loading...

चालू घडामोडी 19 जून 2018

loading...
✓ आरटीओचे पहिले सेवा केंद्र शिक्रापुर येथे :
• प्रादेशिक परिवहन विभाग व राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने राज्यातील पहिले आरटीओ सेवा केंद्र शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सुरू करण्यात आले आहे.
• शिरूर तालुक्‍यातील प्रत्येक पंचायत समिती गणात एक अशी चौदा आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात एक अशी चौदा आरटीओ सेवा केंद्र येत्या वर्षभरात सुरू करण्याची घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी केली.

• प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) सेवा या पुणे व निगडी कार्यालयातच मिळण्याची सुविधा होती.

• मात्र या सर्व सेवा ऑनलाइन करून त्या एकाच केंद्राद्वारे कार्यान्वित करण्याचा प्रकल्प सहा महिन्यांपूर्वी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत राज्य सरकार पातळीवर हाती घेण्यात आला होता.

• ही सेंटर्स नेमण्यासाठी सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने सीएससीचा (कॉमन सर्व्हीस सेंटर) पर्याय प्रादेशिक परिवहन विभागाला दिला.

• तसेच यानुसार राज्यातील पहिल्या आरटीओ सेवा केंद्राची सुरवात शिक्रापुरात झाली असून या केंद्राचे औपचारिक उद्‌घाटन आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते व प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

• दरम्यान आरटीओच्या सर्व कर, प्रमाणपत्र, मालकी, वाहन परवाना, फॅन्सी नंबर, वाहन विमा आदींसह सर्व सेवा या केंद्राद्वारे सरकारने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे दिल्या जाणार असल्याची माहिती आजरी यांनी दिली.


✓ भारत-अमेरिकेचे व्यापारयुध्द :
• अमेरिकेने चीन आणि भारताबरोबर व्यापार युद्ध सुरु केले आहे. अमेरिकेने केलेल्या करवाढीमुळे भारतातून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कर लादून अमेरिकेला त्यातून २४१ मिलियन डॉलरचा फायदा होणार आहे. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर कर लादल्यानंतर भारतानेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर सीमा शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून आयात होणऱ्या महागडया मोटार सायकल, काही लोखंडी-स्टीलच्या वस्तू, बोरिक अॅसिड आणि डाळींवर ५० टक्क्यापर्यंत सीमा शुल्क वाढवण्यात येणार आहे.

• भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी जूनच्या अखेरीस दोन्ही देशांत अधिकाऱ्यांच्या स्तरावर बैठक आयोजित केली जाणार आहे. पोलाद आणि अ‍ॅल्युमिनियमवरील आयात कर, वैद्यकीय उपकरणांच्या किमती, निर्यातीसंदर्भातील सवलती अशा अनेक मुद्दय़ांवर दोन्ही देशांत धोरणात्मक मतभेद असले तरी, ते सोडवण्यासाठी अमेरिका सकारात्मक विचारसरणी ठेवून आहे.

✓ मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर टी-२० :
• राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही मुंबई ते दिल्ली मार्गावर अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशी वेगवान टी-२० (ट्रेन २०२०)गाडी चालविण्यात येणार आहे.  दिल्ली ते भोपाळ मार्गावर चालवण्यात येणारी टी-१८ प्रकारातील गाडी ही शताब्दी एक्स्प्रेसला, तर मुंबई ते दिल्ली मार्गावर चालवण्यात येणारी टी-२० गाडी राजधानी एक्स्प्रेसला पर्याय असेल.

• ट्रेन सेट हे विदेशातील तंत्रज्ञान आहे. यामध्ये लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे डबे हे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतात. जर मुंबई-दिल्ली मार्गावर २० डब्यांची गाडी धावणार असेल, तर त्याचे प्रत्येकी दहा डबे हे एकमेकांना कायमस्वरूपी जोडलेले असतील. त्यामुळे गाडीचा वेग वाढवण्यात मदत मिळते. या गाडीसाठी स्वतंत्र इंजिन नसते. ही गाडी पूर्णपणे मोटर कोचवर धावते.

• मुंबई ते दिल्ली मार्गावर धावत असलेल्या राजधानी तसेच मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणारी शताब्दी एक्सप्रेस ताशी १३० किलोमीटर वेगाने धावतात. टी-२० गाडीही तशाच पद्धतीने धावेल.

 वैशिष्टय़े :
  • राजधानी आणि शताब्दी एक्सप्रेसपेक्षाही वेगवान 
  • संपूर्ण वातानुकूलित गाडी आणि उत्तम आसनव्यवस्था, प्रसाधनगृह
  • वायफाय सुविधा
  • संपूर्ण काचेच्या खिडक्या
  • अपंग प्रवाशांसाठी व्हीलचेअर सुविधा
  • प्रवाशांना गाडीत वावरण्यासाठी अधिकाधिक मोकळी जागा
  • प्रथम आणि द्वितीय श्रेणी असे डबे आकर्षक अंतर्गत सजावट
देशातील 115 जिल्ह्यांमध्ये ‘स्वजल’ योजनेची सुरुवात :
• पेयजल व स्वच्छता मंत्रालया अंतर्गत ‘स्वजल’ योजनेची सुरुवात देशातील 115 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे.

• या योजनांचा उद्देश खेड्यांना सौर ऊर्जेच्या जोरावर नळीद्वारे पेयजलाच्या पुरवठा करणे हा आहे. या योजनेंतर्गत प्रकल्पासाठी लागणार्‍या खर्चाच्या निधी वाटपाचे स्वरूप 90% केंद्र शासन आणि उर्वरित 10% खर्च लोकसहभागातून आलेले योगदान असे असणार आहे.

• ‘स्वजल’ प्रकल्पांची संपूर्ण जबाबदारी स्थानिक ग्रामीण लोकांची असणार आहे.

ब्रिटनने सुलभ व्हिसा योजनेतून भारतास वगळले :

• ब्रिटन सरकारने देशातील विद्यापीठांमधील सुलभ व्हिसा मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी बनवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या यादीमधून भारतीय विद्यार्थ्यांना आश्चर्यकारकरित्या वगळले आहे. या यादीत अमेरिका, कॅनडा आणि न्यूझीलंडसारख्या देशांचा पूर्वीपासूनच समावेश होता. मात्र एकीकडे भारताला वगळताना आता चीन, बहरीन आणि सर्बिया सारख्या देशांचा समावेश करण्यात आला आहे.

• व्हिसा देण्याच्या दृष्टीने 'कमी धोका' असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या कारणामुळे भारताला यादीत स्थान मिळायला हवे होते. असे असताना भारताला वगळल्याने टीका होऊ लागली आहे.

• दरम्यान, हा भारताचा अपमान असल्याचे यूके काउंसिल फॉर इंटरनॅशनल स्टूडंट अफेअर्स (UKCISA) अध्यक्ष लॉर्ड करण बिलमोरिया यांनी म्हटले आहे.

• ब्रिटनच्या स्थलांतराबाबच्या धोरणातील बदल काल संसदेत सादर करण्यात आले. त्यावेळी ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने जवळजवळ 25 देशांच्या विद्यार्थ्यांसाठी श्रेणी-4 व्हीसा श्रेणीत सूट देण्याची घोषणा केली.

• ब्रिटन सरकारने केलेला हा बदल जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी ब्रिटनमध्ये अभ्यास करणे सोपे व्हावे हाच या धोरणामागचा उद्देश आहे.

• नव्या यादीत भारताचा समावेश न केल्यामुळे आता समान अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कडक तपास आणि दस्तावेजी प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

अतुल्य भारत ची नवीन वेबसाइट लाँच :
• पर्यटन राज्यमंत्री के. जे. अल्फोन्स यांनी नवीन अतुल्य भारत वेबसाईट लाँच केली.

• वेबसाईट भारताला एक सर्वांगीण गंतव्य म्हणून दाखविते, अध्यात्म, वारसा, साहसी, संस्कृती, योग, कल्याण आणि अधिक.
भारताला "महत्त्वपूर्ण" भेट देणारे गंतव्यस्थान म्हणून प्रक्षेपित करण्याचा उद्देश असलेल्या वेबसाइटने अंतरराष्ट्रीय मानकांच्या ट्रेंड आणि तंत्रज्ञानाचे अनुसरण केले आहे.

काही महत्वाच्या घटना :
१९९९ ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.
१९८९ इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे १९ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७७ ट्रान्स अलास्कन पाइपलाइन मधुन आर्क्टिक प्रदेशातुन तेलवाहतुक सुरू झाली.
१९६६ ’शिव सेना’ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
१९६१ कुवेतला (इंग्लंडकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९१२ अमेरिकेत कामगारांसाठी ८ तासांचा दिवस निश्चित करण्यात आला.
१८६२ अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.
१६७६ शिवाजी महाराजांनी नेताजी पालकरला शुद्ध करुन परत हिंदू धर्मात घेतले.

जन्म :
१९७० राहूल गांधी – काँग्रेसचे सरचिटणीस
१९४७ सलमान रश्दी – वादग्रस्त व बहुचर्चित लेखक
१९४५ आंग सान स्यू की – नोबेल पारितोषिकविजेत्या ब्रम्हदेशातील लोकशाहीवादी नेत्या
१८७७ डॉ. पांडुरंग चिमाजी पाटील-थोरात – शतायुषी कृषीशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ????)
१६२३ ब्लेझ पास्कल – फ्रेन्च गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ (मृत्यू: १९ ऑगस्ट १६६२)

मृत्यू :
२००० माणिक मुदलियार तथा माणिक कदम तथा कामिनी कदम तथा स्मिता – मराठी व हिन्दी रंगभूमीवरील (अपराध मीच केला) व चित्रपट अभिनेत्री (ये रे माझ्या मागल्या, माझा होशील का?, वाट चुकलेले नवरे, गाठ पडली ठका ठका, देवाघरचं लेणं, नवरा म्हणू नये आपला, पहिलं प्रेम, दोन घडीचा डाव, आंधळा मागतो एक डोळा, तलाक, संतान, मिया बिबी राजी, स्कूल मास्टर, माँ बाप, सपने सुहाने, धर्मपत्‍नी), व्ही. शांताराम यांचे बंधू व छायालेखक व्ही. अवधूत यांची मेहुणी, अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचे नाव तिच्या नावावरुन ठेवले आहे. (जन्म: ? ऑगस्ट १९३३)
१९९८ रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (जन्म: ६ जानेवारी १९२५)
१९९६ कमलाबाई पाध्ये – समाजसेविका (जन्म: ? ? ????)
१९९३ विल्यम गोल्डींग – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक (जन्म: १९ सप्टेंबर १९११)
१९५६ थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. (IBM) चे अध्यक्ष (जन्म: १७ फेब्रुवारी १८७४)
१७४७ नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (जन्म: २२ आक्टोबर १६९८)

Post a Comment

0 Comments