसोटीपटू (मृत्यू: १८ जुलै २००१)
१९२८ बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (मृत्यू: २३ नोव्हेंबर २०००)
१९२१ नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (मृत्यू: २३ डिसेंबर २००४)
१७१२ रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार (मृत्यू: २ जुलै १७७८)

मृत्यू :
२००० विष्णू महेश्वर ऊर्फ ’व्ही. एम.’ तथा दादासाहेब जोग – उद्योजक (जन्म: ६ एप्रिल १९२७)
१९९९ रामचंद्र विठ्ठल तथा रामभाऊ निसळ – स्वातंत्र्यसैनिकांचे नेते व झुंजार पत्रकार (जन्म: ? ? ????)
१९८७ पं. गजाननबुवा जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ३० जानेवारी १९११)
१९७२ प्रसंत चंद्र महालनोबिस – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, ’इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट’ चे संस्थापक (जन्म: २९ जून १८९३)
१८३६ जेम्स मॅडिसन – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १६ मार्च १७५१)

चालू घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटर वर आणि जी प्लस फाॅलो करा...